सर्व फुलांची संपूर्ण माहिती । Flower In Marathi

Flower in Marathi आपल्या निसर्गाने आपल्याला अनेक सुंदर अशा भेट दिलेल्या आहेत, त्यांना आपण देणगी सुद्धा म्हणू शकतो. जसे की, प्राणी, पक्षी आणि सुंदर निसर्ग या व्यतिरिक्त या निसर्गातील सुंदर देणगी म्हणजे फुल होय.

आपल्या आसपास आपल्याला विविध फुले पाहायला मिळतात ज्यांना पाहून आपले मन सुखावत आसतो व आपण आपले दुःख देखील विसरतो. फुलांचे सौंदर्य इतके अद्भुत असते एकदा का फुलांना पाहिले की त्या पहावेसे वाटते. तसेच फुले खूप कोमल असतात.

फुले ही विविध आकाराची, रंगाची आणि प्रकाराचे असतात. आजच्या लेखामध्ये आपण Flower In Marathi फुलां विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, Flower In Marathi.

सर्व फुलांची संपूर्ण माहिती । Flower In Marathi

अनंत काळापासून या सृष्टीवर उमलणारी विविधरंगी फुले पशु, कीटक यांना तर आकर्षित करतात तसेच मनुष्याला देखील फुलांच्या प्रेमामध्ये पडायला भाग पाडतात.

फुलेही दिसायला अतिशय सुंदर आणि कोमल असता फुले विविध आकाराची रंगाची पहायला मिळतात. फुले आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला देखील येतात. फुले हे झाडांचा एक अवयव असतो. फूल झाडांमधील प्रजननाचा एक अवयव असतात फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे अवयव असतात.

आपल्याला तर माहितीच आहे की, प्रत्येक फुलांमध्ये विशिष्ट असा गंध असतो त्याला आपण मध म्हणतो आणि काही कीटक या फुलांमध्ये मध शोषून घेण्यासाठी फुलांच्या पाकळ्या रंगीबिरंगी असतात त्यामुळे आकर्षित होतात.

फुले ही दिसायला अतिशय आकर्षित असतात त्याचबरोबर फुलांना सुवासिक असा सुगंध असतो ज्यामुळे फुले ही प्रत्येकालाच आवडतात.

तसेच फुल झाडाच्या स्त्री आणि पुरुष बिजाचे मीलन घडवून आणण्यासाठी मदत करतात आणि यामधून फळ निर्मिती होते.

काही फुले ही एकट्याने येतात तर काही फुले हि गुच्छा मध्ये येतात गुच्छांमध्ये येणाऱ्या फुलांच्या समूहाला फुलोरा असे म्हटले जाते.

फुलांची रचना । Structure Of Flowers :

फुले म्हणजे झाडांचा प्रजननाचा एक अवयव असतो. शास्त्रीय दृष्ट्या फुलांना झाडाचा पुनरुत्पादनाच्या रचनात्मक अवयव समजला जातो. फुलांचे सौंदर्य व फुलांकडे जाणारा गंध आणि मध यांमुळे किडे फुलांकडे आकर्षित होतात व फुलांमध्ये अंकुरा च्या मार्फत पुनरुत्पादनाची प्रक्रिया होत असते.

प्रत्येक फुलांची रचना ही वेगवेगळी असते काही फुलांची रचना ही झाडांवर अवलंबून असते. या प्रकाराचे झाड असते त्याप्रमाणेच त्या फुलांचा आकार हा असतो.

काही वनस्पती ची फुले खोडांच्या खाचेवर आणि पानाच्या खाचे मध्ये येतात. काही वनस्पतींना फुलेही एकट्याने येतात तर काही वनस्पतीचे फुले गुच्छाने प्रमाणे आहेत त्यांना फुलोरा असे म्हटले जाते. गुलमोहर, पळस यांसारख्या झाडांना येणारा फुलेही फुलोरा मध्ये येतात परंतु त्यांना “अकुंठीत फुलोरा” असे म्हटले जाते. मोगरा जाई-जुई यांसारख्या फुलांना “कुंठित फुलोरा” असे म्हटले जाते.

फुलांचे अवयव । Flower Organs :

एका फुलांमध्ये विविध अवयव असतात ज्यामुळे एक फुल पूर्णता होते त्याचे काही अवयव हे मदतगार आसतात तर काही हे पुनरुत्पादनाचे काम करतात. फुलांचे मुख्यता चार अवयव आहेत ते पुढीलप्रमाणे-

1. पुष्पकोष :

पुष्प कोश हा फुलांचा सर्वात खालचा अवयव असून फुलाच्या देटाशी या अवयवाची रचना पाहायला मिळते. पुष्पकोशला संदल मंडल देखील म्हटले जाते. पुष्प कशाला लहान लहान पाकळ्या असतात त्यांना संदले (sepal) म्हटले जातात. या सदलांचा बहुतांश रंग हा हिरवा असतो. काही फुलांमध्ये हा संदले विविध रंगांची पाहायला मिळतात त्यांना दलाभ(petaloid calyx) असे म्हटले जाते.

तसेच पुष्पकोष हे फुलांचे पुनरुत्पादन करणारे अवयव म्हणजेच परागकोश आणि जयांग यांचे संरक्षण करण्याचे काम देखील करतात.

2. प्रदल मंडल :

प्रदल मंडल फुलांचा पुष्पकोष या अवयवाच्या आतील बाजूस असतो. Corolla च्या पाकळ्यांना प्रदल असे म्हटले जाते. प्रदल मंडळांच्या पाकळ्या या रंगीबिरंगी असतात. होणार उत्पादन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी या पाकळ्या महत्त्वाची भूमिका बजावतात.

3. पुंकेशर :

पुंकेशर हे प्रदल मंडळाच्या आतील बाजूस असते. ज्या भागांचे मिळून पुंकेशर हे बनलेले असते त्यांना केसर्दल असे म्हणतात. केसरदलाचे तीन भाग असतात- केसरतंतू , परागकोश, संधानी.

4. जयांग :

जयांगला स्त्री किज मंडल असे म्हटले जाते ज्या भागांत पासून बनते त्यांना किज असे म्हणतात. कीज मुख्यता तीन भागांमध्ये विभागले जाते.किंजपुट (Ovary), किंजल (Style), कुक्षी (stigma)

विविध फुलांची माहिती | Flower Information In Marathi

आपल्या आजूबाजूला आपण विविध फुले पाहतो. त्यातील काही फुलांची माहिती आम्ही आजच्या flower in Marathi लेखामध्ये देणार आहोत ती पुढील प्रमाणे-

1. गुलाबाचे फुल | Rose Flower Information in Marathi

गुलाबाच्या फुलाला सर्व फुलांमध्ये फुलांचा राजा समजले जाते कारण हे सर्वांच्याच आवडती चे असते गुलाबाच्या फुला हे आकाराने इतर फुलांपेक्षा जरा मोठे असते. गुलाबाच्या फुलाला अतिशय लोकप्रिय समजले जाते कारण हे फुल सामान्यता सर्वांचे ठिकाणी आढळते.

गुलाबाचे फुल हे वेगवेगळ्या रंगांमध्ये पाहायला मिळते जसे की, लाल, गुलाबी पिवळा, पांढरा, केशरी, चॉकलेटी .

बाजारपेठेमध्ये देखील गुलाबाच्या फुलांना खूप मागणी आहे गुलाबाच्या फुलांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो जसे की परफ्युम बनवणे, गुलकंद, देवाला वाहण्यासाठी, केसांमध्ये लावण्यासाठी आणि हार बनविण्यासाठी.

भारत देशामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने सर्वाधिक प्रमाणात गुलाब फुलाची लागवड केली जाते. भारतामध्ये आढळणाऱ्या मूळ गुलाबाचा रंग लाल असून त्याचे शास्त्रीय नाव हायब्रिडा असे आहे.

2. कमळाचे फूल | Lotus Flower Information in Marathi :

कमळाचे फूल हे सर्व फुलांपेक्षा आकाराने मोठे असतात. कमळाच्या फुलाचे शास्त्रीय नाव नेल्म्बो न्यूसिफेरा असे आहे. कमळाचे फूल हे खूप प्राचीन फुल आहे भारतामध्ये या फुलाला खूपच पवित्र मानले जाते.

धनाची देवी लक्ष्मी माता हे कमळावर बसलेली पाहायला मिळतात तसेच ब्रह्मदेव देखील कमळावर विराजमान झालेले पाहायला मिळतात. व विद्येची देवता सरस्वती देखील कमळावर बसलेले त्यामुळे कमळाच्या फुलाला अधिकच महत्त्वाचे स्थान आहे.

एवढेच नसून पुरातन काळामध्ये देखील कमळाच्या फुलाला विशेष स्थान आहे. कमळाचे फूल खूपच अशुभ मानले जाते कमळाच्या फुलाची पवित्रता आणि सुंदरता पाहून भारत देशाने कमळाच्या फुलाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे.

कमळाचे फुल हे मुख्यता जास्त पाणी आणि दलदलीच्या भागांमध्ये पाहायला मिळते. कमळाचे फुल विविध रंगांमध्ये पाहायला मिळते जसे की, गुलाबी, पांढरे , निळे, जांभळे, केशरी.

3. सूर्यफूल | Sunflower Information in Marathi :

फुलाला सूर्यफूल म्हणण्याचे कारण म्हणजे या फुलाची टेशन सूर्याप्रमाणे बदलत जाते त्याप्रमाणे सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो त्याप्रमाणे जसा सूर्य फिरतो तसेच या फुलाची दिशा देखील बदलत असते म्हणून याला सूर्यफूल असे म्हणतात. हे फुल मुख्यता पिवळ्या रंगाचे असते व या फुलाच्या मध्यभागी काळ्या रंगाच्या बिया असतात.

सूर्यफूल हे सुगंध मुक्त फुल आहे म्हणजेच या फुलाला कसल्याही प्रकारचा सुगंध नसतो. सूर्यफूल है बऱ्याच काळापर्यंत फुललेले दिसते.

4. चाफा चे फुल | Chafa Flower Information in Marathi

चाफ्याचे फूल हे दिसायला खूपच सुंदर असते व या फुलाला सुगंध देखील खूपच सुवासिक असतो. इंग्रजी मध्ये चाफ्याच्या फुलाला प्लूमेरिया असे म्हटले जाते. चाफ्याचे फूल हे विविध रंगाचे पाहायला माहिती साधारणत पिवळ्या आणि पांढ-या रंगाच्या चाफ्याच्या फुलांचा सोनचाफा म्हणून ओळखले जाते.

चाफाच्या फुलाचे प्रामुख्याने 5 प्रकार आहेत. सोन चंपा, नाग चंपा, कनक चंपा, सुलतान चंपा कथारी चंपा. 

चाफ्याचे फूल हे महादेवाचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते म्हणून भगवान शिवशंकर यांना ही फुले मोठ्या प्रमाणात वाहिली जातात.

5. जास्वंद फुल । Hibiscus Flower Information in Marathi :

सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचे आवडते चे फूल म्हणजे जास्वंदीचे फूल होय. जास्वंदीच्या फुलाला इंग्रजी भाषेमध्ये हिबिस्कस नावाने ओळखले जाते. संस्कृत भाषेमध्ये जास्वंदीला जपा गुजरात मध्ये जासूद आणि बंगालीमध्ये जुबा अशा वेगवेगळ्या नावाने जास्वंदीच्या फुला ला ओळखले जाते.

जास्वंदीच्या फुलाचा वापरा हा आयुर्वेदामध्ये देखील अनेक उपचारांवर केला जातो. जास्वंदीचे झाड हे मुख्यतः झुडपां प्रमाणे असते. यांची उंची साधारण पंधरा फूट पर्यंत असते. जास्वंदीची फुले ही लाल, पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या, केशरी अशा विविध रंगांमध्ये आढळतात.

6. रजनीगंधा चे फुल | Tuberose Flower Information in Marathi :

रजनीगंधा चे फुले हे पांढऱ्या रंगाचे असून यांचा आकार फनेल सारखा असतो. हे फूल खूपच सुगंधित असते रजनीगंधा चे फुल दीर्घकाळ टिकून राहते. देवाला वाहण्यासाठी आणि हारांमध्ये या फुलांचा वापर केला जातो तसेच डेकोरेशन मध्ये देखील हे फुल वापरले जातात. भारतामध्ये सर्वत्रच हे फुले पहायला मिळतात.

फुलांचा उपयोग | Uses of Flower in Marathi :

फुलांचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो मुख्यता फुले ही सुशोभीकरणासाठी वापरली जातात. तसेच देवाला वाहण्यासाठी, केसांमध्ये लावण्यासाठी, आणि हार बनविण्यासाठी फुले वापरली जातात काही काही फुलांचा उपयोग आयुर्वेदामध्ये उपचारांवर औषधी म्हणून केला जातो.

गुलाब यांसारख्या फुलांचा वापर खाण्यासाठी केला जातो जसे की गुलकंद.

तर मित्रांनो ! ” सर्व फुलांची संपूर्ण माहिती । Flower In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

1 thought on “सर्व फुलांची संपूर्ण माहिती । Flower In Marathi”

Leave a Comment