Oats Meaning in Marathi | ओट्स म्हणजे काय? आणि ओट्स बद्दल संपूर्ण माहिती.

Oats Meaning in Marathi सध्याच्या काळामध्ये ओट्स बद्दल सर्वांनी ऐकली असेल टीव्ही वरती देखील बऱ्याच वेळा ओट्स संबंधित जाहिराती येताना पाहत असतो. वर्तमान काळामध्ये भारत देशांमध्ये देखील नोट हे सर्वांच्या आवडती चे आणि लोकप्रिय धान्य बनले आहे.

सकाळच्या नाश्ता मध्ये सर्वजण जास्त करून ओट्स चा वापर करतात. परंतु आपल्यातील खूप कमी जणांना माहिती नाही की ओट्सला मराठी मध्ये काय म्हणतात?

Oats Meaning in Marathi | ओट्स म्हणजे काय? आणि ओट्स बद्दल संपूर्ण माहिती.

ओट्स हे पृथ्वीवरील सर्वात लोकप्रिय आणि आरोग्यदायी धान्य आहे. आपल्यातील बहुतांश जण त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ओट्स चा वापर करतात. ओट्स मध्ये महत्वपूर्ण जीवनसत्वे, फायबर, आणि ऑंटीअक्सिडेंट ची मात्रा पाहायला मिळते.

ओट्स हे युरोपियन आणि अमेरिकन भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जाणारे एक पीक आहे. ओट्स या पिकासाठी ओलसर आणि थंड हवामान लागते. त्यामुळेच हे पीक भारतामध्ये पिकत नाही.

Oats Meaning in Marathi | ओट्स म्हणजे काय? आणि ओट्स बद्दल संपूर्ण माहिती.

Table of Contents

ओट्सला मराठी भाषेमध्ये दुसरे कुठलेही नाव नाही त्यामुळे ओट्स ला मराठीमध्ये ही ओट्स असेच म्हणतात.

परंतु ओट्स चे सायंटिफिक नाव एव्हाना सॅटिवा असे आहे. Oats वर केलेल्या एका संशोधनानुसार असे आढळून आले आहे की oats मध्ये अनेक फायबर्स, आणि पौष्टिक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.

ओट्स म्हणजे काय? What is Oats in Marathi

ओट्स हे एक प्रकारचे धान्य आहे. ओट्स हे दिसायला बियाणं प्रमाणेच असते. ज्याला दलिया असे म्हणतात. फार पूर्वीच्या काळामध्ये ओट्सचा उपयोग केवळ जनावरांच्या खाण्यासाठीच केला जात होता. काही वर्षांमध्ये अनेक शास्त्रज्ञाने ओट्स वर संशोधन केले आणि ओट्स मनुष्यासाठी खाद्य बनविले.

ओट्स चा वापर मुख्यता स्नॅक्स म्हणून केला जातो. ओट्स मध्ये विविध पौष्टिक तत्वे आढळतात जसे की फायबर, विटामिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, सोडियम, प्रथिने, विटामिन बी यांसारखे बरेच पौष्टिक तत्व असतात जे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.

ओट्स मध्ये फायबरचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतील जे पाण्यामध्ये सहजरित्या विरघळले जाते. त्यामुळे आपले पोट सहजपणे भरते. त्यामुळे उपासमार लवकर भासत नाही.

ओट्स मध्ये असणारी पौष्टिक तत्त्वे । Nutrients Of Oats

ओट्स मध्ये प्रथिने, जीवनसत्वे व फायबर यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते त्यासोबतच मॅग्नेशियम पोटॅशियम लोह सोडियम, नियासिन, थायमिन, फोलेट, विटामिन बी, रायबोफ्लेवीन यांसारखे इतर पौष्टिक तत्व ओट्स मध्ये आढळतात.

ओट्स चे प्रकार । Various Types of Oats

बाजारा मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या स्वादानुसार oats चे प्रकार पाहायला मिळतात. परंतु फ्लेवर फ्री ओट्स मध्ये बऱ्याच प्रमाणात नैसर्गिक गुणधर्म पाहायला मिळतात. त्यामुळे ओट्स खरेदी करताना नेहमी फ्लेवर फ्री ओट्स खरेदी करावे.

आजच्या लेखामध्ये आपण काहीही लोकप्रिय आणि वैविध्यपूर्ण ओट्स च्या प्रकारावर माहिती पाहणार आहोत ती पुढील प्रमाणे;

1. रोल केलेले ओट्स | Rolled Oats :

रोल केलेले ओट्स हे खूप जुना ओट्स चा प्रकार समजला जातो. तसेच रोल्स केलेल्या ओट्स ना उच्च प्रतीचे ओट्स समजले जाते. यामध्ये अनेक जीवनसत्वे पहायला मिळतात.

रोल केलेले ओट्स हे एक प्रकारचे पिट आहे ज्याचा आकार सपाट आणि अनियमित असतो. रोली केलेल्या ओट्स चा वापर सामान्यता कुकीज, लाप्सी, ब्रेड इत्यादी स्वरूपामध्ये केला जातो.

2. झटपट ओट्स | Instant Oats :

झटपट ओट्स लाग इन्स्टंट ओट्स किंवा क्विक ओट्स असे देखील म्हणतात. हे ओट्स इतर प्रकारापेक्षा खूपच लवकर शिकतात म्हणूनच त्याला झटपट ओट्स असे म्हणतात. इन्स्टंट ओट्स हे क्रीम रंगाचे पातळ आणि कोमल असतात.

3. स्टील कट ओट्स | Steel Cut Oats :

स्टील कट ओट्स हे लहान तुकड्यांमध्ये आढळतात. स्टील कट ओट्स ला शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. आपण आपल्या आवडीनुसार या ओट्स ला तिखट गोड या प्रमाणात शिजवू शकतो.

4. ग्रोट्स ओट्स | Groats Oats :

ग्रोट्स ओट्स हे सर्वात मुख्य प्रकाराचे ओट्स आहेत. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते. दलीया किंवा खिचडी बनवून या प्रकाराच्या ओट्सचे सेवन केले जाते. हा ओट्स चा मूळ प्रकार म्हणून देखील ओळखला जातो.

ओट्स चे फायदे | Benefits of Oats For Health :

ओट्स ची पोषण रचना खूप चांगली व संतुलित आहे त्यामुळे ओटचे सेवन केल्यास आरोग्याला खूप फायदा होतो.

ओट्स चे फायदे Benefits of Oats In Marathi पुढील प्रमाणे आहेत.

1. त्वचेसाठी ओट्स चा फायदा | Oats For Skin in Marathi :

ओट्स हा त्वचेसाठी उपयोग फायद्याचा ठरतो. 2003 मध्ये झालेल्या एफडीएने कॉलोईडल ओट्स ला त्वचा संरक्षणात्मक पदार्थ म्हणून मंजुरी दिलेली आहे. ओट्स त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांमध्ये खूप फायद्याचा ठरतो. जसे की त्वचेची खाज, त्वचेची इरिटेशन आणि त्वचेच्या संबंधित इतर आजार.

2. बालपणीच्या दम्यावर ओट्स फायदेशीर | Oats are beneficial for childhood asthma :

दम्याचा आजार हा बालपणीच्या मुलांमध्ये खूप असामान्य समस्या आहेत. एका अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की बालपणीच्या मुलांना म्हणजेच सहा वर्षाच्या मुलांना जर दम्याचा आजार असेल तर त्यांना ओट्स खायला दिल्याने दम्याचा त्रास कमी होतो.

3. वजन कमी करण्यासाठी ओट्स फायदेशीर ठरतात | Weight Loss Tips Oats in Marathi :

ओट्स मध्ये विविध प्रकारचे पौस्टीक तत्व असतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर यांचा देखील समावेश होतो. ओट्स मध्ये असलेली कार्बोहायड्रेट आणि फायबर हे सतत पोट गच्च असल्यासारखे भासवते. त्याप्रमाणेच ओट्स मध्ये कमी कॅलरी असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. ओट्स चे सेवन केल्याने लवकर भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ओट्स खूप फायदेशीर ठरतो.

4. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ओट्स चा फायदा | To Control Blood Sugar Using Oats :

टाइप 1 मधुमेह हा सामान्य रोग आहे आजच्या काळामध्ये बहुतांश योजना मध्ये टाईप वन मधुमेह पाहायला मिळतो. टाइप 1 मधुमेह यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे टाइप 1 मधुमेह असलेल्या व्यक्ती सतत इन्सुलिन घेत असतो परंतु ओट्स चे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत होते. त्यामुळे मधुमेहावर ओट्स हा रामबाण उपाय ठरतो.

5. हृदय रोग कमी करण्यासाठी ओट्स चे फायदे | Benefits Of Oats For Reducing Heart Disease :

जगभरामध्ये वाढत चाललेला मृत्युदराचे सर्वात जास्त कारण म्हणजे हृदयरोग हे आहे. बहुतांश लोक हे रुदय रोगामुळे मृत पावतात.

बऱ्याच संशोधनातून असे दिसून आले आहे की, ओट्स मधील बीटा ग्लूकन फायबर एकूण आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रण करण्यासाठी ओट्स खूप फायद्याचा ठरतो.

ओट्स फायबरचा एक उत्तम सोर्स | An Excellent Source of Fiber In Oats :

ओट्स मध्ये फायबरचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे ओट्स फायबरचा एक उत्तम सोर्स आहे ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये फायबरची मात्रा कमी असते त्यांनी नियमित ओट्स चे सेवन केल्यास त्यांच्या शरीरातील फायबर ची मात्रा भरून येईल.

ओट्स चे दुष्परिणाम | Side Effect of Oats in Marathi :

बहुतेक लोकांना ओट्स जे सेवन केल्यास काहीही दुष्परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे ओट्स ला बऱ्याच प्रमाणात सुरक्षित मानले जाते.

मात्र काही लोकांना ओट्स चे सेवन केल्यास आतड्या संबंधीचे दुष्परिणाम दिसून येतात. जसे की पोटात दुखणे, पोटात गॅस भरणे इत्यादी.

हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वप्रथम जेव्हा ओट्स खाण्यास सुरुवात करणार आहात तेव्हा पोटचे मात्र खूप कमी ठेवावी. हळूहळू शरीराला सवय झाल्यानंतर ही मात्रा वाढवा.

तर मित्रांनो ! Oats Meaning in Marathi | ओट्स म्हणजे काय? आणि ओट्स बद्दल संपूर्ण माहिती. हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment