ऑनलाइन शिक्षण वरदान की शाप निबंध मराठी | Online Shikshan Vardan Ki Shap Essay In Marathi

ऑनलाइन शिक्षण वरदान की शाप निबंध मराठी | Online Shikshan Vardan Ki Shap Essay In Marathi

मित्रांनो ! आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाला किती महत्त्वाचे स्थान आहे हे सर्वांनाच माहिती आहे. शिक्षणामुळे व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. परंतु, अलीकडे शिक्षणाची पद्धत बदलली असून आजचे शिक्षण ऑनलाइन स्वरूपाची चालू आहे.

ऑनलाईन पद्धतीचे जितके फायदे आहेत तितके तोटे सुध्दा आहेत. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही ” ऑनलाइन शिक्षण वरदान की शाप निबंध मराठी | Online Shikshan Vardan Ki Shapp Essay In Marathi “ घेऊन आलोत.

ऑनलाइन शिक्षण वरदान की शाप निबंध मराठी | online Shikshan vardan ki shap essay in Marathi:

आज संपूर्ण जगाला कोरोना महामारी ने ग्रासले आहे. या काळामध्ये सर्व काही ऑनलाइन होते चालले आहे. लोकांचे व्यवहार, काम धंदे सर्व काही ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे आजच्या काळाचे शिक्षण देखील ऑनलाइन स्वरूपाचे झाले आहे.

नुसते शिक्षण ऑनलाइन तर लहान मुलांपासून पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी आज घरबसल्या ऑनलाइन स्वरूपाने ज्ञान प्राप्त करून घेत आहेत. आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून हे तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रामध्ये योग्यरीत्या वापरत आहे.

मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप अशा माध्यमांच्या सहाय्याने झूम मिटिंग, गुगल मीटिंग अश्या ऑनलाईन ॲप्लिकेशन च्या साह्याने आजचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. घर बसल्या मुले-मुली मोबाईल च्या आणि इंटरनेटद्वारे शिक्षण घेत आहेत.

एका बाजूने विचार केला असता सर्वोच्च ठप्प झालेले असताना सुद्धा ऑनलाईन माध्यमाने विद्यार्थी घर बसून आपला अभ्यास पूर्ण करत आहेत व पुढे जात आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी योग्य ठरत आहे. काहीजण तर ऑनलाइन शिक्षण पद्धतीला वरदान मानत आहेत.

परंतु याच ऑनलाइन शिक्षणाचे काही तोटे देखील आहेत त्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही शाप ठरत आहे. ऑनलाईन शिक्षण शाप हे कसे? मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपाचे शिक्षण दिले जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना घरात बसून शिक्षण घेण्याची सवय लागली आहे मग सर्व काही पुन्हा व्यवस्थित झालेले मुले शाळेत जाण्यासाठी तयार होतील का? हा एक चिंतेचा विषय बनत चालला आहे. कारण आजच्या मुलांना आपण च्या प्रमाणे शिक्षण देऊ किंवा घडवू मुले त्याच प्रमाणे घडत जातात.

थोडक्यात सांगायचे म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचे जितके फायदे आहेत तितके त्याचे तोटे देखील आहेत.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे :

1. जसे की, आपल्याला माहिती आहे ऑनलाइन शिक्षण प्रणाली मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष रूपाने न जाता घरी बसल्या तो मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी माध्यमांच्या सहाय्याने शिक्षण घेऊ शकतो. तसेच शाळेमध्ये जाण्यासाठी काही मुले पायी जातात काही मुले सायकल किंवा इतर वाहनांचा वापर करतात. परंतु शिक्षण आता घरी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ तशी उर्जा देखील वाचते हा एक ऑनलाईन शिक्षणाचा महत्त्वपूर्ण फायदा आहे.

2. ऑनलाइन शिक्षणाचा आणखी सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे,‌ऑनलाईन शिक्षण घेत असताना किंवा एखाद्या लेक्चर चालू असताना आपण ते लेक्चर रेकॉर्ड करू शकतो. जेणेकरून पुन्हा अभ्यास करताना किंवा काही अडचण आल्यास किंवा एखादा मुद्दा आपल्याला कळाला नाही तर आपण ती रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा पाहून व्यवस्थित रीतीने समजावून घेऊ शकतो.

3. एवढेच नसून तुमचे विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात पासून दूर वर्षा अंतरावर राहतात त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पोहचण्यासाठी लागणारी वेळ आणि पैशाची बचत होते.

4. ऑनलाइन शिक्षणाचा आणखीन एक सर्वात महत्त्वाचा फायदा हासुद्धा आहे की, ऑनलाइन माध्यमातून आपण देशातीलच नव्हे तर परदेशातील शिक्षण कोणत्याही संस्थेद्वारे किंवा कोणत्याही महाविद्यालयातील लेक्चर ऑनलाइन ॲपच्या मदतीने प्राप्त करू शकतो व ते लेक्चर अटेंड करू शकतो.

5. आपल्या अभ्यासक्रमातील एखादा मुद्दा धडा किंवा कविता आपल्याला कळाली नसेल तर आपण ते गुगल चर्या, युट्युब च्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा समजावून घेऊ शकतो.

6. ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झाल्यामुळे सर्व विद्यार्थी एका वर्गांमध्ये बसणे शक्य झाले नाही त्यामुळे कोरोना सारख्या मारीचे संक्रमण टाळता आले. कोरोना संसर्गाची भीती ऑफलाईन माध्यमांमध्ये जाणवत होती ती भीती ऑनलाइन वर्गामध्ये जाणवणार नाही. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपण सोशल डिस्टंसिंग योग्यरीत्या पालन करू शकतो.

7. ऑनलाइन शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागली. विद्यार्थी एखादा मुद्दा कळाला नाही तर शिक्षकाच्या मदतीने किंवा गुगलच्या मदतीने समजाऊन घेत आहेत.

8. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाचे अधिकच आवड निर्माण झाली. आजच्या तरुण पिढीला मोबाईल हाताळण्याची खूप आवड आहे.त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासोबतच गेम खेळणे, चॅटिंग करणे किंवा इतर ॲप्स वापरणे हे देखील शक्य झाले आहे.

9. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप हाताळणे शक्य झाले आहे व विद्यार्थी कमी वेळेमध्ये अशी डिजिटल उपकरणे योग्यरीत्या वापरणे शिकले आहेत.

10. ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बालकांचा सकाळी लवकर उठून टिफिन बनविणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे व त्यांना शाळेला नेऊन सोडणे हादेखील वेळ वाचत आहे.

अशा प्रकारे ऑनलाईन शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांसाठी सोबत पालकांसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे वरदान ठरत आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे :

ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणेच ऑनलाइन शिक्षणाचे जितके फायदे आहेत त्याच प्रमाणामध्ये तोटे देखील आहे. या तोट्यां मुळेच कदाचित ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी शाप ठरत आहे.

1. ऑनलाईन शिक्षणाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे, ऑनलाईन शिक्षण प्राप्त करण्यासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल आणि इंटरनेट या माध्यमाची आवश्यकता असते परंतु आपल्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही बळकट असेलच असे नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण या माध्यमातून शिक्षण घेणे सोपे नाही.

2. आपल्यातील बहुतांश विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षणाला गंभीरपणे घेत नाहीत लेक्चर चालू असतानाही काही विद्यार्थी लेक्चर च्या मधून उठून जाणे इतरांशी गप्पा मारणे किंवा गेम खेळणे इत्यादी गोष्टी करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढे योग्य असे ज्ञान या माध्यमातून मिळू शकतं आहे.

3. ऑनलाइन शिक्षणाचा आणखीन एक सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे, शिक्षक वर्गामध्ये प्रात्यक्षिक रूपामध्ये विद्यार्थ्यांकडे जसे लक्ष देतात त्याच प्रमाणे लक्ष ऑनलाईन शिक्षणा माध्यमातून देता येणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी लेक्चर कडे गांभीर्याने पाहतो की नाही हे शिक्षकांच्या लक्षात येणे खूप कठीण आहे.

4. ऑनलाइन शिक्षणातील सर्वात मोठी अडचण म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क चा प्रॉब्लेम हा केव्हाही येऊ शकतो. एवढेच नसून रिचार्ज संपला किंवा नेट पॅक संपला तर ऑनलाईन शिक्षण हे खंडित होते.

5. तसेच ऑनलाईन शिक्षणाचा तोटा म्हणजे जास्त वेळ मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप यांच्या स्क्रीन सोमवार असल्याने विद्यार्थ्यांना डोळ्याचा त्रास, कंबर दुखी अशा आजारांना सामोरे जावे लागते.

6. घरी बसून शिक्षण प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मित्र-मैत्रिणी शी बोलणे शक्य राहिले नाही. त्यामुळे आजचे विद्यार्थी कम्युनिकेशन मध्ये खूप मागे राहिले आहे.

7. ऑनलाइन शिक्षणामुळे लहान वयामध्ये मुलांना मोबाईल सारख्या उपकरणाचा वापर करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मोबाईलचा योग्य वापर करतो हे सांगणे कठीण आहे.

या सर्व कारणांमुळेच ऑनलाईन शिक्षण हे शाप ठरत चालले आहे.

तर मित्रांनो ! ” ऑनलाइन शिक्षण वरदान की शाप निबंध मराठी | Online Shikshan Vardan Ki Shap Essay In Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment