पावसाळा ऋतु निबंध मराठी । Pavsala Nibandh । Pavsala Essay In Marathi

Pavsala Nibandh । Pavsala Essay In Marathi आपल्या भारत देशामध्ये एक विशिष्ट प्रकारचे ऋतुचक्र आहे. त्यात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंमध्ये विभागले आहे. व प्रत्येक ऋतू हा प्रत्येकी चार महिन्यांमध्ये विभागला आहे. व प्रत्येक ऋतू चे एक विशिष्ट महत्त्व आहे. परंतु या सर्व ऋतूं मध्ये सगळ्यांच्या पसंतीचा, आवडीचा ऋतू म्हणजे पावसाळा ऋतू.

उन्हाळ्याच्या कडाक्याचे दिवस संपत येताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा भाव बघायला मिळतो त्यामागचे कारण म्हणजे जून महिन्यापासून पावसाळा ऋतु चे आगमन झालेले असते व रिमझिम पावसाला सुरुवात होते.

आम्हाला आशा आहे की, आमचा हा निबंध पावसाळा ऋतु निबंध मराठी । Pavsala Nibandh । Pavsala Essay In Marathi मध्ये तुम्हाला खूप खूप आवडेल .

पावसाळा ऋतु निबंध मराठी । Pavsala Nibandh । Pavsala Essay In Marathi

मुख्यतः पावसाळ्याचा कालावधी हा जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आहे. पण जून महिन्यापासून दक्षिण दिशेकडून अतिशय थंड वारे यायला सुरुवात होती त्या वार्‍याला मान्सून वारे म्हटले जाते व पावसाळ्याला आगमन होण्यास सुरू होते.

पाऊस म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अप्रतिम हास्य बघायला मिळेल. पावसामुळे जमीन थंड आणि हिरवी बनते हा बदल खूप जणांना आवडतो. सुरुवातीचा रिमझिम पाऊस, श्रावण महिन्यातील पाऊस खूप जणांचा प्रिय आहे. याच रिमझिम पावसाने जमिनीतून येणारा सुगंध अप्रतिम समजला जातो, मोर, कोकीळ, पोपट या पक्ष्यांचा आवाज मनाला मोहिवणारा आहे.

राष्ट्रीय पक्षी मोर याच पावसाळा ऋतु मध्ये नाचताना दिसेल. म्हणून पावसाळा हा ऋतू सर्वांच्या आवडीचा ऋतू झाला आहे. पावसामुळे निसर्गामध्ये खूप बदल होतात व लहान मुले पावसामध्ये खूप मज्जा करतात.

” ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा,

पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा “

हे गीत गात मुले पावसाचा आनंद घेतात. प्राचीन काळापासूनची अशी समजूत आहे की पावसाळ्याच्या पहिल्या पावसामध्ये भिजल्यास अंगावर फोडी येत नाहीत व पावसाळ्याच्या पहिल्या पावसाचे पाणी पिल्यास ताप, कावीळ या रोगांपासून मुक्तता होते म्हणून आजही काही लोक पहिल्या पावसाचे पाणी बाटलीत भरून ठेवतात व ताप आलेल्या व्यक्तीस पिण्यास देतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाला बघून जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सर्वात जास्त खुश होतो कारण पावसाळा ऋतू पासून जमीन नांगरण्यास,पेरण्यास सुरुवात होते आणि शेतीसाठी सर्वात महत्वाचे ते म्हणजे पाणी आणि ते मिळते याच पावसापासून आणि जीवश्यक गरजांमध्ये पाण्याला अन्य साधारण महत्त्व आहे आणि आपल्या हे सर्व पाणी पावसापासून मिळते.

पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी धो- धो स्वरूपात कोसळतो आणि या पावसात शाळेत जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. जर पावसाचा जोर हा जास्तच असला तर कधी- कधी शाळेला सुट्टी देखील मिळते. उन्हाळ्यामध्ये सुका पडणाऱ्या नद्या, नाले, विहीर, तलाव पावसाळ्या मध्ये पाण्याने भरून वाहायला लागतात.

पाऊस हा निसर्गाने दिलेले सर्वात मोठी देणगी आहे.

अलीकडील जग हे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यामध्ये उद्योगधंदे वाढत चालले आहेत. व त्या साठी सर्वात जास्त पाण्याची गरज भासते आणि हे पाणी आपल्याला पावसापासून मिळते.

पावसाळ्यामध्ये वातावरण एकदम निसर्गमयी असते. नव- नवीन गवत, झाडे- झुडपे याच ऋतू मध्ये जन्माला येतात. अनेकदा पाऊस खूप धो- धो जोरात पडतो त्यामुळे नुकसान सुद्धा होते. रस्ते चिखलाने भरून जातात.

नदी- नाल्यांना पूर ही येतो त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो व वाहतुकी बंद होऊन व्यापारही मंद होतो. आणि अनेकदा तर अतिवृष्टी मुळे घरे कोसळतात व अनेक गोर- गरीब रस्त्यावर येतात.

पावसाळ्यामध्ये खूप काही किडे, मुंग्या, नागतोडे, साप आणि गांडूळ जन्म घेतात. व काही कीटक तर फक्त पावसाळा या ऋतु पुरतेच बघायला मिळतात जसे की, गांडूळ, गोगलगाय, इत्यादी प्राणी, कीटक फक्त पावसाळा ऋतू मध्ये आपल्याला नजरेला येतात.

सर्वांच्या आवडतीचा सण गणेश उत्सव हा पावसाळा ऋतु मध्येच येतो. म्हणून पावसाळा हा ऋतू खूप जणांचा आवडीचा ऋतू बनला आहे.

पावसाळा ऋतु निबंध मराठी । Pavsala Nibandh । Pavsala Essay In Marathi

पावसाळा ऋतु तील वातावरण हे एकदम प्रसन्न वाटते. उन्हाळ्यामुळे कोरडी पडलेली जमीन ओली होते. वाळलेली झाडे पुन्हा टवटवीत होतात. ओसाड पडलेले नदी, नाले पुन्हा वाहू लागतात, पक्ष्यांचा किलबिलाट, आकाशामध्ये येणारे काळेभोर ढग, कुठून तरी येणार्‍या थंड वार्‍याच्या झुळका, पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात दिसणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य सगळे वातावरण हे मनाला प्रसन्न करणारे असते. गावा बाहेरचे डोंगर जणू पाचूचे वैभव धारण केलेले दिसते. त्यामधून येणारे पाण्याचे झरे, धबधबे कोसळतात ते ही वैभवशाली दिसतात.

पावसाळा हा ऋतू चालू होताच सगळ्यात जास्त आनंद होतो. तो म्हणजे शेतकऱ्याला. कारण उन्हाळ्यामध्ये थंडावलेली शेतीला बघून शेतकरी एकदम खचून जातो पण तोच पावसाळा चालू होणार म्हणजे पुन्हा शेती पिकणार शेतामध्ये धान्य डोलणार या विचाराने पावसाळा हा ऋतू शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो.

कारखाने, घर बांधणी या कामासाठी सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते आणि पाऊस पडल्यास या कामगारांना ही आनंद मिळतो.

म्हणून आनंद व सौंदर्य यांची एक सुंदर जोडणी या ऋतूत बघायला मिळते असते म्हणतात.

पावसाळा ऋतु मध्ये पर्यटकांचे प्रमाण सुद्धा वाढते, महाबळेश्वर, गोवा, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या भागामध्ये सौंदर्याने एक मिठीच मारलेली दिसते. ते बघण्यासाठी अनेक लोक जातात व पर्यटकांची संख्या वाढते.

पण पाऊस हा तेवढच जास्त हवा, जास्त पावसाळ्याचे उग्र रूप, पूर यामुळे नुकसान होतात. त्यामुळे जेवढा गरजेचा आहे तेवढेच पाऊस पडल्यास त्याचा फायदा होतो.

अनेकांचा आवडीचा ऋतू पावसाळा होण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळा ऋतु मध्ये गोकुळाष्टमी हा सण येतो. पावसामध्ये दहीहंडी ची मजा वेगळीच असते. ” नारळी पौर्णिमा ” हा सण देखील पावसाळ्यामध्ये येतो तसेच बळीराजाचे कृतज्ञ व्यक्त करण्याचा सण बैलपोळा सुद्धा पावसाळ्यामध्ये येतो.

पावसाळ्या ऋतु चे जेवढे फायदे आहेत तेवढेच त्यामुळे नुकसान ही होते. अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर येऊन अनेक गावांमध्ये पाणी शिरले व गावेच्या गावे बुढली कित्तेक लोक पाण्यामध्ये वाहून गेली. कित्येकाचे नुकसान झाले शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान देखील झाले.

जून 2013 मध्ये उत्तराखंड मध्ये ढगफुटी होऊन पूर झाल्याने त्या भागामध्ये अतिशय धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच पावसाळ्या मध्ये अनेक साथीच्या रोगांचे ही प्रमाण वाढते. नवीन पाणी आल्याने पाण्यामध्ये सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढून जुलाब, कावीळ, उलट्या, सर्दी, ताप, खोकला या साथींच्या रोगाचे प्रमाण वाढते व लोक आजारी पडू लागतात.

पण अलीकडे पाहिजे तेवढ्या व सुरुवाती पडत होता तसा पाऊस नाहीसा झाल्याचे दिसत आहे. तर अलीकडच्या दोन- तीन वर्षांमध्ये तर पाऊस नाहीसा झाल्याची चिन्ह दिसत आहेत. तर काही भागांमध्ये पावसा मुळे दुष्काळ पडला आहे. या मागचे कारण म्हणजे अलीकडे बदलत चालेला ऋतुकाळ.

वाढती लोकसंख्या, वाढते तापमान व महत्त्वाचे म्हणजे वृक्षतोड यामुळे पाऊस कमी झाला आहे. व त्यामुळे अलीकडे कोरडा दुष्काळ व प्रदूषण यांसारखे भयंकर संकट येत आहे. व त्यामुळे सर्व ऋतुचक्र सुद्धा बदलत जात आहे. पावसाळा ऋतु चा कालावधी अलीकडे बदलल्याचे दिसत आहे.

कधी अचानक येणारा अवकाळी पाऊस संपूर्ण पिकांचे नुकसान करतो तर कधी अचानक पणे होणारी पाऊस यामुळे सुद्धा खूप नुकसान होते तर कधी- कधी मुसळधार पावसा सोबत येणारे चक्रीवादळ हे संकट अलीकडे वाढत चालले आहे.

आपण सर्वांनाच माहिती आहे की आपल्या पृथ्वीला व या सजीव जीवांना पाऊस व पावसाळा ऋतू किती महत्वाचा आहे. म्हणून या सर्व दृष्टीने महत्त्वाचा असलेला पावसाळा ऋतु हा कालांतरा पर्यंत तसाच राहावा, वेळेवर पाऊस पडून ही सृष्टी सुंदर दिसावी या साठी आपण मनुष्यानी सुद्धा प्रयत्न केला पाहिजेत.

प्रदूषण कमी करुन वृक्षतोड थांबवली पाहिजे त्या मुळे पाऊस हा पावसाळ्या ऋतु मध्ये पडेल व त्यामुळे काही नुकसान न होता आपल्याला पाणी मिळेल व ज्या लोकांचा पावसाळा हा ऋतू आवडीचा आहे त्यांना या ऋतूचा आनंद लुटता येईल व सर्व पर्यावरण स्वच्छ व सुंदर होईल.

तर मित्रांनो ! ” पावसाळा ऋतु निबंध मराठी । Pavsala Nibandh । Pavsala Essay In Marathi “ वाचून तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment