26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi 

26 January Speech in Marathi | 26 जानेवारी भाषण मराठी

येणारा 26 जानेवारी साठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत 26 जानेवारी हा आपला भारत देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रजासत्ताक दिवशी लहानापासून थोरांपर्यंत सर्व आनंदात असतात कारण या दिवशी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला.

26 जानेवारी दिवशी शाळा महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम भरविल्या जातात व या कार्यक्रमांमध्ये व्यक्ती आपल्या देशाबद्दल तसेच 26 जानेवारी या विषयावर भाषण देत असतो.

तुम्ही देखील येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण मध्ये सहभागी होणार असाल आणि तुम्ही या दिवसा निमित्त योग्य भाषण शोधत असाल, तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण घेऊन आलो. या भाषणाचा उपयोग करुन तुम्ही येणार आज 26 जानेवारी च्या भाषण समारंभामध्ये सहभागी होऊ शकता.

26 January speech in Marathi
26 January Speech in Marathi 

आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला खरा पण 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशामध्ये संविधान लागू झाले आणि आपला भारत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन प्रजसत्ताक झाला. तेव्हापासून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताकदिन ” Republic Day “ म्हणून दरवर्षी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.

26 जानेवारी च्या निमित्ताने विविध शाळेमध्ये, महाविद्यालया मध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते व या स्पर्धेमध्ये बरेच विद्यार्थी सहभागी होतात. म्हणूनच आजच्या या 26 जानेवारी भाषण मराठी । 26 January Speech in Marathi या लेखामध्ये आपण खास विद्यार्थ्यांसाठी भाषण प्रस्तुत करत आहोत.

26 जानेवारी भाषण मराठी । 26 January Speech in Marathi 

26 January Speech In Marathi | 26 जानेवारी भाषण मराठी मध्ये

मित्रांनो आज आपण 26 जानेवारी च्या निमित्ताने येथे जमलो आहोत त्यामुळे सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, स्वतंत्र प्रजासत्ताक देशाचे सुजाण नागरिक, माझे थोर गुरुवर्य आणि येथे जमलेल्या माझे बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तरी राज्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला आरंभ करतो.

आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहचा, सन्मानाचा अणि अभिमानाचा दिवस आहे.आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. म्हणजेच संविधान लागु केल्याचा दिवस. परंतु आपल्या यातील बहुतांश जणांना माहिती नसेल की, प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? ” प्रजा” म्हणजे “जनता” आणि सत्ता म्हणजे “शासन”.

ज्या दिवशी आपल्या भारत देशामध्ये संविधान लागू करून आपल्या भारत देशा बद्दल जनताचे शासन ही प्रणाली अस्तित्वात आली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक दिवस देखील म्हटले जाते.

नसे फ़क्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच!

समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक.

गुलामगिरी संपली, झाले गणराज्य!

सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक

इंग्रजांच्या गुलामगिरीच्या राजवटी खाली अडकलेला व्यक्ती 26 जानेवारी या दिवशी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन देशाचा मालक झाला. 26 जानेवारी म्हणजे तो दिवस ज्या दिवशी भारताला समृद्ध, पवित्र असे सविधान मिळाले. आज आपल्या देशामध्ये जे काही घडत आहेत ते केवळ संविधानामुळेच. आपल्या देशाची प्रजासत्ताक झाली. सविधाना मार्फत आपल्या देशाची सर्वात मोठी लोकशाही अवतरली व आपल्या देशामध्ये लोकशाही प्रणाली अस्तित्वात आली.

लोकशाही म्हणजे, “लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांकडून चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.”

रक्ताने लिहिला आहे,

भारत देशाचा इतिहास…

हसत-हसत स्वीकारले आहे,

कित्येकांनी मृत्यूचे ते फास….

आज आपण ज्या लोकशाही राजवटीखाली आहोत ते शक्य झाले ते केवळ थोर महान क्रांतीकारांचा बलिदानामुळेच. ज्या ज्या क्रांती कारणे आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने अशा क्रांतीकारांचा कोटी कोटी प्रणाम !

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वतंत्र मिळालेले असले. तरीही देशातले लोक सैरभैर झालेले होते. विभिन्न तुकड्यात देश विभागलेला होता. अश्या दिशाहीन व भरकटलेल्या देशाच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती नियामावली. भारतीय म्हणुन पाळावयाचे नियम.

आपला देश हा प्रजासत्ताक झाला आणि लोकशाही प्रणाली देखील आपल्या देशांमध्ये अस्तित्वात आली हे केवळ शक्य झाले ते म्हणजे संविधानामुळेच… भारतामध्ये सर्वाना शांततेत, सुखासमधानाने जागता यावे. स्वातंत्र्याचा आनंद घेत-घेत नांदता यावे. म्हणुन, संविधान निर्मितीचे महान कार्य सुरु झाले.

म्हणून दरवर्षी आपण प्रजासत्ताक हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे “संविधान” आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताला प्रजासत्ताक करून देण्यामध्ये आणि भारताला समृद्ध करून देण्यामागे खूप महत्वाचा वाटा आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या जबाबदारी खाली 2 वर्ष 11 महीने आणि 18 दिवसाच्या काळामध्ये संविधानाची निर्मिती करण्यात आली.

26 नोव्हेंबर 1949 रोजी आधिकृतपने संविधानाचा स्वीकार करण्यात आला. व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावानी करण्यात आली.

संविधानाने नागरिकांना विविध हक्क प्रदान केले. त्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला जो न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व अशा कितीतरी हक्कांचा समावेश होतो.

मित्रांनो आपला भारत देशा खूप पवित्र आहे. आपल्या भारत देशाची संस्कृती, सभ्यता जगभरात जपली जाते. कित्तेक देशातील लोक आपल्या देशाची कौतुक करतात.

प्रजासत्ताक देशाचे पावित्र आपन सर्वानी राखलेच पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार जसे आपल्याला माहिती आहे. तसेच कर्तव्य ही आपण जनून घेतले पाहिजे. व त्याचा आदर केला पाहिजे.

देशांमध्ये येणाऱ्या समस्या ही माझी समस्या आहे हे समजून आपण ते सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. मी माझा भारत देशाचा नागरिक आहे व देशाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे ही भावना देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात रूजायाला हवी.देशाचा प्रत्येक देशबांधव माझा बांधव आहे. असे वागून संविधानाचा सन्मान करुया.  देशाचे तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे, त्यामुळे आजच्या तरूण पिढीला योग्य शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गावर घेऊन जायला पाहिजे.

सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट करुण लोकशाही बळकट करुया. आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असे वागुया.

भारत मातेला स्वतंत्र करून देण्यासाठी कित्येक क्रांतिवीरांच्या स्वतःच्या प्राण्याची आहुती दिली. त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट कधीही विसरता कामा नये आणि आपल्या भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणि स्वातंत्र होणयासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करायला हवा.

जेव्हापासून आपला देश एक प्रजासत्ताक बनला. तेव्हापासुन आपला भारत खुप प्रगतशील राष्ट्र बनला आहे. आपला भारत एक शेतिप्रधान राष्ट्र आहे. मि एका उन्नतशील, स्वतंत्र्य, व प्रजासत्ताक राष्ट्रात राहतो. याचा माला फार अभिमान आहे. व या मंगलप्रंसंगी तुम्ही सर्वजन उपस्थित राहिलात. याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन करुन मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम लावतो.

जय हिंद! जय भारत!

तर मित्रांनो ! ” 26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

2 thoughts on “26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi ”

Leave a Comment