Diabetes Information in Marathi । मधुमेह मराठी माहिती

Diabetes Information in Marathi | मधुमेह मराठी माहिती डायबेटिस ज्याला आपण मधुमेह या नावाने ओळखतो. आजच्या काळामध्ये मधुमेह हा आजार सर्वांच्या परिचयाचा आहे. 10 मधील चार जणांना हमखास मधुमेह हा आजार पाहायला मिळतो.

Diabetes Information in Marathi । मधुमेह मराठी माहिती

आपल्या भारत देशामध्ये मधुमेह आजाराने असलेल्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

Diabetes Information in Marathi । मधुमेह मराठी माहिती

त्यातल्या त्यात डायबिटीस टाईप वन आणि डायबेटीस टाईप टू या श्रेणीमध्ये मधुमेह रुग्णांची संख्या अधिकच पाहायला मिळते.

मधुमेह म्हणजे काय? What is Mean By Diabetes in Marathi

मधुमेह म्हणजे डायबेटीस. मधुमेह ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये शरीरातील रक्तामध्ये साखरेचे स्तर किंवा पातळी नियंत्रित राहत नाही.

प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये पेंक्रियाझ नावाची एक ग्रंथी असते. आणी या ग्रंथीमध्ये इन्सुलिन नावाचं एक हार्मोन तयार होत असते. हे इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज आणि साखरेची मात्रा नियंत्रीत ठेवण्याचे काम करत असते.

परंतु शारीरिक बदलासह आपल्या शरीरातील पेंक्रियाझ नावाची ग्रंथी आपले काम करणे बंद करते त्यामुळे इन्सुलिन देखील तयार होते बंद होते. परिणामी मनुष्य मधुमेह यासारख्या आजारांना बळी पडतात.

मधुमेहामुळे शरीराला काय त्रास होतो?

मधुमेहामुळे आपल्या शरीरातील रक्तामध्ये ग्लुकोज आणि साखरेचे प्रमाण वाढते. शरीरात ग्लुकोज ची मात्रा वाढल्याने आपल्या शरीरामध्ये उपस्थित घटकाचे संतुलन देखील बदलले जाते.

जसे की आपण सर्वांना माहिती आहे की, आपल्या रक्तामध्ये लाल पेशी(RBC) पांढऱ्या पेशी(WBC) आणि प्लाझ्मा आढळतो. तसेच रक्ता सोबत ऑक्सिजन सुद्धा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत असतो.

पण जेव्हा मानवी शरीरामधील रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढते तेव्हा लाल पेशी आपल्या शरीरावर लागलेल्या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी फायद्याच्या ठरतात त्या आपले काम योग्यरीत्या पार पाडू शकत नाही.

आणि पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकारशक्ती प्रदान करतात त्यादेखील अति ग्लुकोजच्या परिणामामुळे त्यांचा प्रभाव नाहीसा होतो. त्यामुळे मधुमेह हा सोबतच मानवी शरीराला आणि वेगवेगळे आजार व व्याधाला लागण्याची शक्यता असते.

आपल्याला माहीतच असेल की, मधुमेह झालेल्या व्यक्तीला एखादी जखम झाली असेल तर ती लवकर बरी होत नाही. कारण त्यांच्या शरीरातील लाल पेशी आपले कार्य करणे बंद करतात त्यामुळे त्यांच्या जखमा लवकर कमी होत नाहीत.

मधुमेहाचे प्रकार । Types of Diabetes in Marathi

मधुमेहाचे सामान्यता तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1. टाइप 1 मधुमेह :

टाइप 1 मधुमेह हा मधुमेहाचा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. Type 1 Diabetes प्रकाराचे रुग्ण डीजे डायबेटिस पासून बरे होत नाहीत कारण त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलीन तयार होण्याची प्रक्रिया बोलता बंद झालेली असते. त्यासाठी त्यांना नेहमीच बाहेरून इंजेक्शनच्या स्वरूपाने इन्सुलिन चा पुरवठा करून घ्यावा लागतो.

2. टाइप 2 मधुमेह :

आयोग्य आहार बैठी जीवन शैली आणि अतिरिक्त वजन यामुळे शरीरात इन्शुलीन तयार होण्याची प्रक्रिया बंद होते त्यामुळे टाइप 2 मधुमेह होतो. टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण संतुलित आहार, नियमित व्यायाम या उपायांनी आपला मधुमेह नियंत्रित करू शकतात. हा सोबतच गोळ्यांची आणि इन्सुलिनची देखील गरज भासू शकते.

3. गरोदरपणातील मधूमेह :

प्रेग्नसी मध्ये अनेक स्त्रियांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता असते. ह्या मधुमेहा वर इन्सुलिन इंजेक्शन द्वारे नियंत्रण करता येते.

मधुमेह होण्याची कारणे | Diabetes Causes in Marathi

 • टाईप एक डायबिटीस प्रामुख्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता च्या विकृतीमुळे, स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करण्याची पातळी नष्ट झाल्याने होतो.
 • टाइप 2 मधुमेह याचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा होय. आजच्या काळामध्ये सर्वाधिक मधुमेहाचे प्रमाण हे लेफ्ट पणामुळे वाढत चालले आहे.
 • अनुवंशिकतेमुळे देखील टाइप 2 मधुमेह हा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील आजी-आजोबा आई-वडील यापैकी कोणाला जर मधुमेह असेल तर तो अनुवंशिकतेने पुढच्या पिढीला देखील होण्याची शक्यता असते.
 • आयोग्य आहारामुळे, जास्त कॅलरीयुक्त आहारामुळे, फास्ट फूड, जंक फूड, मिठाई, शीतपेय, तेलकट पदार्थ इत्यादी पदार्थांचे सेवन केल्याने देखील मधुमेह होण्याची शक्यता आहे.
 • जन्मता 3.5 किलोग्राम पेक्षा जास्त वजनाच्या बाळाला जन्म देणारी स्त्रियांमध्ये टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता असते.
 • ज्या स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह झाला असेल त्यांनी योग्य काळजी घेतली नाही तर पुढील दहा ते पंधरा वर्षांमध्ये त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे..
 • मानसिक ताणतणाव यामुळे देखील मधुमेह होण्याची शक्यता आहे.

मधुमेहाची लक्षणे | Diabetes Symptoms in Marathi

सर्वप्रथम मधुमेह हा आपल्या शरीरामध्ये गुप्त स्वरूपाचा असतो काही काळानंतर मधुमेहाचा आजार उद्भवतो व आपल्याला मधुमेह हा आजार होतो. मधुमेहाची लक्षणे ही रक्ताची चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला खालील प्रकारे लक्षणे जाणवू शकतात.

 1. वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे हे मधुमेहाचे लक्षण आहे.
 2. सतत लघवीला जावे लागणे.
 3. अशक्तपणा येऊन चक्कर येणे.
 4. हात आणि पायात सतत टोचल्यासारखे वाटणे.
 5. जखम भरून येण्यासाठी जास्त कालावधी लागणे.

मधुमेहाचे दुष्परिणाम | Diabetes Effect :

मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने आपल्या शरीरातील मधुमेहावरील नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य काळजी न घेतल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या रुदय, किडन्या, मेंदू, डोळे आणि नाड्यांवर होतो.

त्यामुळे अनियंत्रित डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येणे, अकाली अंधत्व येणे, किडन्या फेल होणे, लकवा किंवा डायबेटिज न्यूरोपथी होऊन पाय कापून काढावे लागणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येण्याचे सर्वात जास्त प्रमाणात आढळून येते.

मधुमेहावरील उपचार | Diabetes Treatment in Marathi

मधुमेहावरील उपचाराचे मुख्य चार उद्देश आहे तो ते पुढील प्रमाणे;

 1. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे.
 2. मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून रुग्णांचा बचाव करणे.
 3. वजन आटोक्यात घेणे किंवा वजन कमी करणे.
 4. उच्च रक्तदाब हृदयविकार यांसारखे आजार होऊ द्यावे त्याकरिता नियमित व्यायाम संतुलित आहार करणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” Madhumeh information in Marathi | Diabetes Information in Marathi । मधुमेह मराठी माहिती “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!

Leave a Comment