Epilepsy Meaning in Marathi | (Fits) एपिलेप्सी म्हणजे काय? आणि मराठी माहिती

Epilepsy Meaning in Marathi त्यांना आपण बऱ्याच वेळा एपिलेप्सी हा शब्द ऐकत असतो. एपिलेप्सी हा एक प्रकारचा आजार आहे आणि आपल्यातील बहुतांश लोक देखील या आजाराला बळी पडलेले आहेत.

परंतु आपल्यातील बहुतांश जणांना एपिलेप्सी म्हणजे काय? किंवा एपिलेप्सी ला मराठी मध्ये काय म्हणतात? व हा आजार नेमका काय असतो याबद्दल माहिती नाही. म्हणून आजच्या लेखामध्ये Epilepsy Meaning in Marathi आम्ही एपिलेप्सी म्हणजे काय? सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आम्हाला आशा आहे की, Epilepsy Meaning in Marathi हा लेख वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

Epilepsy Meaning in Marathi | (Fits) एपिलेप्सी म्हणजे काय?

Epilepsy ला मराठी भाषेमध्ये अपस्मार असे म्हटले जाते. Epilepsy हा एक प्रकारचा आजार आहे या आजारांमध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो.

अचानक आलेल्या झटक्यामुळे रुग्णाची शुद्ध हरवते काही वेळा रुग्ण जमिनीवर पाडतात त्यामुळे शारीरिक इजा होण्याची देखील संभावना असते. मेंदूमध्ये गाठ येणे, ट्यूमर्स तयार होणे किंवा जन्माच्या वेळी काहीतरी दुर्घटनेमुळे झालेला मेंदूच्या इजा त्यामुळे अपस्मार होण्याची शक्यता असते.

What is Epilepsy in Marathi | अपस्मार म्हणजे काय?

अपस्मार हा एक झटका असून अपस्मार मज्जा संस्थेचे संबंधीचा डिसऑर्डर आहे याला न्युरोलॉजिकल डिसऑर्डर देखील म्हणतात.

अपस्मारा या आजारामध्ये रुग्णाच्या मेंदूच्या इलेक्ट्रॉनिक क्रियाकलपांच्या प्रक्रियांमध्ये तात्पुरता अडथळा निर्माण होऊन रुग्णाला पुन्हा पुन्हा फिट्स येतात.

फिट्स येणे, आकडी येणे, मिरगी इत्यादी अनेक नावाने अपस्मार ला ओळखले जाते.

अपस्मारा असणाऱ्या व्यक्ती मधील मुख्य लक्षण म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे फिट्स होय. परंतु अपस्मार असणारे सर्व रुग्ण एक सारखे नसतात कारण काही रुग्णांमध्ये फिट्स चे प्रमाण हे अधिक असते तर काहींमध्ये खूप कमी असते.

एखाद्या रुग्णाला फिट्स येण्याच्या पूर्वी त्या रुग्णाच्या मेंदूचे पूर्णत संतुलन बिघडलेले असते. त्यामुळे त्या रुग्णाच्या शरीराचे संतुलन देखील खराब होते. याचा परिणाम हा व्यक्तीच्या शरीराच्या इतर अवयवांवर ती देखील पाहायला मिळतो.

एपिलेप्सीची लक्षणे | Symptoms of Epilepsy :

अपस्मार या आजाराचे सर्वात मुख्य आणि सामान्य लक्षण म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे फिट्स होत एखाद्या व्यक्तीला जर सतत फिट्स येत असेल तर तो व्यक्ती अपस्मार या आजाराने बाधित आहेत असे समजावे.

याव्यतिरिक्त एपिलेप्सी या आजाराची इतर काही लक्षणे आहेत ती पुढीलप्रमाणे- ताप नसतानाही सतत आचके येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे व गोंधळल्यासारखे भासने, कधीकधी अचानकपणे बेशुद्ध होणे, मलमूत्र विसर्जनाची चे नियंत्रण असल्यासारखे भासणे, तसेच अल्प कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीला अपस्मार असल्यास तो व्यक्ती प्रत्युत्तर देण्यामध्ये अधिक वेळ घेतो. अनुचित वाटणाऱ्या हालचाली पुन्हा पुन्हा करणे, तसेच काहीही कारण नसताना अचानक पणे भीती वाटणे, गंध, स्पर्श, आवाज इत्यादी इंद्रियांमध्ये बदल जाणवणे.

यासारखी अनेक लक्षणे अपस्मार असणाऱ्या व्यक्तींमध्ये जाणवून येतात वरीलपैकी एखादे लक्षण तुमच्यामध्ये देखील दिसत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अपस्मार होण्याची कारणे | Causes of Epilepsy :

आपल्यामधील बहुतांश लोकांमध्ये अपस्मारा आजार दिसून येतो परंतु प्रत्येक व्यक्तीला अपस्मार होण्याची कारणे एकच असू शकत नाही व्यक्तीच्या वेगवेगळ्या स्थानानुसार वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये अपस्मार होण्याची कारणे देखील वेगवेगळी असतात.

काही लोकांना अपस्मारा पदे फिट्स येतात तर काही जणांना अनुवंशिक पणे हा आजार पाहायला मिळतो. अपघातामध्ये डोक्याला झालेली दुखापत, स्ट्रोक किंवा ट्युमर मध्ये मेंदूच्या असलेल्या अवस्थेमुळे, जन्माच्या वेळी मेंदूला झालेल्या इजेमुळे, ऑटिझम किंवा न्यूरोफिब्रोमेटाॅसिस यांसारख्या विकासात्मक विकारांमुळे अपस्मार हा आजार होऊ शकतो किंवा अपस्माराचा झटका येऊ शकतो.

अपस्मार या आजारावर घरगुती उपाय :

सर्व प्रथम अपस्मार असणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावीत.

अपस्मार असणाऱ्या व्यक्तीने पुरेशी झोप घ्यावी.

मन शांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यान धारणा करावी व नियमित व्यायाम करावा.

चहा, कॉफी, सिगारेट, अल्कोहोल तंबाखू इत्यादींचे सेवन टाळावे.

तसेच अपस्मार असणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे आणखी काळजी घ्यावी म्हणजे अपस्माराचा झटका कधीही येऊ शकतो त्यामुळे आपणास माहीत असणार्‍या व्यक्तीने आपल्या जवळ स्वतःचे नाव घरचा पत्ता व नंबर ठेवावा तसेच अपस्मार झाल्यास त्वरित काय उपाय करावा याची देखील माहिती लिहून स्वतःजवळ ठेवावी.

तर मित्रांनो ! ” Epilepsy Meaning in Marathi | (Fits) एपिलेप्सी म्हणजे काय? | एपिलेप्स मराठी माहिती “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment