पॉडकास्ट म्हणजे काय? आणि Podcast चे फायदे । Podcast Meaning in Marathi

Podcast Meaning in Marathi आजचे जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे आज जगामध्ये नवनवीन प्रयोग आणि नवनवीन शोध लागलेले आहेत. त्यामुळे आजचे जीवन अधिकच सोयीस्कर झालेले आहे.

यामुळे पॉडकास्ट ला आजच्या काळातील नवीन शोध म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. ज्याप्रमाणे व्हिडिओ, ब्लॉग आहेत त्याप्रमाणेच Podcast देखील एक नवीन माध्यम आहे.

पॉडकास्ट म्हणजे काय? आणि Podcast चे फायदे । Podcast Meaning in Marathi

ज्याप्रमाणे ब्लॉग मध्ये लेखाच्या माध्यमातून माहिती सांगितली जाते, व्हिडिओमध्ये चित्राच्या स्वरूपात माहितीची देवाणघेवाण केली जाते त्याप्रमाणेच Podcast हे ऑडिओ माध्यम आहे ज्याद्वारे आपल्याला माहिती ऐकायला मिळते किंवा आपण माहिती शेअर करू शकतो.

आजच्या Podcast Meaning in Marathi लेखामध्ये आपण Podcast बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

पॉडकास्ट म्हणजे काय? आणि पॉडकास्ट चे फायदे । Podcast Meaning in Marathi

पॉड कास्ट हे एक माध्यम आहे ज्यामध्ये केवळ ध्वनीचा वापर करून माहिती दिली जाते. पॉडकास्ट वेगळे काही नसून त एफ.एम आणि रेडिओ यासारखे एक माध्यम आहे. ज्यामध्ये केवळ आवाज ऐकायला येते आणि आवाजा मार्फत आपल्याला माहिती देखील मिळते.

पॉडकास्ट म्हणजे काय? । What is Podcast in Marathi

ज्याप्रमाणे आपण ब्लॉग गुगल ला शेअर करतो किंवा एखादा व्हिडिओ युट्युब ला शेअर करतो म्हणजे युट्यूब आणि ब्लॉग च्या माध्यमातून माहिती इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणेच पॉडकास्ट च्या माध्यमातून आपण आपली माहिती केवळ ध्वनी च्या माध्यमातून शेअर करू शकतो.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे, ब्लाॅग दारे माहिती शेअर करायला आपल्याला गुगलसारख्या प्लॅटफॉर्म ची गरज भासते, व्हिडिओ शेअर करायला यूट्यूब सारखे प्लॅटफॉर्म ची गरज भासते, त्याप्रमाणे आपली माहिती ध्वनी च्या स्वरूपातून शेयर करण्यासाठी आपल्याला पाॅडकास्ट प्लॅटफॉर्म ची गरज असते.

म्हणजेच, पॉडकास्ट हा एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे फक्त ऑडिओ सामायिक केले जातात. आणि पॉडकास्ट एका तऱ्हेने रेडिओच आहे. ज्यावर आपण आपल्या आवाजात ऑडिओ शेअर करू शकतो. शेअर केलेला ऑडिओ ज्यांना जेव्हा हवा तेव्हा ते ऐकू शकतात.

Podcast कसा केला जातो? । How To Make a Podcast?

पॉडकास्ट म्हणजे काय? आणि Podcast चे फायदे । Podcast Meaning in Marathi
पॉडकास्ट म्हणजे काय? आणि Podcast चे फायदे । Podcast Meaning in Marathi

मित्रांनो, Podcast Meaning in Marathi लेखामध्ये तुम्हाला Podcast म्हणजे काय? कळाले असेल आता आपण Podcast कसा केला जातो पाहणार आहोत.

ज्याप्रमाणे ब्लॉग शेअर करण्यासाठी आपल्याला एखाद्या वेबसाईटचे आवश्यकता भासते आणि विषयावर काढण्यासाठी युट्युब ची आवश्यकता असते त्याप्रमाणेच ऑडिओ शेअर करण्यासाठी Podcast ची आवश्यकता असते. याउलट Podcast ला कुठल्याही प्रकारची तंत्रज्ञानाची गरज नसते.

आपल्याकडे असणाऱ्या मोबाईलच्या साह्याने आपण Podcast सुरू करू शकतो.

ज्याप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्युब वर पोस्ट केला जातो त्याप्रमाणे ऑडिओ रेकॉर्ड करून तो पॉडकास्ट बनवता येते त्यानंतर बनवलेला पॉडकास्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट वर पोस्ट करता येतो.

आठवड्याला दिवसाला किंवा एका विशिष्ट वेळेला आपण Podcast चे प्रसारण करू शकतो. Podcast साठी आपल्याला केव्हाच जलद इंटरनेटची गरज लागते.

व्हिडिओ बनवण्या साठी लागणारे तंत्रज्ञान जसे कॅमेरा, लाईट, बॅकग्राऊंड यासाठी थोडाफार खर्च येतो. याउलट पॉडकास्टींग साठी एक चांगला माईक आणि आपला मोबाईल इतके पुरेसं आहे. फक्त आवाज उत्तम कसा येईल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आवाजासाठी ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर/अँप चा वापर केला जाऊ शकतो.

Podcast कसे चालू करायचे? । Step by Step Guide To Start Podcast in Marathi.

Podcast चालू करण्यासाठी आपल्याला जास्त कोणत्याही साधनांची आवश्यकता भासत नाही आपल्या जवळ असलेला मोबाईल मार्फत आपण Podcast चालू करू शकतो.

Podcast साठी आपल्याला केवळ आवाज रेकॉर्ड करायचं आणि आवाज रेकॉर्ड करणे ही काही नवीन गोष्ट नाही. साधारणतः सर्वांना आपल्या स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायला येते. Simple आपल्याला ची माहिती इतरांपर्यंत पोहोचवला ची आहे ती माहिती स्वतःच्या भाषेमध्ये रेकॉर्ड करायचे. मग तुम्ही आवाज रेकॉर्ड करत असताना background music लावून देखील आवाज रेकॉर्ड करू शकता.

आवाज रेकॉर्ड करत असताना केवळ आपला आवाज स्पष्ट ऐकायला यावा याची काळजी घ्यावी. कारण जेवढे रेकॉर्डिंग चांगली आणि ऐकायला स्पष्ट येते तेवढा आपला ऑडिओ वायरल होतो.

यानंतर तयार झालेला ऑडिओ पाॅडकास्ट मध्ये अपलोड करायचा.

खाली आम्ही काही Podcast होस्टिंग वेबसाइट्स दिलेल्या आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही अगदी सोप्या रित्या तुमच्या स्वतः चा पॉड कास्ट बनवू सामायिक देखील करू शकता.

  • Podbean
  • Anchor
  • Spreaker
  • Blubrry
  • BuzzSprout

Podcast मध्ये स्कोप आहे का? । Any Scope in Podcast

मित्रांनो अलिकडच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती कामांमध्ये खूप गुंतलेला आहे त्यामुळे युट्युब वर व्हिडिओ पाहणे केव्हा ब्लॉग वाचणे यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे हवी ती माहिती प्राप्त करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये Podcast सर्वाधिक वापर केला जात आहे.

त्यामुळे सध्या Podcast ला खूपच scope आलेला आहे. याशिवाय Podcast मधून आपण पैसे देखील कमवू शकतो. त्यामुळे Podcast मध्ये खूप स्कोप आहे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

येणाऱ्या काही काळामध्ये लोक Podcast ला आणखीन जास्त पसंत करतीऋ आणि व्हिडिओ पाहणे कमी करतील कारण व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आपली सर्व कामे जागीच थांबवावी लागतात. या उलट कुठल्याही प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी Podcast चा वापर करतील ‌. आपण आपले काम करत असताना देखील Podcast चा वापर करू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये Podcast मध्ये खूप स्कोप वाढेल.

पाॅडकास्ट चे प्रकार । Types of Podcast in Marathi

Podcast साठी आपण जे ऑडिओ रेकॉर्ड करणार आहे त्यामध्ये किती व्यक्ती आणि कोण कोण बोलणार आहे यानुसार पॉडकास्ट चे प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

1. व्यक्तिगत पॉडकास्ट ( Personal Podcast ) :

व्यक्तिगत पॉडकास्ट ( Personal Podcast ) Podcast Meaning in Marathi

व्यक्तिगत पॉडकास्ट मध्ये एकाच व्यक्तीचा आवाज असतो. यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या विषयावर स्वतःचे मत सांगत असते किंवा विचार मांडत असते. याव्यतिरिक्त व्यक्तिगत पॉडकास्ट मधून व्यक्ती स्वतःच्या अंगातील कौशल्ये देखील दाखवता तुमच्यापैकी चारोळ्या करणे, कविता म्हणने यासारखे इतर कौशल्य.

2. संभाषणपर पॉडकास्ट ( Conversation Podcast ) :

संभाषणपर पॉडकास्ट ( Conversation Podcast ) Podcast Meaning in Marathi

संभाषणपर पॉडकास्ट मध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा आवाज असतो.

संभाषणपर पॉडकास्ट साधारणतः सर्वांच्याच ओळखीचे असेल तसेच हे आधीक प्रिय समजले जाते.

Cricket Commentary संभाषणपर पॉडकास्ट चे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. संभाषणपर पॉडकास्ट मध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर दुसरा व्यक्ती निगेटिव्ह बोलत असतो.

3. इंटरव्हिव पॉडकास्ट ( Interview Podcast ) :

इंटरव्हिव पॉडकास्ट ( Interview Podcast ) Podcast Meaning in Marathi

इंटरव्हिव पॉडकास्ट आणि संभाषणपर पॉडकास्ट हे दोन्ही सारखेच आहे केवळ यामध्ये एकच फरक आहे. इंटरव्हिव पॉडकास्ट मध्ये तुम्ही एका व्यक्तीचा interview घेत असतात.

थोडक्यात सांगायचे म्हणजे या मध्ये एक होस्ट आणि त्यांची प्रश्नावली असते.

पॉडकास्ट चे फायदे | Benefits of Podcast in Marathi :

पॉडकास्ट ज्या माध्यमातून आपण हवे ते साहित्य Audible स्वरूपामध्ये ऐकू शकतो.

Podcast मुळे वेळेची बचत होते म्हणजेच, ब्लॉग वाचन करण्यासाठी अथवा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि आजकाल सर्वांकडे वेळेचा अभाव आहे. त्यामुळे माहिती साठी पॉडकास्ट माध्यमाचा प्रभावीपणे वापर केला जातो. जसे काम करत असताना गाणी ऐकली जातात तसेच पॉडकास्ट देखील ऐकू शकतो. डोळ्यांचा वापर न करता फक्त कानांनी ऐकून माहिती घेतली जाते. व्हिडीओ आणि लेख यांच्या तुलनेत पॉडकास्ट साठी कमी वेळ द्यावा लागतो.

पॉडकास्ट्स हे on demand असतात, जेणेकरून आपणाला हवे असलेले पॉडकास्ट कधीही, कुठेही ऐकण्याची परवानगी आपणाला मिळते. आपण कोणत्याही Podcast channel किंवा Podcast Account चे Subscription घेऊ शकतो आणि त्या चॅनेलवर येणारे पॉडकास्ट्स ऐकू शकतो.

Podcast हा तुमचा इन्कम सोर्स देखील बनवू शकतो. Podcast च्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो.

आजकाल अनेक क्षेत्रांतील अनेक विषयांवर आधारित पॉडकास्ट अस्तित्वात येत आहेत, जसे की technology, education, business, news, sports इत्यादी क्षेत्रांतील पॉडकास्ट आपण ऐकू शकतो.

पॉडकास्ट चे नुकसान | Disadvantages of Podcast in Marathi

तसे पहायला गेले असता पॉडकास्ट चे जास्त काही नुकसान नाही. आपण जर योग्य प्रकारे Podcast केले असता आपल्याला केवड्याचे फायद्याचे जाणवतील.

परंतु योग्यरीत्या Podcast केव्हा ऑडिओ रेकॉर्ड केला नसेल तर आपला वेळ खर्ची होईल याशिवाय जास्त वेळ मोबाईल, laptop यांसारख्या त्यांचा वापर केल्यास आपल्याला शारीरिक इजा होईल.

FAQ

Podcast बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न :

#1. Podcast काय आहे? आणि Podcast म्हणजे काय?

ज्याप्रमाणे ब्लॉगच्या माध्यमातून हा कंटेंट रायटिंग करून माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते त्याप्रमाणे ऑडिओ रेकॉर्ड करून तो ऑडिओ Podcast मध्ये सामायिक करून ध्वनी च्या स्वरूपात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

#2. Podcast चे प्रकार

Podcast चे साधारणता तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-
1. व्यक्तिगत किंवा वैयक्तिक पॉडकास्ट Personal Podcast
2. संभाषणपर पॉडकास्ट Conversation Podcast
3. इंटरव्हिव पॉडकास्ट Interview Podcast

#3. Podcast कसे सुरु करायचे?

Podcast करण्यासाठी आपल्याला केवळ जलद इंटरनेट आणि मोबाईल किंवा Laptop संगणक अशा साधनांची गरज भासते. Podcast साठी आपल्याला मोबाईल मध्ये ऑडिओ रेकॉर्ड करायचा ऑडिओ रेकॉर्ड करताना तो ऑडिओ चांगला आणि स्पष्ट ऐकायला यावा याची काळजी घ्यावी. तसेच ऑडिओ तयार करत असताना आपण Background Music देखील लावू शकतो. यानंतर तयार झालेला ऑडिओ आपण Podcast मध्ये सामायिक करायचा. अशाप्रकारे आपण Podcast सुरू करू शकता.

तर मित्रांनो ! ” पॉडकास्ट म्हणजे काय? आणि Podcast चे फायदे । Podcast Meaning in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!!

Leave a Comment