पाण्याचे महत्व आणि उपयोग जाणून घ्या । Panyache Mahatva in Marathi.

पाण्याचे महत्व मित्रांनो, मनुष्याला जगण्यासाठी आणि महत्वपूर्ण गरजांची आवश्यकता असते त्यामध्ये अन्न, वस्त्र व निवारा, पाणी आणि हवा या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

निसर्गा मधून आपल्याला बऱ्याचशा वस्तू मिळतात व आपल्या गरजा पूर्ण होतात निसर्ग आपल्याला कसलाही मोबदला न घेता आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतो. पाणी हे निसर्गाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.

पाण्यामुळे सर्व सजीव जिवंत आहे तसेच झाडे, पशू, पक्षी आणि इतर सर्व गोष्टींसाठी पाणी खूप महत्त्वाचे लागते त्यामुळे पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे.

पाण्याचे महत्व आणि उपयोग जाणून घ्या । Panyache Mahatva in Marathi.

पाणी हे सर्व सजीवांसाठी आणि निसर्ग साठी अत्यंत उपयुक्त घटक आहे. यामुळेच पाणी हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

पाणी म्हणजे जीवन अमृत म्हणाला आली या नावाने देखील ओळखले जाते. या पृथ्वीवरील सर्व सजीवांचे आणि पशुपक्ष्यांचे आणि मानवाचे जीवन हे केवळ पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याचा उल्लेख अतिशय पण म्हणून देखील केला जातो. नंतर या पृथ्वीतलावरील कोणताही तशी तू जवळी ये जरा हात नाही याशिवाय पाण्यामध्ये लाखोच्या संख्येने जीव आपले जीवन जगत असतात.

पाण्यावर संपूर्ण निसर्गचक्र अवलंबून आहे याशिवाय अन्नसाखळी देखील पाण्यावरच अवलंबून आहे. कारण पृथ्वीवरील कोणताही जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून माणसाच्या मूलभूत दिवसांमध्ये पाण्याचा समावेश केला जातो.

ज्याप्रमाणे सजीव अन्नाशिवाय जगू शकत नाही, हावे शिवाय जगू शकत नाही त्याप्रमाणेच पाण्याशिवाय जीवन जगणे खूपच कठीण आहे. पाण्या शिवाय पृथ्वीतलावर आपण जीवन जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही.

पृथ्वीतलावर आढळणाऱ्या पाण्यामध्ये साधारणत दोन प्रकारचे पाणी आढळते. एक म्हणजे खारट पाणी आणि म्हणजे गोड पाणी.

खारट पाणी हे साधारणतः समुद्रामध्ये पाहायला मिळते जगामध्ये असंख्य संख्येने जीव आपले जीवन जगत असतात. तसेच गोड पाणी हे नद्या, नाले, तलाव, सरोवरे यांमध्ये आढळते आणि याच पाण्याचा वापर आपण पाणी पिण्यासाठी करतो.

आपल्या पृथ्वीतलावर एकूण 71 टक्के पाणी आले होते परंतु त्यातील काही टक्केच म्हणजे तीन टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जाते .त्यामुळे आजच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या उद्भवत आहेत. प्रदूषणामुळे पाणी दूषित होत चालले आहे. म्हणून पाण्याचे महत्व जाणून पाण्याचा योग्य वापर करणे आजच्या काळाची गरज बनली आहे.

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाण्याची खूप गरज भासते. लहानात लहान काम करायचे म्हटले तरी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. पाणी केवळ पिण्यासाठी वापरले जात नाही, पाण्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो जसे की पाण्यामध्ये अनेक सजीव आपले जीवन जगत असतात.

तसेच घर कामासाठी म्हणजे भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी पाणी वापरले जाते. याशिवाय औद्योगिक क्षेत्रामध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एवढेच म्हणून पाण्या पासून ऊर्जा निर्मिती देखील केली जाते.

पाण्याची सर्वात मोठी मदत होते ती म्हणजे शेतीसाठी‌, कारण मानव पाण्याशिवाय कुठल्याही प्रकारचे पीक घेऊ शकत नाही आणि पीक घेतले नसेल तर अन्श मिळत नाही व अन्ना शिवाय मनुष्य छगू शकत नाही त्यामुळे पाणी हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

याशिवाय आपल्या निसर्गाला आणि आणि निसर्गातील प्रत्येक झाडाला पाण्याची खूप गरज आहे म्हणून आपण पाण्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.

पिण्यासाठी पाण्याचे महत्व :

पाण्याचे महत्व आहे आपार आहे जे शब्दांमध्ये मानता येणार नाही. पाण्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो परंतु मुख्यतः पाण्याचे महत्व पाणी पिण्यासाठी वापरणार्‍या प्रत्येक मनुष्यासाठी पाणी अमृत आहे. कारण या पृथ्वीवरील कोणताही सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही.

पृथ्वीवर 71 टक्के पाणी असले तरी त्यातील 3 टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जाते. आजच्या काळामध्ये प्रदूषणामुळे पाण्याच्या समस्या उद्भवत असले तरीदेखील पिण्यासाठी पाण्याचे महत्त्व आहे खूप आहे.

वनस्पती साठी पाण्याचे महत्व :

मानवाला ज्याप्रमाणे पाण्याची अत्यंत गरज आहे त्याप्रमाणेच निसर्गातील प्रत्येक झाडाला देखील पाण्याची गरज आहे. कारण झाडे आपल्या मुळांच्या मार्फत जमिनीतील पाणी शोषून घेतात व झाडाच्या प्रत्येक शाखा नंतर यांचा पोहोचवतात.

त्याचा झाडाच्या खोडामध्ये पाण्याची साठवण केली जाते. थोडक्यात सांगायचे म्हणजे झाडांना वाढण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज भासते.

पाण्याची मे झाडांची लागवड केली का नाही शाळेला वेळेवर पाणी मिळाले नाही तर झाडे सुकून जातात काही वेळा जळतात सुद्धा.

झाडांपासून आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या सर्व गोष्टीची पूर्ती होते. याशिवाय औषधनिर्मिती, लांकूड देखील मिळते. परंतु बहुपयोगी ठरणाऱ्या अशा या झाडांना जगण्यासाठी पाण्याची गरज भासते.

शेतीसाठी पाण्याचे महत्व :

शेतीमध्ये पीक पिकवले जाते व या पिकापासून अन्न निर्मिती होते परंतु शेतीमध्ये पिकाला पिकवण्यासाठी गरज असते ती म्हणजे पाण्याची. पाणी नसेल तर शेती मध्ये कुठल्याही प्रकारचे पीक येत नाही. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी पाण्याची गरज असते त्यामुळे शेतीसाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याचे महत्व :

मनुष्याप्रमाणे प्राण्यांना आणि पक्षांना देखील पाण्याची गरज असते. पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच प्राण्यांना आणि पक्षांना जीवन जगण्यासाठी पाणी गरजेचे आहे. पाणी ही अशी एक मात्र गोष्ट आहे ज्याच्या शिवाय कोणतेही पशुपक्षी आणि सजीव जीवन जगू शकत नाही.

वाळवंटी प्रदेशात आढळणारे प्राणी दिवसाला 50 लिटर पेक्षा जास्त पाणी पितात. त्यानंतर काही दिवस ह्या प्राण्यांना पाणी दिले नाही तरीदेखील चालते.

औद्योगिकीकरणासाठी पाण्याचे महत्व :

आपल्या अवतीभवती आहे कारखाने मोठे उद्योगधंदे आपण पाहत असतो या कारखान्यांमध्ये काम करून कित्येक मनुष्य आपला उदरनिर्वाह पूर्ण करतात परंतु या कारखान्यांना चालण्यासाठी पाण्याची गरज भासते. असे अनेक उद्योग धंदे आहेत जे पूर्णता पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे अशा उद्योगधंद्यांना प्राणी मिळाले नाही तर ते ठप्प होतील. त्यामुळे औद्योगिकीकरणासाठी पाण्याचे महत्त्व खूप मोठे आहे.

पाणी संवर्धन उपाय :

पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक सजीवाला आपले जीवन जगण्यासाठी पाण्याची खूप आवशक्यता भासते. त्यामुळे पाणी संवर्धन करणे आणि पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करणे खूपच गरजेचे आहे.

पाणी हे एक अमूल्य संसाधन आहे. ज्याचा वापर आपण जितक्या काटकसरीने करू तेवढा आपल्या भविष्यामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध राहील अन्यथा येणाऱ्या पिढीला पाण्याची कमतरता भासू शकते.

त्यामुळे प्रत्येक मनुष्याला पाणी संवर्धन करून पाण्याचा काटकसरीने वापर करणे आपले कर्तव्य समजले पाहिजे. पाण्याचा व्यर्थ घालू नाये. आवश्यकता आहे तेवढाच पाण्याचा वापर करावा.

माणसाने पाण्याचा उपयोग आवश्‍यकतेनुसार आणि गरजेनुसारच करावा. जेव्हा आपण कुठलेही भाजी किंवा फळे देतो तेव्हा येणाऱ्या खाली न होता एखादा भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात धुवावी जेणेकरून पाणी बचत होईल. प्रत्येकाने काम झाल्यानंतर नळ बंदच केला पाहिजे.

तसेच पावसाचे पाणी टाकी किंवा खड्ड्यांमध्ये साठवून ठेवावे. या पाण्याचा वापर सांडपाणी म्हणून करावा. तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील नदी, नाले यांमध्ये दूषित पाणी सोडले जाणार नाही याची काळजी घ्यावी ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌किंवा तेथील पाणी दूषित केले जाऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि सजीवांनसाठी पाण्याचा एक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी हे जपून वापरले पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही यामुळेच म्हणतात, “पाणी हेच जीवन.” हे महत्व जाणून सर्वसामान्यांमध्ये पाण्याच्या संबंधित जनजागृती करायला हवी‌.

तर मित्रांनो, ” Panyache Mahatva in Marathi | पाण्याचे महत्व जाणून घ्या. “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!

Leave a Comment