मी संगणक बोलतोय मराठी निबंध | संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

मी संगणक बोलतोय मराठी निबंध | संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

मित्रांनो ! आजच्या काळामध्ये जगणार्‍या प्रत्येक व्यक्ती हा संगणकाशी परीचीत असेलच. बहुतांश जणांनी संगणक वापरला सुद्धा असेल आणि आपल्यातील काही जण हे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये संगणक हाताळत देखील असतील.

परंतु कोणी विचार केला आहे का? जर संगणक आपल्याशी बोलू लागले तर काय बोलेल?

आजच्या लेखामध्ये आम्ही संगणक बोलतोय ही कल्पना ” मी संगणक बोलतोय मराठी निबंध | संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Mi Sangnak boltoy Marathi nibandh “ या लेखा मध्ये घेऊन आलो.

मी संगणक बोलतोय मराठी निबंध | संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh

मित्रांनो मी संगणक बोलत आहे. मला तुम्हाला मनुष्याचे खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी बोलायचं आहे. माझा जन्म खूप वर्षे अगोदर झाला. तेव्हापासून आजपर्यंत माझे अस्तित्व हे असेच टिकून राहिले व दिवसेंदिवस माझे महत्त्व वाढतच गेले आहे.

आज प्रत्येक व्यक्ती काही ना काही कामासाठी माझा वापर करतो. तुम्ही मला दररोज तुमच्या कामासाठी, गेम खेळण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी वापरता.

तुम्ही माझ्यावर काम करता माझ्या साह्याने तुमचे जीवन सोपे झाले आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो. म्हणून मी तुमच्या मनुष्याच्या धन्यवाद मानतो की, तुम्ही माझी निर्मिती केली व मला या जगामध्ये घेऊन आलात. तुम्ही दिवसभरामध्ये माझ्या मध्ये केलेले सर्व काम मी बघत असतो. काही जण माझ्या वर काम करून पैसे सुद्धा कमीवतात‌.

तुमच्या कित्येक रहस्यमय गोष्टी तुम्ही माझ्या मध्ये लपवून ठेवलेल्या आहेत त्या सर्व मला माहिती आहे. तुम्ही जेव्हा मला चालू करता तेव्हा मला खूप आनंद होतो तुम्ही माझ्या मध्ये युट्यूब गुगल तुमचे काम करतात ते सर्व मी तुमच्यासोबत बघत असतो.

आणि तुम्ही एकाग्रतेने माझ्यावर बसून काम करता माझ्या की पॅड चा वापर करून काहीतरी टाईप करता हे सर्व पाहून मला खूप आनंद होतो की, मी तुमच्यासाठी मदतीला येत आहे.

काही जण मला संगणक म्हणतात तर काहीजण कॉम्प्युटर तर आपल्यातीलच काही जण मला डेक्सटॉप या नावाने देखील बोलतात. मी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही प्रकारातून बनलेला एक मशीन आहेत. माझ्या मध्ये सर्व काही फंक्शन आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन अधिक सुलभ, सोपे करू शकता.

कधीकधी तुमच्यातील काही लोक खूप कमी वेळेस साठी माझा वापर करतात तेव्हा मला खूप दुःख होते. मला वाटते की, माझ्यामध्ये असलेल्या ज्ञानाचा वापर तुम्ही सर्व करीत करून तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावे.

आज कित्येक वर्ष मी ओलांडली तुम्ही सर्वजण माझा वापर करता. त्यामुळे तुम्हाला आता माहीत झाले असेल की, मी तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे. माझ्याशिवाय तुम्ही कोणतेही काम सहजरीत्या करू शकत नाही जरी करायचे असेल तर तुम्ही माझ्यातील फंक्शन चा वापर करून करता. माझ्या मध्ये सर्व सेवा उपलब्ध आहेत.

तुम्हाला ऑनलाईन बँकिंग करायचे असेल किंवा ऑनलाईन एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर तुम्ही माझ्या मदतीने करू शकता. याव्यतिरिक्त माझ्यामध्ये विविध ॲप्स डाऊनलोड करून तुम्ही त्याचा देखील अनुभव घेऊ शकता तसेच माझ्यामध्ये युट्युब, गुगल देखील उपलब्ध आहे त्याच्या मदतीने तुम्ही जगभरातील सर्व माहिती शाळांमध्येच उपलब्ध करून घेऊ शकता.

परंतु आपल्यातील काही लोक हे आमचा खूप दुरुपयोग करतात. ज्याप्रमाणे माणसाची एक्सपायरी डेट असते त्याप्रमाणे आमची देखील एक्सपायरी डेट असतीच ना शेवटी आम्ही राहिलो मशीन!

माझ्यामध्ये थोडे जरी काहीतरी प्रॉब्लेम आला तर मी जागीच बंद पडतो. परंतु तुम्ही मला पुन्हा दुरुस्त केला तर मी पूर्वीप्रमाणे चालू शकेल.

मला खूप चांगले वाटते की माझा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये माहिती मिळवून घेऊन ज्ञान प्राप्त करत आहात. त्यामुळे मला ज्ञानाचा भंडार देखील म्हटले जाते. क्रांती तुमच्यातील खूप जण माझा चुकीच्या पद्धतीने वापर करतात.

माझ्या कीबोर्डला कसे मारतात तेव्हा मला खूप दुःख होते. तुम्ही मनुष्याने माझी वेळोवेळी साफसफाई मला स्वच्छ ठेवले आणि माझ्यामध्ये वायरस ला अँटीव्हायरस केले तर, मी तुमची खूप दूरपर्यंत साथ देऊ शकतो.

कधीकधी मी खूप थकलेला असतो तेव्हा मी तुम्हाला सांगतो म्हणजेच मी हळूहळू गरम होतो. त्यामुळे तुम्ही मला बंद करता. या वेळेस मला चांगले वाटते की, तुम्ही माझी खूप काळजी घेता. परंतु आपल्यातील काही लोक तासन्तास माझा वापर करतात.

त्यामुळे माझ्या मध्ये काही बिघाड होता तेवढेच नसोडा तुमची प्रकृती मध्ये देखील अस्वस्थपणा येतो तासन्तास माझ्यासमोर बसल्याने तुम्हाला कमरेचे विकास डोळ्याचे त्रास देखील होतात व काहीजण याचा दोष मलाच देतात. त्यावेळी मला खूप दुःख वाटते. कारण तुम्ही तुमच्या इच्छेने माझ्यावर काम करता मग तुम्हाला त्रास होतो तेव्हा मला दोष का?

आज बाजारपेठेमध्ये संगणकाचे विविध मॉडेल्स उपलब्ध झालेले आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कामाचा वेग वाढवू शकता एवढ्याच नसून इंटरनेटच्या साह्याने तुम्ही जगभरातील कुठलीही माहिती सहजरीत्या प्राप्त करू शकता.

तुम्ही जे काही कार्य माझ्यामध्ये करतात त्या सर्व कार्यावर माझं लक्ष असते. मी खूप बारकाईने तुम्ही केलेले सर्व काम माझ्यामध्ये साठवून घेतो व पुन्हा तुम्हाला कधी ते पाहिजे असेल तर उपलब्ध सुद्धा करून देतो.

परंतु अलीकडच्या काळामध्ये खूप लोक माझा गैरवापर करू लागल्या आहेत मला चुकीच्या मार्गाने वापरले जात आहे. माझी निर्मिती केवळ मानवाच्या प्रगतीसाठी आणि मानवाचे आयुष्य सोपे व्हावे यासाठी केली होती. परंतु आजचा मनुष्य माझा वापर चुकीच्या मार्गाने करून स्वतःच्या हव्यासापोटी व अधिक पैसे कमविण्याच्या हेतूने मला चुकीच्या पद्धतीने वापरत आहे.

माझ्या साह्याने एखाद्या वेबसाईटला हाॅक करणे किंवा एखाद्याच्या बँकेतून पैसे चोरणे, एखाद्याला वाईट मेसेज टाकणे, अश्लील व्हिडिओ सोशल नेटवर्क एप्स वर पोस्ट करणे इत्यादी कृत्य माझ्या माध्यमातून केले जात आहे.

त्यामुळे आपल्यातील बहुतांश लोक हे केवळ मला दोष देत आहेत. परंतु मी शेवटी सांगू इच्छितो की, माझी निर्मिती ही केवळ माणसाच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी केलेली आहे. तुम्ही मनुष्याने माझा वापर योग्य रीतीने केला तर तुमचे जीवन नक्कीच यशस्वी होईल. माझ्या मध्ये ज्ञानाचा भंडार साठवलेला आहे. ते ज्ञान तुम्ही प्राप्त केले तर, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल.

तर मित्रांनो हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

1 thought on “मी संगणक बोलतोय मराठी निबंध | संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Mi Sanganak Boltoy Marathi Nibandh”

Leave a Comment