मदर तेरेसा माहिती मराठी । Mother Teresa Information in Marathi

Mother Teresa Information in Marathi मित्रांनो ! तुम्ही मदर तेरेसा हे नाव तर ऐकलेच असेल असा एक थोर विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. आजच्या लेखामध्ये आम्ही ” मदर तेरेसा माहिती मराठी । Mother Teresa Information in Marathi “ घेऊन आलो.

Mother Teresa Information in Marathi

” जर जीवन दुसऱ्यांसाठी जगता आले नाही तर त्याला जीवन म्हणत नाही” या वाक्या नुसार आपले जीवन घालवणाऱ्या मदर तेरेसा ह्या एक समाज सेविका होत्या. मदर तेरेसा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि इतरांना सहाय्य करण्यासाठी समर्पित केले.

मदर तेरेसा माहिती मराठी । Mother Teresa Information in Marathi

मदर तेरेसा ह्या का अत्यंत उदार प्रेम आणि त्या याळू स्वभावाच्या महिला होत्या. इतरांच्या दुःखाला त्यांनी स्वतःचे दुःख समजून त्यांच्या दुःखाचे समाधान करण्यासाठी त्यात झटत राहिल्या. निस्वार्थी पणाने मदर तेरेसा यांनी त्यांचे संपूर्ण जीवन गरीबी मध्ये लाचारी मध्ये आणि आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेल्या लोकांच्या सेवेसाठी अर्पण केले. मदर तेरेसा या स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगल्या. म्हणून तर आज देखील मदर तेरेसा यांचे नाव अतिशय सन्मानाने घेतले जाते आणि आज ही मदर तेरेसा या अजरामर आहेत‌.

एक भारतीय भारतीयांची सेवा करतो असे आपण ऐकले होते परंतु हे वाक्य पूर्णपणे चुकीच्या ठरवणार्‍या मदर तेरेसा होत्या. मदर तेरेसा या मूळच्या भारताच्या नव्हत्या तरीदेखील त्यांनी भारतवासी यांसाठी सेवेचा आणि मदतीचा हात लावला.

Mother Teresa Information in Marathi

मदर तेरेसा जेव्हा भारतामध्ये आल्या तेव्हा त्यांना भारतीय लोकांकडून अतिशय प्रेम आणि आपुलकी मिळाली. त्यानंतर मदर तेरेसा यांनी त्यांचे पुढचे संपूर्ण जीवन भारतामध्ये घालवण्याचा निश्चय केला.

इतकेच नव्हे तर मदर तेरेसा यांनी भारतीय समाजासाठी मोठे महत्त्वाचे योगदान दिले. मदर तेरेसा यांनी सामाजिक कार्यामध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे मदर तेरेसा यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पद्मश्री आणि नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. भारताचा रहिवासी नसतानासुद्धा त्याने भारतीयांसाठी एवढे मोठे कार्य केले. त्यामुळे मदर तेरेसा यांच्या कडून प्रत्येकाने प्रेरणा घ्यायला हवी.

मदर तेरेसा या मानवतेचे एक सर्वोत्तम उदाहरण ठरल्या. निस्वार्थ आईप्रमाणे गरिबांची सेवा आणि गरिबांची मदत करणाऱ्या मदर तेरेसा या गरिबांसाठी कैवारी, दयाळू आई आणि साक्षात ईश्वरा प्रमाणे ठरल्या. त्यामुळे मदर तेरेसा यांना आज देखील “विश्वजननी” या नावाने ओळखले जाते.

मदर तेरेसा यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन :

मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी मसेदोनियातील स्काॅप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी झाला. मदर तेरेसा यांचे मूळ नाव अग्नेस गोंझा बोयाजिजू असे आहे परंतु आज संपूर्ण जग यांना मदर तेरेसा या नावाने ओळखते. गोंझा या शब्दाचा अर्थ अल्बियन भाषेमध्ये “कळी( न उमललेले फुल)” असा होतो.

मदर तेरेसा यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक वृत्तीचे होते. इसा मासिह यांच्यावर त्यांचा फार विश्वास होता .आणि मदर तेरेसा या देखील आसा मासिह वर खूप विश्वास ठेवत होत्या. मदर तेरेसा या अवघ्या आठ वर्षाच्या होता तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्यानंतर मदर तेरेसा यांचा सांभाळ त्यांच्या आई द्राया बोनाजुंनी केला. मदर तेरेसा यांच्या आई एक धर्म पारायण आणि आदर्श गृहिणी होत्या. मदर तेरेसा यांच्यावर त्यांच्या आईने केलेले संस्कार आणि शिक्षण यांचा खूप मोठा प्रभाव पडला.

त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यामुळे मदर तेरेसा यांचे बालपण अतिशय संघर्षमय परिस्थितीतून गेले. मदर तेरेसा लहान असताना त्यांच्या आई आणि बहिणी सोबत चर्चमध्ये जाऊन गायन करीत असे.

मदर तेरेसा अवघ्या बारा वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी एका धार्मिक यात्रेला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी येशूच्या परोपकाराने समाजसेवेच्या शिकवणीला जगभरामध्ये पोहोण्याचा आणि त्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा ठाम निश्चय त्यांनी केला. आपले संपूर्ण जीवन गरिबांच्या सेवांसाठी समर्पित करण्याचे त्यांनी मनोमन ठरविले.

1928 मध्ये मदर तेरेसा अवघ्या अठरा वर्षाच्या असताना त्यांनी नन चा समुदाय “सिस्टर्स ऑफ लोरेटो” सहभागी होण्यासाठी त्यांनी आपले घर सोडले. पुढे मदर तेरेसा या आयर्लंड गेल्या आणि तेथेच त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली. कारण त्यावेळी “लोरोटो” च्या सिस्टर्स इंग्रजी भाषेतून भारतातील मुलांना शिकवण्याचे काम करीत होत्या. यादरम्यान मदर तेरेसा यांनी एका इन्स्टिट्यूट मधून नन‌ होण्याची ट्रेनिंग पूर्ण केली. नन झाल्यानंतर त्यांचे ” सिस्टर मेरी तेरेसा ” असे नामकरण करण्यात आले. पुढे त्यांनी आपले संपूर्ण जीवन गरीबांची सेवा करण्यासाठी आणि असाय्य लोकांना मदत करण्यासाठी घालवण्याचा निश्चय केला.

मदर तेरेसा यांचे भारतात आगमन :

नन ची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मदर तेरेसा आपल्या इन्स्टिट्यूटमधील इतर नन त्यांच्यासोबत 1929 साली भारतामध्ये आल्या. भारतातील दार्जिलिंग या ठिकाणी त्यांनी प्रथमता नन या रूपात त्यांनी धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर मदर तेरेसा यांना दार्जिलिंग येथून कोलकत्ता येथे शिक्षिका म्हणून पाठवण्यात आले. कोलकत्ता या ठिकाणी डबलिन च्या सिस्टर लोरेंटो संत मेरी स्कूलची स्थापना केली होती. याचठिकाणी मदर तेरेसा आणि गरीब आणि असाह्य मुलांना शिकवण्यात सुरुवात केली. मदर तेरेसा यांना हिंदी आणि बंगाली भाषेचे ज्ञान होते. सुरुवातीपासूनच मदर तेरेसा या अत्यंत महिन्यातील होत्या आणि त्यांनी शिक्षकाची हे नोकरी अत्यंत निष्ठावानपणे पार पाडली. या स्कूलमध्ये शिकवत असताना त्या विद्यार्थ्यांच्या अत्यंत प्रिय शिक्षिका बनल्या.

यादरम्यानच मदर तेरेसा यांचे लक्षा आजूबाजूला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी आणि अज्ञानावर गेले. ते सर्व पाहून मदर तेरेसा यांना अत्यंत दुःख वाटले. या काळामध्ये चा कोलकत्ता या शहरांमध्ये दुष्काळाने अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती. ते सर्व पाहून मदर तेरेसा यांनी गरीब, लाचार आणि अज्ञानी लोकांचे मदत करण्याचा निश्‍चय केला.

मिशनरीज ऑफ चैरिटी ची स्थापना :

संत मेरी स्कूल मध्ये शिक्षकाची भूमिका करत असताना आजूबाजूच्या गरीब लोकांची परिस्थिती पाहिल्याने मदर तेरेसा आणि गरिबांची सेवा करण्याचा निश्चय केला. यासाठी मदर तेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पिटल मधून नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले. व पुढे 1948 ते पुन्हा कोलकत्ता येथे आल्या. त्यानंतर मदर तेरेसा यांनी स्वतःला गरीब, वृद्ध आणि असाह्य लोकांच्या सेवेमध्ये गुंतवले. खूप प्रयत्नानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले व मदर तेरेसा यांनी 7 ऑक्टोंबर 1950 ला मदर तेरेसा यांना समाजाच्या हिताकरिता कार्य करणारी मशिनरी ऑफ चारिटी ही संस्था स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली.

मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मशनेरी ऑफ चारिटी या संस्थेचा मुख्य उद्देश केवळ गरिबांची सेवा, गरजू वंत रुग्णांवर उपचार, लाचार्यांना सहायता करणे, आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांमध्ये जगण्याची आस निर्माण करणे हाच होता.

याव्यतिरिक्त मदर तेरेसा यांनी गरीब लोकांची मदत करण्याच्या हेतूने ” निर्मल हृदय” आणि “निर्मला शिशू भवण” या नावाचे आश्रम देखील सुरू केले. या आश्रमामध्ये गरीब आणि आजारी लोकांवर उपचार केले जात असे. यासोबतच अनाथ आणि बेघर मुलांच्या मदतीसाठी देखील हे आश्रम तत्पर होते.

मदर तेरेसा यांचा शेवट :

मदर तेरेसा यांनी त्यांच्या जीवनामध्ये गरीब आणि असाह्य लोकांच्या मदतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले. परंतु त्यांच्या जीवन काळामध्ये त्यांना अनेक आरोग्य संबंधीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. 1983 मध्ये ज्यावेळी मदर तेरेसा रोमला पॉप जॉन पॉल यांच्याशी दुतीय भेटी करिता गेल्या तेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला.

त्यानंतर पुन्हा 1989 मध्ये मदर तेरेसा यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला तरीदेखील त्यांनी सेवा कार्य सुरूच ठेवले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच खराब होत गेली. 1991 मध्ये त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. 1997 ला मदर तेरेसा यांनी मशिनरी ऑफ चारिटी संस्थेच्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली.

त्यानंतर पाच सप्टेंबर 1997 रोजी मदर तेरेसा यांनी शेवटचा श्वास घेतला.

अशाप्रकारे समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन खर्ची घालणाऱ्या मदर तेरेसांचे अखेर निधन झाले.

मदर तेरेसा यांना मिळालेले पुरस्कार :

मदर तेरेसा यांनी केलेला निस्वार्थीपणा ने गरीब लोकांची सेवा आणि असाह्य लोकांना मदत यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मानवतेच्या सेवेला पाहून भारत सरकारने मदर तेरेसा यांना 1962 मध्ये “पद्मश्री पुरस्काराने” गौरवण्यात आले.

यानंतर पुढे भारत सरकारने मदर तेरेसा यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे “भारतरत्न पुरस्काराने” देखील सन्मानित करण्यात आले.

मदर तेरेसा यांनी केलेल्या मानव कल्याणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना 1979 ला “नोबेल शांतता पुरस्काराने” गौरवण्यात आले.

तर मित्रांनो ! ” मदर तेरेसा माहिती मराठी । Mother Teresa Information in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!

Leave a Comment