Cinnamon in Marathi | जाणून घ्या दालचिनी खाण्याचे फायदे ( Dalchini Benefits in Marathi ) | दालचिनी मराठी माहिती

Cinnamon in Marathi मित्रानो जगभरामध्ये मसाला मध्ये विविध प्रकारच्या पदार्थांचा वापर केला जातो. आजच्या लेखातून दालचिनी या मसाल्याची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, Cinnamon in Marathi | जाणून घ्या दालचिनी खाण्याचे फायदे ( Dalchini benefits in Marathi ) | दालचिनी मराठी माहिती

Cinnamon म्हणजे ज्याला मराठी भाषेमध्ये दालचिनी असे म्हणतात. दालचिनी मसाला मध्ये वापरला जाणारा खाण्याचा प्रकार आहे.

Cinnamon ला दालचिनी, दालचिनी वेरम आणि सिलोन दालचिनी या नावाने देखील ओळखले जाते.

Cinnamon लॉरेल कुटुंबातील एक झुडपे सदाहरित वृक्ष लौरसी आहे. या वृक्षाच्या सालीचा काढलेला मसाला त्यालाच दालचिनी म्हणून ओळखले जाते.

Cinnamon in Marathi | जाणून घ्या दालचिनी खाण्याचे फायदे दालचिनी मराठी माहिती

Cinnamon हा मूळचा श्रीलंका, भारतातील मलबार कोस्ट आणि म्यानमार बर्मा येथील असून या वृक्षाची लागवड अमेरिका आणि वेस्ट इंडीज मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते.

झाडाच्या वाळलेल्या सालीपासून बनवलेला हा मसाला मुख्यता तपकिरी रंगाचा असून त्याला कोमट गोड चव असते. दालचिनी चा उपयोग मिठाईच्या पदार्थांपासून स्वयंपाक घरातील सर्व पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

अन्य, वाईन, परफ्युम आणि विविध औषधे तसेच आयुर्वेदामध्ये देखील cinnamon चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Cinnamon चा वापर प्रामुख्याने सुगंधित मसाला आणि चव तयार करणारा पदार्थ म्हणून केला जातो.

सध्याच्या काळामध्ये दालचिनी ला तजास्त किंमत नसेल तरी एकेकाळी दालचिनी ची किंमत सोन्या पेक्षा अधिक मौल्यवान होती. ईजिप्तमध्ये हे शवविच्छेदन आणि धार्मिक पद्धती‌ साठी शोधले गेले होते. मध्ययुगीन युरोपमध्ये दालचिनीचा वापर धार्मिक संस्कार आणि चव घेण्यासाठी केला जात होता. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारातील सर्वात महत्त्वाचा आणि किमतीचा मसाला म्हणून दालचिनी ला ओळखले जात होते.

दालचिनी म्हणजे काय? What is Cinnamon in Marathi

दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे ज्याचा वापर मुख्यत मसाला म्हणून केला जातो. दालचिनीभ या जातीच्या वृक्षाच्या आतील साली पासून हा मसाला बनवला जातो. दालचिनीचा वापर मुख्यता सुगंधित मसाला आणि चव तयार करणारा पदार्थ म्हणून वापरला जातो.

विविध प्रकारचे डिश, गोड, मिठाई, ब्रेकफास्ट, फास्ट फूड, स्नॅक्स आणि पारंपारिक पदार्थ या सर्वांमध्ये दालचिनीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

दालचिनीची चव आणि सुगंध कसा असतो? Taste and Smell of Cinnamon in Marathi

दालचिनी ला कोमट गोड अशीच असते. दालचिनीला चव एका सुगंधित तेलामुळे प्राप्त झाली आहे. दालचिनीचा रंग हा साधारणता सोनेरी पिवळ्या रंगाचा असतो. दालचिनीचा वैशिष्टपूर्ण वास आणि सुगंधी चव यामुळे खूप लोकप्रिय आहे. दालचिनी ला तीक्ष्ण चव आणि सुगंधी गंध हा सिन्नल्डेहाइड पासून येते आणि ऑक्सिजन ची प्रतिक्रिया जसजसे येते तसतसा दालचिनीचा रंग अधिकच गडद होत जातो. आणि त्याचा सुगंध देखील वाढत जातो. दालचिनीच्या घटकांमधील सुमारे 80 सुगंधित यौगिकांचा सामावेश आहे.

दालचिनी असणारे मुख्य घटक Ingredients in cinnamon in Marathi

छोट्याशा आणि सदाहरित झाडांपासून मिळणारी दालचिनी नेहमी सुवासिक आणि मसाला मध्ये वापरला जाणारा एक पदार्थ आहे. दालचिनीच्या झाडाच्या साला चा वापर मसाला मध्ये केला जातो. तसेच या पासून काढले जाणारे तेल ही विविध प्रकारे वापरले जाते.

दालचिनी मध्ये बरेच आवश्यक घटक असतात जे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे ठरतात म्हणूनच दालचिनीचा वापर स्वयंपाक घरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

दालचिनी मध्ये असणारे मुख्य घटक Ingredients in Cinnamon in Marathi पुढीलप्रमाणे;

फॉस्फरस, प्रोटीन, थायमिन, सोडियम, विटामिन, कॅल्शियम, मॅगेनीज, पोटॅशियम नियासिन, कार्बोहाइड्रेट इत्यादी महत्वपूर्ण तत्व दालचिनी मध्ये आढळतात. या सर्व घटकांमुळे दालचिनीची जवळ थोडीशी गोड आणि तिखट असते. स्वयंपाकातील पदार्थाची चव वाढवण्यासाठी सोबतच दालचिनी कफ निगडित समस्यावर मात देण्यासाठी फायद्याची ठरते. त्यामुळे अनेक औषधी गुणधर्म मध्ये तसेच आयुर्वेदामध्ये दालचिनीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.

दालचिनी तील औषधी गुणधर्म

1. दाह विरोधी :

दालचिनी मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे दालचिनीतील दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील संक्रमणांवर प्रभावीपणे लढायला परवानगी देतात. त्या व्यतिरिक्त दालचिनी हा मसाला शरीरातील ऊतींचे नुकसान सुधारण्यास मदत करतो.

2. ऑंटीऑक्सीडंट्स :

दालचिनी मध्ये ऑंटीऑक्सीडंट्स आणि पाॅलीफेनॉलने असे गुणधर्म असतात. त्यामुळे दालचिनी आपल्या शरीरातील मुक्त रेडिकल्सशी लढण्यासाठी मदत करते. त्यामधून शरीरातील पेशींना हानीकारक जिवाणूंपासून संरक्षण होते.

3. हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधित :

दालचिनी हा एक अतिशय प्रभावी मसाला आहे जो शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल मी करतो आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी मदत करतो. क्या माहेर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधित विकार कमी होण्यासाठी Cinnamon फायद्याची ठरते.

4. कर्करोग विरोधी :

आपले शरीर वेळोवेळी कर्करोगाचे पेशी तयार करत असते. त्यामुळे अशा पेशींचा प्रभाव संपूर्ण शरीरामध्ये पचन करण्याआधी त्यांना रोखणे महत्त्वाचे असते. दालचिनी कर्करोगाच्या पेशी विरोधी विषारी घटक प्रमाणे कार्य करते. त्यामुळे दालचिनीचे सेवन केल्यास शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.

दालचिनी चे फायदे | 5 Health Benefits of Cinnamon in Marathi

दालचिनी चवीला तिखट गोड असते. तसेच दालचिनी उष्ण, पाचक, मूत्रल , कफनाशक आणि स्तंभक अशा विविध गुणधर्म युक्त आहे. दालचिनीचे सेवन मनाची अस्वस्थता कमी करते, यकृताचे कार्य सुधारते, स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे दालचिनी आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. आजच्या लेखातून Cinnamon in Marathi | जाणून घ्या दालचिनी खाण्याचे फायदे Dalchini Benefits in Marathi | दालचिनी मराठी माहिती

आम्ही दालचिनी चे फायदे | 5 Health Benefits of Cinnamon in Marathi सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते पुढील प्रमाणे;

1. सर्दी साठी | Cough and cold

चिमुटभर दालचिनी ची पावडर पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये चिमूटभर मिरची पावडर आणि एक चमचा मध घालून त्या मिश्रणाचे सेवन केले असता जुनाट सर्दी, बसलेला घसा, सुजलेला घसा, कफ, मलेरिया कमी होण्यास मदत होते.

2. पचाने विकार | Digestive Disorders

पचन संबंधीचे कुठलेही विकार असल्यास दालचिनीचे सेवन केल्यास ते विकार कमी होण्यास मदत होते.

  1. अपचन, पोटदुखी, अजीर्ण कमी करण्यासाठी दालचिनी, सुंठ, वेलदोडे समप्रमाणात घेऊन त्यांची पेस्ट करावी व ती गरम पाण्यात टाकून पिल्यास आराम मिळतो.
  2. चिमुटभर दालचिनी, मिरीपूड आणि एक चमचा मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.
  3. मळमळ, उलटी आणि जुलाब लागल्यास दालचिनीचे सेवन केल्यास आराम मिळतो.

3. स्त्रीरोग | Gynaecological benefits

  1. अंगावरून जाणे, गर्भाशयाचे विकार त्यांवर दालचिनी खूप उपयुक्त ठरते.
  2. महिलांच्या प्रसुतीनंतर महिनाभर दालचिनीचा तुकडा चघळल्यास लवकर गर्भधारणा होत नाही.
  3. महालक्ष्मीच्या सेवनामुळे गर्भवती महिलांच्या स्तनातील दूध वाढते.

4. स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी :

दालचिनीची पाने आणि अंतर साल स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी वापरतात. मिठाई, केक पासून ते स्वयंपाकघरात बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये दालचिनीचा वापर केला जातो.

दालचिनीचे सुगंधी तेल द्रव्यात, मिठाई आणि इतर पेयांमध्ये वापरतात.

सौंदर्यासाठी दालचिनी चे फायदे ( Benefits of Cinnamon in Marathi for Beauty)

आरोग्यासाठी दालचिनी किती फायद्याचे आहे ते आता वरती जाणून घेतलेच आहे. आता आपण सौंदर्यासाठी दालचिनी चे फायदे जाणून घेणार आहोत.

1. रंग उजळण्यासाठी फायदेशीर :

रंग उजळण्यासाठी दालचिनी अत्यंत फायदेशीर ठरते. दालचिनी मध्ये असणारे ब्लिचिंग एजंट तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी मदत करतात. त्यासाठी चिमुटभर दालचिनी पूड मध्ये एक चमचा मध एक चमचा दही घालून त्याचे मास्क चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळण्या मध्ये मदत होते.

2. पिंपल्स कमी करण्यासाठी फायदेशीर :

पिंपल्स वर दालचिनी एक उत्तम इलाज म्हणून काम करते. पिंपल्स कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायद्याची ठरते.

3. मृत्त त्वचा दूर करण्यासाठी फायदेशीर :

आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील त्वचा काळी पडलेली दिसते म्हणजे त्यांची त्वचा मृत्त झालेली असते. दालचिनी चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

4. केसांची वाढ करण्यासाठी फायदेशीर :

केसांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी त्यांच्या खूप फायद्याचे ठरते.

केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी आपण दालचीनी आणि मधाचा वापर करू शकतो. त्याकरिता एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचे मध, एक चमचा दालचिनी आणि अंडी एकत्रित करून यांचे मिश्रण करून केसाला लावून वीस मिनिटे ठेवावे व त्यानंतर केस धुवावेत. असे केल्याने केस वाढण्यासाठी मदत होते.

5. टाळू साफ करण्यासाठी फायदेशीर :

टाळू साफ करण्यासाठी खूप फायद्याची ठरते. एक चमचा ग्राउंड मध्ये एक चमचा मध एकचतुर्थांश उबदार ऑलिव्ह ऑइल घालून मिश्रण तयार करावे. या मिश्रणाने आपल्या टाळूची मालिश करावी. यामुळे आपला रक्तप्रवाह उत्ते जीत होऊन टाळू साफ करण्यासाठी मदत होते.

सावधान | Be Careful to Take While using Dalchini

  • दालचिनीचा गुणधर्म उष्ण असल्याने उन्हाळ्यामध्ये दालचिनीचा वापर खूप कमी करावा.
  • दालचिनीच्या अतिसेवनामुळे पित्त वाढू शकते‌.
  • उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीने दालचिनी जेसेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

तर मित्रांनो ! Cinnamon in Marathi | जाणून घ्या दालचिनी खाण्याचे फायदे ( Dalchini Benefits in Marathi ) | दालचिनी मराठी माहिती “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment