मी शेतकरी झालो तर निबंध मराठी | Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh

मी शेतकरी झालो तर निबंध मराठी | Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh

मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही ” मी शेतकरी झालो तर निबंध मराठी | Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh “ घेऊन आलो. आम्हाला आशा आहे की, हा निबंध आपणास नक्कीच आवडेल.

मित्रांनो ! आपण सर्वाना तर माहितीच आहे आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशांमधील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे.

शेती हा मुख्यता शेतकऱ्याचा व्यवसाय आहे शेतकरी आपल्या शेतीमध्ये धान्य पिकवतो शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा देखील म्हटले जाते.

मी शेतकरी झालो तर निबंध मराठी | Mi Shetkari Zalo Tar Marathi Nibandh

प्रत्येक व्यक्ती जेव्हा शाळेला जाऊ लागतो तेव्हा तो स्वप्न बघतो की, भविष्यामध्ये मोठे होऊन इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शिक्षक व्हावेत. परंतु मला मोठे होऊन डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनियर व्हायचे नसून मला शेतकरी व्हायचे आहे.

ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी, माझे स्वप्न आहे की मी मोठे होऊन शेतकरी व्हावे.

जर मी शेतकरी झालो तर सर्व प्रथम मला माझ्यावर अभिमान असेल की मी देशाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेण्यासाठी तत्पर झाले. म्हणजेच शेतकरी शेतामध्ये दिवस-रात्र कष्ट करतो आणि ते पीक पिकवतो ते पीक नंतर बाजारात नेऊन विकतो आणि ते तुम्ही आम्ही विकत घेऊन खातो. थोडक्यात शेतकऱ्यांमुळे सर्व जण दोन वेळचे पोटभर अन्न खाऊ शकतात.

डॉक्टर वकील होऊन लोक स्वतःचा विचार करतात स्वतःच्या स्वार्थापायी आणि पैसे कमवण्याच्या हेतूने उच्च पदावर जाण्याचे स्वप्न पाहतात. परंतु मी देश सेवा करण्याचे ठरवले आहे. देश सेवा करण्याकरिता केवळ सैनिकांमध्ये, पोलिसांमध्ये भरती होणे गरजेचे नाही. शेतकरी शेतामध्ये राबवून धान्य पिकवून देशाला देतो हे देखील एक प्रकारची देशसेवाच आहे ना!

जर मी शेतकरी झालो तर माझ्या शेतीमधून उत्तम असे धान्य पीकविन. भारत देशामध्ये शेती हे प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये केली जाते. ग्रामीण भागातील बहुतांश जनता ही केवळ शेतीवरच अवलंबून आहे. मी देखील एक ग्रामीण भागातील रहिवासी असलेले बनात येथील शेतकऱ्यांची अवस्था चांगल्याच प्रकारे ठाऊक आहे मी ठरवले मी शेतकरी होईल.

जर मी शेतकरी झालो तर मी केवळ एक साधारण शेतकरी लावला होता उत्कृष्ट असा शेतकरी होईल. त्यामुळे जर मी शेतकरी झालो तर माझ्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेमध्ये आहे कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन आणि नफा मिळवीन.

मी शेतकरी झालो तर माझ्या शेतीमध्ये पारंपारिक पद्धतीने पीक घेईन. शेतकऱ्यावर संपूर्ण जीवन अवलंबून असते म्हणूनच शेतकऱ्याला “जगाचा पोशिंदा” देखील म्हटले जाते. पोशिंदा म्हणजेच लोकांना भरविणारा.

अलिकडे आपल्यातील बहुतांश शेतकरी हे रासायनिक खतांचा वापर करून शेती करत आहेत. परंतु रासायनिक खतांचा पिकवलेले पीक हे शरीरासाएठी योग्य नसते ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

तसेच आलीकडे आधुनिकी बी-बियाणे देखील आहेत. त्यामध्ये कमी वेळेत अधिक लवकर पीक यावे या उद्देशाने या बी-बियाणांची रचना केली जाते. परंतु जर मी शेतकरी झालो तर रासायनिक खते आणि बियाणे न वापरता सर्व काही नैसर्गिक रित्या तयार केलेली वापरीन.

जर मी शेतकरी झालो तर माझ्या शेतीतील पीक पिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करीत तसेच कंपोस्ट खत, गांडूळ खत इत्यादी खतांचा वापर करीन. जेणेकरून माझ्या शेतीमध्ये पिकवलेले अन्नधान्य लोकांनी खाल्लास त्यांना कुठल्याही प्रकारचे हानी पोहोचणार नाही.

मी शेतकरी झालो तर माझ्या शेती मध्ये एका बाजूला शेततळे तयार करून त्यामध्ये पावसाचे पाणी जमा करून तेच पाणी माझा शेतीला देईन. तसेच काळ शेततळ्यामध्ये मत्स्यबीज टाकून मत्स्य उत्पादन देखील करीना त्यामुळे मला माझ्या शेतीला पूरक असा जोडधंदा देखील होईल त्यातून मला आर्थिक मदत मिळेल.

जर मी शेतकरी झालो तर माझ्या शेतामध्ये कष्ट करून उत्तर असे पीक काढेन. एवढेच नसून आपल्या देशाचे भविष्य हे शेतकऱ्यावर अवलंबून आहे. म्हणजेच शेतकऱ्यांनी योग्य रित्या आपल्या शेतामध्ये कष्ट करून धान्य पिकवले तर आपल्या देशातील सर्व जनता योग्य अन्न खाऊ शकेल. अशाप्रकारे मी योग्यरित्या शेती केली तर मला देशसेवा केल्याचे सुख प्राप्त होईल.

आधुनिक काळाने ज्याप्रमाणे प्रगती केली आहे त्याप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये देखील प्रगती झालेली आहे. कृषी क्षेत्रामध्ये विज्ञानाच्या विकासामुळे नवनवीन तंत्र उदयास आले आहेत. ज्याचा वापर करून मी माझ्या शेतीमध्ये अधिक उत्पादन काढू शकतो. जर मी शेतकरी झालो तर सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार जाणाऱ्या सर्व योजनांचा मी पुरेपूर फायदा करून घेईल.

आपण सर्वांना तर माहितीच आहे अलीकडच्या काळामध्ये विज्ञानानं खूप प्रगती केलेली आहे .

अशा काळामधील लोक शेतीकडे दुर्लक्ष कडून उद्योगधंद्याच्या, नोकरीच्या शोधामध्ये जात आहेत. काही शेतकऱ्यांची मुले सुद्धा शेती व्यवसाय न करता नोकरीच्या शोधात निघत आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय आहा अलीकडे खूप कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणजे आज बाजारपेठांमध्ये अन्नधान्याचे भाव गगनाला पोहोचले आहे.

परंतु अशी परिस्थिती असताना सुद्धा मी शेतकरी झालो तर माझ्या शेतीमध्ये अतोनात प्रयत्न करून उत्तम असे उत्पादन काढून दाखवेन.

त्यामुळे जर मी शेतकरी झालो तर मला शेतकरी होण्यावर खूप गर्व असेल. तसेच मला शेतकरी होण्याचा अभिमान वाटेल की, मी जगाचा पोशिंदा झालो.

तर मित्रांनो ! हा निबंध लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment