Banana Tree Information in Marathi | केळीच्या झाडाची माहिती मराठी

Banana Tree Information in Marathi केळी साधारणता सर्वांच्याच परिचयाचे असेल. तसेच जवळजवळ सर्वच लोकांना केळी हे फळ आवडते साधारणत बारा महिने मिळणारे म्हणजे केळी. केळी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असून भारतीय संस्कृतीमध्ये देखील केळीच्या झाडाला यांना महत्त्वाचे स्थान आहे केळीच्या झाडाचा प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो हे सर्व दृष्टीने फायद्याचे ठरते.

आजच्या या लेखा मध्ये आपण केळीच्या झाडाची माहिती मराठी । Banana Tree Information in Marathi बघणार आहोत. चला तर Banana विषयी संपूर्ण माहिती पाहूया.

केळीच्या झाडाची माहिती मराठी

हे झाड मूळचे दक्षिण आशिया मधील असून केळीचे शास्त्रीय नाव ” मुसा इंडिका” असे आहे तर केलेला इंग्रजी भाषेमध्ये “बनाना (banana)” असे म्हणतात. भारतामध्ये साधारणता सर्व आढळणारे केळी हे झाड उंचीने 2 ते आठ मीटर पर्यंत असते. केळीचे पाने सरळ खोडातून येऊन ती गुळगुळीत निमुळत्या आकाराची व लांब असतात.

Banana Tree Information in Marathi | केळीच्या झाडाची माहिती मराठी

केळी झाड प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. विस्तृत, लांब, मोहक पाने आणि वेगवान वाढ असणारे व खोडाला फळे येणारे हेच झाड भारतामध्ये सर्वत्रच पहायला मिळते.

केळीच्या झाडाचे वर्णन :

केळीचे झाड हे साधारण दोन ते आठ मीटर उंचीपर्यंत चे असते. केळीच्या झाडाची पाने सरळ खोडातून येतात व ति गुळगुळीत आणि गडद हिरव्या रंगाचे असतात. लांबून ही पाने मोठ्या रुंदीच्या पात्या सारखे दिसतात.

केळीच्या झाडाला सीजन नुसार फुले येण्यासाठी गुच्छ येतो त्याला फुलोरा असे म्हणतात. तो फुलोरा साधारणता जांभळ्या रंगाचा असतो तर या फुलोरा चर्या खालच्या बाजूला मादी फुले असतात तर वरच्या टोकाला नर फुले असतात. या फुलोऱ्याच्या पाकळ्या एका मागे एक अशा गळून पडतात. केला येणारी फळे ही उघडा च्या रूपामध्ये येतात त्यालाच लोंगर असे म्हणतात. एका गडामध्ये साधारणता केळीच्या 10 फण्या असतात. या प्रत्येक फण्या मध्ये साधारणता सोळा ते अठरा केळी असतात. सुरवातीला या केळ्यांचा रंग हिरवा असतो. ऐकल्यानंतर ही केळी पिवळ्या रंगाचे होतात.

केळी लागवड माहिती :

भारत देशामध्ये केळी खूप मोठ्या प्रमाणात पिकवली जाते म्हणूनच जगभरामध्ये भारत देशाचा केळी उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो. तर व्यापारी दृष्टीने केळी पिकवणारा हा महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रेसर राज्य आहे. जागतिक उत्पादनापैकी 20 टक्के भारत देशातून होते तर भारत देशातील उत्पादनापैकी 50 टक्के केळी उत्पादन हे केवळ महाराष्ट्र राज्यातून होते. यावरुन आपल्याला कळेल की महाराष्ट्र राज्यामध्ये केळी किती मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. महाराष्ट्र राज्यातील जवळगाव हा जिल्हा केळी पिकवण्यासाठी अग्रेसर आहे.

हवामान :

केळी हे पीक मुख्यतः उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात येते. केळीच्या उत्तम वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी केळीला 10 ते 400 सेल्सिअस तापमान असणे गरजेचे आहे.

जमीन :

केळी लागवड करण्यासाठी जमीन भुसभुशीत पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीचे असणे गरजेचे आहे. तसेच पोयटायुक्त, भरपूर सेंद्रिय कर्ब असलेली जमीन आणि 60 सेंटिमीटर खोल असलेली जमीन उत्तम ठरते.

केळीचे वाण :

महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत आणि ग्रँड नैन या वाणांची केळी लागवड केली जाते. केळीची लागवड ही वर्षभरामध्ये दोन वेळेस केली जाते एक म्हणजे जून- जुलै महिना आणि दुसरा हंगाम म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दरम्यान.

केळीच्या झाडाचे प्रकार किंवा जाते :

केळीच्या झाडाच्या भरपूर प्रकार पाहायला मिळतात परंतु त्यातील काही प्रकारांची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. केळीच्या झाडाच्या साधारणता तीस ते चाळीस जाती असून वेगवेगळ्या भागानुसार त्यांची वेगवेगळी नावे आहेत.

भारतातील काही केळीच्या झाडांचे प्रकार पुढील प्रमाणे, हरिसाल, लाल वेलची, सफेद वेलची, मुठेळी, वाल्हा, राजेळी, लाल केळी इत्यादी.

केळीच्या झाडाचे उपयोग :

केळीचे झाड लिंबू उपयोगी झाड आहे त्यांच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे केला जातो हिंदू संस्कृतीमध्ये केळीच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.

हिंदू संस्कृती मध्ये धार्मिक कार्यामध्ये केळीच्या झाडाला खूप महत्त्व दिले जाते लग्नसमारंभ किंवा देवी-देवतांचे कार्यक्रमांच्या वेळी सर्वप्रथम केळीच्या झाडाचे बुड म्हणजेच कन्या आणि पाळणे यांना शुभसूचक मानले जाते देवी-देवतांना केलेला नैवेद्य हा केळीच्या पाण्यामध्ये ठेवणे अधिकच शुभ मानले जाते.

पूर्वीच्या काळापासूनच केळीच्या झाडाला लागणारे फळ म्हणजेच केळी हे खाण्यासाठी वापरले जाते मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळणारी आणि सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे केळी होय.

केळी पासून वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले जातात जसे की केळी वेफर्स, केळीचा ज्याम, केळीची भुकटी, केळीची दारू, केळीचे बिस्कीट असे कितीतरी पदार्थ केळीपासून तयार केले जातात. तसेच कच्चा केळी पासून केळीची भाजी देखील केली जाते.

दक्षिण भारतामध्ये केळीच्या पानाचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो असे मानले जाते की केळीच्या पाना मध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि या पाण्यामध्ये जेवण केल्याने त्यातील पोषक त्यांना अन्नात मिसळतात व ते आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते.

केळी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याचे ठरते केळी मध्ये असणारे वेगवेगळे जीवनसत्व हे आपल्या आरोग्यास उपयुक्त ठरतात.

कच्चा केळी मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन बी, विटामिन सी आणि स्टार्च प्रमाण आढळते.

वाळलेल्या केळी चा पानांचा उपयोग कक्षा धडा साठी केला जातो तर काही ठिकाणी इंधन जण म्हणून देखील वापरले जातात.

केळीच्या खोडाचे व पाण्याचे बारीक बारीक तुकडे करून ते जनावरांचा चारा म्हणून वापरले जातात.

केळीच्या सुकलेल्या पानांचा उपयोग दोरा म्हणून जातो.

तर मित्रांनो ! ” Banana Tree Information in Marathi | केळीच्या झाडाची माहिती मराठी “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!

Leave a Comment