अर्ध चक्रासन माहिती मराठी आणि त्याचे फायदे । Ardha Chakrasana Information in Marathi

Ardha Chakrasana Information in Marathi आपले शरीर आपल्याला निरोगी ठेवायचे असेल तर शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पुरेसा व्यायाम किंवा योगासन करणे हे खूप गरजेचे आहे.

ज्या प्रमाणे व्यायमा चे वेगवेगळे प्रकार पडतात त्याचप्रमाणे योगासनाचे देखील वेगवेगळे प्रकार पडतात.

आजच्या लेखामध्ये Ardha Chakrasana Information in Marathi आपण योगासनाचा चक्रासन प्रकाराबद्दल माहिती पाहणार आहोत.

आम्हाला आशा आहे की, Ardha Chakrasana Information in Marathi हा लेख वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

अर्ध चक्रासन माहिती मराठी आणि त्याचे फायदे । Ardha Chakrasana Information in Marathi

अर्ध चक्रासन योगासना चा एक प्रकार आहे. अर्ध चक्रसानाला इंग्रजीमध्ये हाफ व्हिल पोज असे म्हटले जाते. चक्रा सनाची सुरुवात ताडासनाने होते. आणि त्यानंतर तुम्हाला कंबरेवर हात ठेवून मागच्या बाजूने बांधावे लागते. डोके मागे वळवत तुम्ही आसन पूर्ण करू शकता.

अर्ध चक्रासन तुम्हाला प्रगत बॅक बेंड पोज करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांची पाठीवर कडक ताठरली आहे अशा लोकांसाठी हे आसन खूप फायद्याचे ठरते. सर्व प्रथम हे आसन करण्यासाठी तुम्ही तुमची कंबर पुरेसी लवचिक करायला हवी. त्यानंतरच तुम्ही अर्ध चक्रासन करण्यास सुरुवात करावी.

अर्ध चक्रासन म्हणजे काय? What is semicircle in Marathi

अर्ध चक्रसाना हा आधुनिक योग प्रकारातील एक प्रकार आहे. अर्ध चक्रासन हा शब्द संस्कृत भाषेतील तीन शब्द पासून बनलेला आहे. अर्ध चक्र आणि आसन या तीन शब्दांपासून अर्धचक्रासन हा शब्द तयार होतो.

अर्ध म्हणजे अर्धा, चक्र म्हणजे चाक आणि आसन म्हणजे मुद्रा होय. या आसनामध्ये तुमचे शरीर हाफ विविध आकारांमध्ये मोडते म्हणून या आसनाला हाफ व्हिल पोज या नावाने देखील ओळखले जाते.

अर्ध चक्रासन करण्याची पद्धती How to do ardha Chakrasana in Marathi

अर्ध चक्रासन करण्याची पद्धती खूप सोपी आहे. आजच्या Ardha Chakrasana Information in Marathi लेखामध्ये आम्ही अर्ध चक्रासन करण्याची पद्धती How to do ardha Chakrasana in Marathi घेवून आलोत त्या पुढील प्रमाणे-

 1. सर्वप्रथम अर्ध चक्रासन करण्यासाठी दोन्ही पाय जवळ ठेवून हात शरीराजवळ ठेवावे.
 2. शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान ठेवावे.
 3. श्वास घेत दोन्ही हात कानाजवळ नेऊन दोन्ही तळहात एकमेकांसमोर यावेत अशा अवस्थेत उभा राहावे.
 4. श्वास सोडत नितंब पुढे घेऊन, मागे झुकू या, हात कानाजवळ ठेवून शक्य तेवढे मागे झुकावे. असे करत असताना कोपर आणि गुडघे ताठ आहेत का नाही याची खात्री करावी. डोके ताठ ठेवत छाती आभाळा कडे करावी.
 5. श्वासो श्वास सुरू ठेवत अशा परिस्थितीमध्ये काही वेळ उभे राहावे.
 6. श्वास सोडत हात खाली आणून विश्राम घ्यावा.

अर्ध चक्रासनाचे फायदे । Benefits of Ardha Chakrasana in Marathi.

प्रत्येक योगासनाचे काहीना काही फायदे असतात त्याप्रमाणेच अर्ध चक्रासनाचे देखील फायदे आहेत. आजच्या Ardha Chakrasan information in Marathi लेखांमधून आम्ही अर्थचक्रासनाचे फायदे benefits of Ardha Chakrasan in Marathi सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते पुढीलप्रमाणे-

 1. कंबरे साठी फायदेशीर :

अर्ध चक्रासन कंबरे साठी अतिशय योग्य योगासनाचा प्रकार आहे. जर तुम्हाला कंबर किंवा पाठ दुखीचा त्रास असेल तर तुम्ही दररोज अर्धा तास अर्ध चक्रासन करावे. तसेच बसून काम करणारे व्यक्ती बँकेमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती थोडक्यात खुर्चीवर बसून राहणाऱ्या व्यक्तींसाठी अर्ध चक्रासन हे वरदान ठरते.

 1. पाठीच्या स्नायूंसाठी फायदेशीर :

अर्ध चक्रासन यामुळे पाठीच्या स्नायूंना मध्ये समतोल ताण निर्माण होतो तसेच अधिक झालेला ताण कमी करण्यासाठी अर्ध चक्रासन फायद्याचे ठरते.

 1. मणक्या साठी फायदेशीर :

जर तुम्हाला तुमच्या पाठीचा कणा निरोगी ठेवायचा असेल तर तुम्ही दररोज अर्धा तास अर्ध चक्रासन करावे. अर्ध चक्रासन हे तुमच्या पाठीच्या मणक्याला लवचिक बनविते.

 1. पोटाच्या चरबी साठी फायदेशीर :

नियमितपणे अर्ध चक्रासन याचा सराव केल्यास तुमच्या पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.

 1. मधुमेहासाठी फायदेशीर :

नियमितपणे अर्ध चक्रासनाचा सराव केल्यास रक्तातील अतिरिक्त साखर नियंत्रित होते. तसेच यामुळे स्वादुपिंड सक्रिय होते आणि रक्तातील इन्सुलिनची योग्य मात्रा नियंत्रण राखण्यास मदत होते.

 1. मानेच्या विश्रांतीसाठी फायदेशीर :

अर्ध चक्रासना मुळे मान दुखी कमी होते आणि मानेला विश्रांती मिळते.

अर्ध चक्रासन कोणी करू नये? अर्ध चक्रासनासाठी खबरदारी

 1. ज्या व्यक्तींना माकडहाड आणि कमरेच्या समस्या असतील अशा व्यक्तींनी अर्ध चक्रासन करू नये.
 2. तसेच उच्च रक्तदाब आणि मानसिक विकार असणाऱ्या व्यक्तींनी अर्थ चक्रासन करू नये.
 3. ज्यांच्या आमाशय आणि ग्रहणीमध्ये व्रण असतील तसेच हर्नियाचा त्रास असेल तर हे आसन करू नये.
 4. गर्भवती स्त्रियांनी हे आसन करू नये.
 5. पाठदुखीमध्ये अर्ध चक्रासन करणे टाळा.
 6. ज्यांना स्लिप डिस्क आणि सायटिका आहे त्यांनी ही योगाभ्यास तज्ञांच्या देखरेखीखाली करावी.
 7. हे आसन केल्यानंतर पुढे वाकण्याची मुद्रा करावे.

तर मित्रांनो ! ” Ardha Chakrasana Information in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment