लगोरी खेळाची माहिती मराठी । Lagori Information In Marathi

लगोरी खेळाची माहिती मराठी । Lagori Information In Marathi

मित्रांनो ! जगभरामध्ये विविध खेळ खेळले जातात. त्यामुळे लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळत होतो. परंतु सर्व खेळ खेळण्यासाठी आपण घराबाहेर मैदानावर जाऊन खेळात. आजच्या काळात असल्याप्रमाणे घरबसल्या खेळले जाणारे खेळ हे पूर्वी खूप कमी प्रमाणात होते त्यामुळे कुठलाही खेळ खेळायचा म्हटलं हे सर्वजण एकत्र जाऊन मैदानावर खेळत असत.

लगोरी हा खेळ सर्व साधारणपणे आपल्यातील सर्वजणांनी खेळला असेल कारण लगोरी हा खेळ खूप लोकप्रिय आणि लहान वयामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जाणारा खेळ आहे.

लगोरी खेळाची माहिती मराठी । Lagori Information In Marathi

या खेळांमध्ये सात दगडाच्या चपट्या किंवा लाकडाच्या चपट्या एकावर एक ठेवून त्यांना चेंडूने फोडून पळत सुटायचे असते. या खेळामध्ये साधारणत दोन संघ असतात व दोन्ही जण एकमेकांच्या विरोधी पक्षांमध्ये खेळत असते.

एक संघ लगोरी फोडत असतो तर दुसरा संघ लगोरी फोडलेल्या संघाला चेंडूने मारून बाद करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत पहिला संघ चपट्या एकावर एक थर रचण्याचा प्रयत्न करत असतो.

अशा प्रकारे लगोरी खेळ खेळला जातो हे आपण सर्वांना माहितीच आहे. आजच्या लेखामध्ये आपण या खेळा विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया, Lagori game information in Marathi | लगोरी खेळाची मराठी माहिती

Lagori game information in Marathi | लगोरी खेळाची मराठी माहिती

लगोरी खेळाचा इतिहास history of Lagori game

लगोरी या खेळाला वेगळ्या नावाने ओळखले जाते असे के सात दगडांचा खेळ. उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये या खेळाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे की पंजाब आणि हिमाचल मध्ये पिटू गरम, महाराष्ट्र मध्ये सात टिलो, उत्तरा खंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये लगोरी खेळायला सितोलीया या नावाने ओळखले जाते.

तसेच भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन खेळाडूंपैकी एक म्हणजे लगोरी हा खेळ आहे. एवढेच नसून या खेळाचा इतिहास प्राचीन पूर्व भगवत पुराणामध्ये देखील लगोरी खेळाचा उल्लेख सापडतो.

लगोरी हा एक पारंपारिक खेळ असून सुमारे पाच सहस्त्र वर्षापासून हा खेळ खेळला जात आहे. या खेळाची सुरुवात भारतीय उपखंडातील दक्षिणे कडील भागांमध्ये झाली असावी.

1990 च्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील लोक प्रिय खेळ म्हणून लगोरी खेळायला ओळखले जातो. परंतु आजच्या काळामध्ये हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे कारण आपल्यातील खूप कमीजण हा खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. त्याप्रमाणेच नवीन-नवीन खेळांकडे लोकांचा कल पहायला मिळतो.

लगोरी खेळाचे नियम :

लगोरी या खेळाचे नियम खूप साधे आणि सोपे आहेत ते पुढीलप्रमाणे;

1. या खेळामध्ये सातबाराच्या किंवा लाकडाच्या एकावर एक अशा रचल्या जातात. या खेळांमध्ये साधारणता दोन संघ असतात व प्रत्येकी सांगा मध्ये दहा-दहा असे खेळाडू असतात.

2. पहिल्या संघातील खेळाडूचे लक्ष केवळ रचलेल्या चपट्या चेंडूच्या साहाय्याने फोडणे हे असते. तर दुसऱ्या संघाचे लक्ष केवळ पहिला संघ फोडलेल्या चपट्या रचण्याच्या अगोदर पहिल्या संघातील खेळाडू ला चंदू च्या साह्याने बाद करणे हे असते.

3. जर चेंडू पहिला संघातील एखाद्या खेळाडूला स्पर्श करत असेल तर तो खेळाडू आणि संघ बाद ठरवला जातो.

4. जर पहिल्या संघातील सर्व खेळाडू लवकरात लवकर चेंडूला स्पर्श न करता दगडांच्या चपट्या ची पुनर्रचना करतात तेव्हा त्या संघाला गुण दिले जातात.

5. पहिल्या संघातील एखाद्या खेळाडूला चंदू स्पर्श झाल्यास तो डाव तेथेच संपतो आणि दुसरा संघ चपट्या फोडण्यासाठी प्रयत्न करतात.

अशा प्रकारे वरील सर्व नियम पाळत लगोरी हा खेळ खेळला जातो.

लगोरी खेळासाठी आवशक्य असणारे साहित्य : Lagori game set

लगोरी खेळ खेळण्यासाठी सर्वप्रथम दगडाच्या किंवा लाकडाच्या चपट्या सात दगडांची आवशक्यता असते. लाकडाच्या किंवा दगडाच्या चपट्या या सपाट आणि गोल आकाराच्या असणे आवश्यक आहेत. याशिवाय आपल्याला या खेळासाठी चेंडूची अत्यंत आवश्यकता असते.

आणि आपण ज्या ठिकाणी दगडाच्या 7 चपट्या रचणार आहोत तेथून साधारणतः 10 ते 15 मीटर अंतरावर एक रेषा आखावी. व त्या रेषेपासून लगोरी फोडण्यासाठी प्रयत्न करावा.

लगोरी खेळा साठी किती खेळाडू आवशक्य असतात?

लगोरी या खेळासाठी साधारणता दोन संघाची आवश्यकता असते. एका संघा मध्ये कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त दहा खेळाडू असणे आवश्यक आहे.

लगोरी खेळाची इतर माहिती :

साधारणतः सर्वांनीच लहानपणी लगोरी हा खेळ खेळला असेल. परंतु आता याच लगोरी खेळाने आंतरराष्ट्रीय सर्किट मध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. आज जगभरामध्ये तब्बल 30 राष्ट्रांमध्ये लगोरी खेळ खेळला जातो.

लगोरी या खेळाला हळूहळू जागतिक पातळी पर्यंत चे स्थान मिळत आहे. त्यातला त्यात भारत देशा मुळे लगोरी या खेळाला अधिकच विकासाची गती मिळाली आहे.

नोव्हेंबर 2011 मध्ये झालेल्या इंडियन लोगोरी प्रीमियर लीग अमेच्योर फाऊंडेशन ऑफ इंडिया ने आयोजित केल्याने या खेळायला देशभरामध्ये गती प्राप्त झाली होती.

लगोरी खेळाचे फायदे : Benefits of Lagori game in Marathi

1. लगोरी या खेळा मध्ये शरीरांचा व्यायाम तर होतो त्या सोबत सर्वांगिन गुणांमध्ये विकास साधण्यासाठी मदत होते.

2. लगोरी खेळामुळे धावण्याची सगळे लागते.

3. त्याप्रमाणेच या खेळा मधून चतुराई आणि चपळता या गुणांचा विकास होतो.

4. लैंगिक कार्य शिकायला मिळते.

5. नेतृत्व हा गुण अंगीकृत होतो.

तर मित्रांनो ! ” लगोरी खेळाची माहिती मराठी । Lagori Information In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment