ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध मराठी | Online Shikshan Kalachi Garaj Nibandh Marathi

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध मराठी | Online Shikshan Kalachi Garaj Nibandh Marathi

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक जण शिक्षणासाठी धडपड करत असतो. आणि शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला समाजा मध्ये देखील खूप मान सन्मान मिळतो.

तसेच शिक्षणामुळे तिचे आयुष्य सुधारते एखादा सामान्य व्यक्ती सुद्धा उच्च पदावर कार्य करू शकतो व त्याला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत सुद्धा मिळतात. त्यामुळे शिक्षणाला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो.

परंतु सुरवातीच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये खूप सारे बदल झाले आहेत या बदलांमध्ये शिक्षण प्रणाली देखील बदलत गेली आहे आणि सुरुवातीचे ऑफलाईन पद्धतीचे शिक्षण हे आज काळानुसार ऑनलाइन पद्धतीचे झाले आहेत.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध मराठी | Online Shikshan Kalachi Garaj Nibandh Marathi

त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज बनत चालले आहे म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही ” ऑनलाईन शिक्षण काळाची गरज “ घेऊन आलो.

आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे आहे तेव्हा आपण ठरवलेले एकादे ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावेच लागते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला यशस्वी बनवण्याकरिता शिक्षण खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये शिक्षणा मार्फत खूप काही प्राप्त केलेले आहे. कोणत्याही यशस्वी व्यक्तीचा विचार केला असता तर तो व्यक्ती शिक्षणामुळेच उच्च दर्जा वर पोहोचला आहे मग ते शिक्षण कुठलेही असो.

परंतु ज्याप्रमाणे काळ बदलत चालला आहे त्याप्रमाणे शिक्षणाची स्थिती आणि स्वरूप देखील बदलत चालले आहे.

बाळाची संपूर्ण जगभरामध्ये फसलेल्या कोरणा-या महामारी मुळे सर्व जग ठप्प झाले. कित्येक महिने संपूर्ण जगभरातील कोणताही व्यवसाय, धंदा, उद्योग एवढचं असून शाळा सुद्धा बंद राहिल्या. त्यामुळे संपूर्ण जग अस्थिर झाले.

मागील काही वर्षामध्ये वर्गात बसून विद्यार्थी प्रत्यक्षात शिक्षकांसमोर  बसून शिक्षण घेत होते. विद्यार्थी स्वतःच्या अडचणी सर्व काही शिक्षकांचे संवाद हे प्रत्यक्षात साधत होते परंतु  कोरोना महामारी मुळे जगभरातील सर्व शाळा  बंद झाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण देखील बंद झाले.

मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान हे योग्य आहे का? विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षण खूप गरजेचे आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून संपूर्ण जगभरामध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करण्यात आली व ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज बनली आहे.

शाळा, कॉलेज बंद झालेले ऑनलाईन शिक्षण प्रणाली हा पर्याय सर्वांसाठी योग्य ठरला. परिस्थिती कशीही असो ज्ञान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करणे खूप गरजेचे आहे त्यातील एक पद्धत म्हणजे ऑनलाईन शिक्षण प्रणाली होय.

कोरोना सारख्या भयंकर महामारी च्या काळामध्ये  शिक्षक, विद्यार्थी घरामध्ये न बसता ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात.  त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा उपयोग आणि  वेग खूप मोठ्या प्रमाणे वाढताना पाहायला मिळत आहे.

परंतु आपल्यातील काही जणांच्या मते ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही योग्य नाही. परंतु आपण सर्व दृष्टीने विचार केला तर ऑनलाईन शिक्षण पद्धत ही देखील एक उत्तम पद्धत ठरू शकते.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगभरामध्ये कोरोना पसरलेला आहे या काळामध्ये विद्यार्थ्यांचे दोन वर्ष वाया गेले असते. परंतु ऑनलाइन शिक्षण  पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना हवे तसे ज्ञान प्राप्त झाले व त्यांच्या आयुष्यातील दोन वर्ष वाया न जाता त्यांच्या जीवनाला उज्ज्वल करण्यासाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन शिक्षणप्रणाली कडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वांनी बदलायला हवा.

ऑनलाइन शिक्षण हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकते हे Covid-19 च्या काळामध्ये सर्वांना कळालेच असेल.

” Online Shikshan Kalachi Garaj Marathi Nibandh “ वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हवे ते शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम आहे.

आजच्या जगाला डिजिटल जग म्हटले जाते. या डिजिटल काळामध्ये शिक्षण सुद्धा डिजिटल झाले आहे. ही एक खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि याचा प्रत्येकाने स्वीकार करणे तितकेच गरजेचे आहे.

विद्यार्थी डिजिटल माध्यमाने म्हणजेच कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल या साधनांच्या द्वारे एकमेकांकडून ज्ञानाची देवाणघेवाण करू शकतात. डिजिटल पद्धतीने शिकत असताना येणाऱ्या अडचणी एकमेकांना सांगून त्यावर समाधान शोधू शकतात.

कोरोना काळा मध्ये खूप सारे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले. शिक्षक विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थी शिक्षकांशी सहजरित्या संपर्क साधून  ज्ञान मिळवू शकता. घरी बसून ज्ञान मिळवण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाला.

मुलांना ऑनलाइन पद्धतीने देखील चांगले शिक्षण प्राप्त व्हावे या हेतूने शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना पर्यंत संपर्क साधणे सोपे झाले. वेळोवेळी ऑनलाईन माध्यमांद्वारे पालकांची मीटिंग घेऊन आपल्या पाल्याची प्रगती सांगता येऊ लागली आहे.

खूप दूर वरून पायी चालत शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता घरबसल्या शिक्षण घेणे सोपे झाले आहे. ऑनलाइन शिक्षणाची खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण काळाची गरज झाली आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे :

काही विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिक्षण प्राप्त करण्यात आवडते ते काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकायला खूप आवडते. आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा विचार केला तर ऑनलाइन शिक्षणाचे बरेचसे फायदे आहेत.

शिक्षणामुळे आपल्या वेळेची बचत होईल. तसेच आपण आपल्याला पाहिजे ते शिक्षण प्राप्त करून घेऊ शकतो. शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी शिक्षकांनी सहजरित्या संपर्क साधून सोडवू शकतो.

एवढेच नसून खूप दूरवरून प्रवास करून शाळेला येणाऱ्या मुलांचा वेळ वाचू शकतो तोच वेळ विद्यार्थी अभ्यासाला देऊ शकतात एवढेच नसून शाळेला जाण्यासाठी लागणाऱ्या पैशांची बचत सुद्धा होऊ शकते.

होंडाई शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण जे काही लिखित करत आहोत ते रेकॉर्ड करू शकतो व एखादा मुद्दा आपल्याला कळाला नाही तर आपण ते पुन्हा पुन्हा पाहू शकतो.

तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आणखी एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना स्वय अध्ययनाची सवय लागली. प्रत्येक विद्यार्थी स्वतःचा अभ्यास पूर्ण करू लागला.

शिक्षण प्रणालीमुळे थोडासा बदल झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धती ही खूपच प्रिय वाटू लागली. मोबाईल द्वारे मोबाईल मध्ये पाठवण्यात येणारे व्हिडिओ, नोट्स  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दल अधिकच आवड निर्माण झाली.

तसेच ऑनलाइन माध्यमाने शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांची मीटिंग घेऊ लागले व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आराखडा देऊ लागले.

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे खूप गरजेचे आहे व ऑनलाईन शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे हे मानून त्याचा स्वीकार केला  पाहिजे.

तर मित्रांनो ! ” ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध मराठी | Online Shikshan Kalachi Garaj Nibandh Marathi “  हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


हे सुद्धा देखील अवश्य वाचा :

1 thought on “ऑनलाईन शिक्षण काळाची गरज निबंध मराठी | Online Shikshan Kalachi Garaj Nibandh Marathi”

Leave a Comment