नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती | Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi भारतीय स्वतंत्र संग्राम यमध्ये अनेक वीरांनी कशाचीही पर्वा न करता आपल्या प्राण अर्पण केले. इंग्रजांविरुद्ध अतिशय नीरा कराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली. या सर्व थोर विरारमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीला येते. नेताजी सुभाषचंद्र बोस हा भारत भूमीचे एक सुपुत्र होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती | Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी केलेले आपले भारत देशा बद्दल चे कार्य हे आजही तरुण पिढीला प्रेरणा देण्यासारखे आहेत. अन्यायाविरुद्ध हातामध्ये शास्त्र उठायला लावणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते म्हणूनच दाजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव ऐकताच इंग्रजांना धास्ती बसली होती.

संपूर्ण नाव सुभाष चन्द्र बोस
जन्म२३ जानेवारी १८९७ रोजी
जन्मस्थानओडिशा विभाग कटक, बंगाल प्रेसीडेंसी
वडीलजानकीनाथ
आईप्रभावती
पत्नीएमिली शेंकल
मुलेअनिता बोस फफ
राष्ट्रीयत्वभारतीय
शिक्षणबी.ए. कलकत्ता विद्यापीठ
धर्महिंदू
चळवळभारतीय स्वातंत्र्यलढा
संघटनाअखिल भारतीय काँग्रेस
फॉरवर्ड ब्लॉक
आझाद हिंद फौज

आजच्या लेखामध्ये आपण या महान व्यक्ती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती । Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

नेताजी सुभाष चंद्र बोस थोडक्यात माहिती :

" तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा ! "

असे घोषवाक्य देणाऱ्या स्वातंत्र्य काळातील वीर महानायक म्हणजे सुभाषचंद्र बोस होय. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाचन्द्र बोस यांनी मोलाची भूमिका बजावली.

भारतीय जनता भारतातून ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनामध्ये सहभागी होत होती. अनेकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र भारताच्या बाहेर जाऊन एका सशस्त्र सेनेसह भारतावर आक्रमण करून भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा धाडसी प्रयत्न हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला.

सुभाष चंद्र बोस यांचा जन्म :

नेताजी सुभाषचंद्र यांचा जन्म 23 जानेवारी अठराशे 97 रोजी ओडिशा राज्यातील कटक या शहरांमध्ये झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती असे होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लहानपणापासूनच देशप्रेम आणि देशभक्ती होती. लहानपणी बोस हे बंडखोर वृत्तीचे होते. सुभाष चंद्र बोस शाळेत असताना त्यांच्यावर स्वामी रामचंद्र आणि स्वामी विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव पडला. विवेकानंद रामकृष्णांच्य ग्रंथां मुळे त्यांना अत्यंत धार्मिकता मध्ये रस वाटू लागला. त्यानंतर विवेकानंदांच्या शिकवणी त्यांच्या मनावर मानवाच्या समानते वरील श्रद्धा अधिकच दृढ झाली.

सुभाष चंद्र बोस शिक्षण :

नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासुनच अतिशय हुशार होते. नेताजी सुभाष चंद्र बोस जेव्हा लहान होती तेव्हा त्यांच्या वडिलांची इच्छा होती की नेताजींनी मोठे होऊन आयएएस अधिकारी बनावे. वडिलांच्या इच्छा प्रमाणे त्यांनी आयएएस होण्याचा अभ्यास देखील पूर्ण केला. त्यांनी आयएएसच्या शिक्षण घेण्याकरिता इंग्लड ला गेले होते तेच आयएएसची परीक्षा देखील उत्तीर्ण केली. परंतु त्यांच्या मनामध्ये इंग्रजांच्या गुलामी विरुद्ध लढा होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती | Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मध्ये राष्ट्र सेवेची तीव्र इच्छा होती. एका बाजूला आयसीएस असे सारखे उच्च अधिकाऱ्याचे पद होते तर एका बाजूला देश सेवा आणि देश प्रेम होते. शेवटी त्यांच्या मनामधील देशभक्ती जिंकली व त्यांनी आयसीएसची नोकरी करायची नाही असा ठाम निश्चय घेतला. व पुढे त्यांनी आयसीएस या पदाचा राजीनामा मंत्रि मॉटॅंगो यांच्याकडे सोपविला.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आयुष्यातील अतिशय रोमांचक आणि सर्वात तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असा प्रसंग यावेळी घडला तो म्हणजे, आय सी एस या पदाचा राजीनामा पाठवला त्यावेळी भारतीय कार्यालयातील त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्युक यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सोपविलेला राजीनामा आपल्याजवळ ठेवून घेतला आणि सुभाष चंद्र बोस च्या वडिलांना सूचना पाठवली.

त्यावर नेताजींच्या वडिलांनी प्रत्युत्तर पाठवले, ” मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय”. विल्यम ड्युक या उत्तराने आश्चर्यचकित झाला. त्याने सुभाषचंद्र बोस यांना विचारले, ” तरुणांना, तू राजीनामा सोपवला मग तुझ्या उदरनिर्वाहाची सोय कशी करणार?” यावर सुभाष चंद्र बोस म्हणाले, ” मला लहानपणापासून माझा उदरनिर्वाह करण्यासाठी दोन आण्याची आवशक्यता आहे, आणि हे दोन आणे मी कसेही मिळविण.” नेताजी सुभाष चंद्र बोस चे हे उत्तर ऐकून विल्यम ड्युक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.

आझाद हिंद सेनेची स्थापना :

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाष चंद्र बोस यांना ब्रिटिशांनी कोलकत्ता येथे नजरकैदेत मध्ये ठेवले होते. या कैदेतून 17 जानेवारी 1941 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस निसटून अनेक समस्यांना तोंड देते जर्मनी येथे पोहोचले. जर्मनी देशामध्ये भारताबाहेरील भारतीयांची संघटना करून स्वतंत्र सेना उभारण्याचा त्यानी संकल्प हाती घेतला.

यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये हिटलरची भेट घेऊन जर्मन सरकारची सहानुभूती मिळविली. त्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी जर मला शरण आलेल्या इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांचे संघटन केले. त्यावेळी सर्व सैन्यांना प्रश्न आहेत काढण्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी भाषण केले होते सुभाष चंद्र बोस चे हे भाषण ऐकून सर्व हिंदी सैनिक भारावून गेले.

एकीकडे जपानने सिंगापूरचा ब्रिटिशांचा आर मारी तळ काबीज केला होता. रस बिहारी बोस यांनी जपान मध्ये जपानच्या ताब्यातील हिंदी सैनिकांची एक सेना स्थापन केली. या सर्व सैनिकांची भेट घेण्याकरिता नेताजी सुभाषचंद्र बोस 90 दिवसाच्या पाणबुडीतील प्रवासाने अखेर जुलै 1943 मध्ये मृत्यूशी झुंज देत जपानची राजधानी टोकियो येथे सुरक्षित पोहोचले.

रस बिहारी बोस यांच्या विनंतीवरून जपानमधील हिंदी सैनिकांच्या सेनेचे नेतृत्व सुभाष चंद्र बोस यांनी केले. अखेर पाच जुलै 1943 ला सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ” आझाद हिंद सेनेची “ स्थापना केली. आणि याच वेळी त्यांनी “चलो दिल्ली” ही घोषणा देखील केली.

नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती | Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, भारतीय नागरिका आणि भारतीय स्त्रिया देखील स्वतः च्या इच्छेने या सेनेमध्ये दाखल झाल्या. व नेताजी सुभाषचंद्र बोस या सेनेचे सरसेनापती बनले यांच्या नेतृत्वाखाली ही सेना कार्यरत होती.

पूर्व आशिया भागातील लाखो भारतीयांचा या स्वातंत्र सेनेसाठी पाठिंबा मिळाला. या नंतर 21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र हिंदुस्थानचे आझाद हिंद सरकार स्थापन करण्यात आले.

या सरकारला जपान, जर्मनी, इटली, चीन, ब्रह्मदेश, या सर्व देशांनी तात्काळ मान्यता दिली होती. या हंगामी सरकारचे आझाद हिंद सेना हे सर्वात महत्वाची लष्कर होते. लष्करी संघटने बरोबरच आझाद हिंदच्या हंगामी सरकारने नागरी शासन व्यवस्थे कडे देखील लक्ष केंद्रित केले होते. जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अनेक सभा घेतल्या.

” कदम कदम बढाये जा “ या गीताशी एकजूट होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे लष्कर यांनी आझाद हिंदुस्तानचे आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विजयी वाटचाल सुरू केली.

जपानचे सत्ताधीश जनरल तोझो यांनी इंग्लंडकडून जिंकलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे आझाद हिंद सेनेला समर्पित केली. यावेळी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमान या बेटाला भेट दिली. आणि स्वतंत्र हिंदुस्थान चे प्रमुख नेते म्हणून त्यांनी अंदबार येते स्वतंत्र ध्वज देखील फडकावला. आझाद हिंद सेनेने भारताला मध्ये प्रवेश करून भारतातील इम्फाळ आणि कोहिमा याठिकाणी ब्रिटीशांच्या सेनेवर विजय मिळविला..

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यासाठी ” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा” ही आजरामर घोषणा केली.

आझाद हिंद सेनेचे भारत देशात इंग्रजांविरुद्ध लढाईत जोरा मध्ये चालू असताना जपानची मित्र राष्ट्रांच्या ताकती समोर पीछेहाट होऊ लागली. त्यामुळेच जपान कडून आझाद हिंद सेनेला मिळणारी मदत थांबली. यामुळे लढाई थांबवण्या शिवाय नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुढे कोणताही पर्याय उरला नाही.

नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती | Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

त्यादरम्यानच ब्रिटिशांनी विमानातून पदका टाकून आझाद हिंद सेनेतील सैनिकांना ब्रिटिश श्रेणीमध्ये परत येण्याची लालसा दाखवली. परंतु आजाद हिंद सेनेतील एकही सैनिकाने ब्रिटिश सरकारचे लालसेचा स्वीकार केला नाही. परंतु जपान च्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अनुबाम हल्ला झाल्याने जपानने शरणागती पत्करली. त्यामुळे आझाद हिंद सेना संपूर्णता संपुष्टात आली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शेवट :

18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान येथील विमानतळावर विमानाचा अपघात झाला या अपघातामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दुःखद निधन झाले.

तर मित्रांनो, ” नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती | Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment