Rashi Bhavishya In Marathi | राशिभविष्य मराठी मध्ये

Rashi bhavishya in Marathi | राशिभविष्य मराठी मध्ये

Rashi Bhavishya In Marathi ज्योतिष शास्त्राचे बारा राशी सांगण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक राशीचे नाव वेग वेगळे आहे तसेच प्रत्येक राशीचा उद्देश देखील वेगळा आहे व्यक्तीच्या पहिले नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याची रास ठरवली जाते आणि राशि वरून त्याचे भविष्य ठेवले जाते.

त्यालाच आपण राशी भविष्य असे म्हणतो. राशिभविष्य हे रोजच्या रोज बदलत असते असे म्हणतात परंतु राशी मध्ये असलेला स्वभाव आणि गुणधर्म हे कायमस्वरूपी असतात.

आजच्या लेखामध्ये आपण मराठी राशिभविष्य  बारा राशी आणि त्यांची भविष्य म्हणजे राशिभविष्य मराठी  मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, Rashi bhavishya in Marathi | राशिभविष्य मराठी मध्ये

Rashi bhavishya in Marathi | राशिभविष्य मराठी मध्ये

रास किंवा राशी म्हणजे काय?

सूर्य ठराविक काळामध्ये एक तारकासमूह मधून दुसऱ्या तारखा समूहांमध्ये जात असतो. सूर्या ची बदलणारी दिशा किंवा मार्गाला क्रांती वृत्ती असे म्हटले जाते. सूर्य या मार्गाने जात असताना प्रत्येकी तीस अंशावर फिरत असताना सूर्याची समान 12 भाग केले जातात. या प्रत्येक भागामध्ये सव्वादोन नक्षत्रे येतात. आणि ही दोन नक्षत्र मिळून जो तारका समूह तयार होतो त्याला राशी असे म्हणतात. आणि या राशी वरून जे भविष्य ठरवले जाते, त्याला राशिभविष्य असे म्हणतात. प्रत्येक राशीला विशिष्ट असे चिन्ह दिलेले असते.

यावरून आपल्याला कळालेच असलं की, बारा राशी असतात व त्या राशींची नावे पुढील प्रमाणे;

1. मेष

2. वृषभ

3. मिथुन

4.कर्क

5. सिंह

6. कन्या

7. तूळ

8. वृश्चिक

9. धनु

10. मकर

11. कुंभ

12. मीन

रास/ राशी कशी ठरविली जाते?

रास किंवा रासी ही व्यक्तीच्या जन्म नावावरून चालू नावावरून किंवा त्या व्यक्तीच्या जन्मवेळेनुसार ठरविली जाते. मुख्यता रास ही व्यक्तीच्या चालू नावाच्या पहिल्या अक्षरावरून किंवा जन्म नावाच्या पहिल्या अक्षरावरून ठरविले जाते.

पुढे आम्ही रास आणि त्या राशी मध्ये येणारे अक्षर दिले आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या अक्षरावरून तुमची रास कोणती आहेत ते पाहू शकता.

चला तर मग पाहूया,

रास/ राशी‌ कशी ठरवली जाते.

1. मेष राशीची अक्षरे – आ, चू, चे, चो, ल, ला, लू, ले, लो इत्यादी अक्षरा पासून जर तुमचे नाव सुरू होत असेल तर तुमची राशी नक्कीच मेष राशी असेल.

2. वृषभ राशीची अक्षरे – ई, उ, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमचे राशी नक्की वृषभ राशी आहे.

3. मिथुन राशीची अक्षरे – का, की, कू,के, को, घ, ड, छ, ह इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच मिथुन राशी आहे.

4. कर्क राशीची अक्षरे –  ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो इत्यादी अक्षरापासून जर तुमचा नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच कर्क राशी आहे.

5. सिंह राशीची अक्षरे – ट, टा, टी, टू, टे, मा, मी, मू, मे, मो इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच सिंह राशी आहे.

6. कन्या राशीची अक्षरे – ट, ढो, ण, पा, पी, पू, पे, पो, ष इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच कन्या राशी आहे.

7. तुळ राशीची अक्षरे – त, ता, ती, तू, रा रि, रू, रे, रो इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच तुळ राशी आहे.

8. वृश्चिक राशीची अक्षरे – तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच वृश्चिक राशी आहे.

9. धनु राशीचे अक्षरे – ढा, धा, फा, भा, भे, मी, ये, यो इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच धनु राशी आहे.

10. मकर राशीची अक्षरे – खी, खो, खू, खे, गा, गी, जा, जी, भो इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच मकर राशी आहे.

11. कुंभ राशीची अक्षरे – गू, गे, गो,दा, सा, सी,सू, से,सो इत्यादी अक्षरापासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच कुंभ राशी आहे.

12. मीन राशीची अक्षरे – दी, दू, थ, झ, त्र, दे, दो, चा, ची इत्यादी अक्षरांपासून जर तुमच्या नावाची सुरुवात होत असेल तर तुमची राशी नक्कीच मीन राशी आहे.

राशीनुसार आपले भविष्य :

आपण नेहमीच विचार करत असतो की आपण जसे वागतो आपला स्वभाव हा जसा आहे ते कोणी निश्चित करत असते. काही लोकांचा स्वभाव अतिशय चतुर असतात तर काही लोक स्वभावाने अतिशय शांत असतात. काही जणांना एकटेपणा खूप आवडतो तर काही जणांना खूप लोकांच्या सानिध्य मध्ये राहायला आवडते.

पिंकी व्यक्तीचा जन्म कुंडली मध्ये 12 भाव असतात आणि त्यानुसार त्या व्यक्तीचे भविष्य ठरवले जाते म्हणून राशिभविष्य मला खूप महत्त्व दिले झाले लग्न कार्यामध्ये तर आपण पाहतोच की राशि भविष्य पाहिल्या सभा कुठलेही कार्य केले जात नाही किंवा मुलगा आणि मुलगी यांच्यातील राशिभविष्य पाहूनच त्यांचे संबंध जोडले जातात.

पुढे राशिभविष्य दिलेले आहेत चला तर मग पाहूया, राशी भविष्य वरून तुमचा राशीचे भविष्य काय आहे ते-

1. मेष राशीचे भविष्य :

मेष राशीचे व्यक्ती हे खूप कष्टाळू आणि परिश्रमी असतात. परंतु या लोकांमध्ये धैर्याचे कमतरता भासते त्यामुळे कुठलेही कार्य करत असताना या राशींच्या व्यक्तींमध्ये संयम आढळून येत नाही त्यामुळे त्यांचे कार्य ते अर्धवट सोडतात.

2. वृषभ राशीचे भविष्य :

वृषभ राशीचे चिन्ह बैल असते. वृषभ राशीचे व्यक्ती कठीम कार्यदेखील अतिशय सहजपणे पूर्ण करण्याचे धाडस ठेवतात. वृषभ राशीच्या व्यक्तींची उंची थोडेसी कमी असते परंतु हे व्यक्ती दिसायला अतिशय आकर्षक असतात.

3. मिथुन राशीचे भविष्य :

मिथुन राशीच्या चीन्हा मध्ये स्त्री आणि पुरुष दोघांची प्रतिमा पाहायला मिळतात. मिथुन राशीचे व्यक्ती बहुमुखी प्रतिभावान असतात. इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास न ठेवता मिथुन राशीच्या व्यक्ती तत्त्वावर विश्वास ठेवतात.

4. कर्क राशीचे भविष्य :

कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा गुंतागुंतीचा असतो एखाद्या परिस्थितीवर निर्णय घ्यायचा म्हटलं की हे व्यक्ती खूप विचारात पडतात. कर्क राशीची व्यक्ती आपले काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. सतत काहीतरी कार्य करणे असा कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव असतो.

5. सिंह राशीचे भविष्य :

सिंह राशीचे चिन्ह सिंहच आहे. ज्याप्रमाणे स्नेहाचा स्वभाव शक्तिशाली असतो आणि सिंह राजाप्रमाणे बापू त्याप्रमाणेच सिंह राशीची व्यक्ती देखील राजाप्रमाणे जगणे पसंत करतात. सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव निडर असतो.

6. कन्या राशीचे भविष्य :

कन्या राशीच्या चिन्हांमध्ये स्त्रीची प्रतिमा पाहायला मिळते. कन्या राशीच्या व्यक्तीचा स्वभावा खूप शांत असतो. या राशीचे लोक खूप भोळे शांत आणि जमिनीशी जुळलेले असतात. कन्या राशीचे लोक आपल्या कामाच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात या लोकांची काम करण्याची गतीही अतिशय मंद असते.

7. तूळ राशीचे भविष्य :

तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. तुळ रास असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव खूप गंभीर असतो. हे व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये सर्वांसोबत समान भावाने वागतात आणि व्यवहार देखील करतात.

9. वृश्चिक राशीचे भविष्य :

वृश्चिक राशीचे व्यक्ती हे आपल्या मनातील भावना कोणासोबत ही शेअर करत नाही. हे व्यक्ती नेहमी योग्य संधीची वाट पाहत असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव मध्ये थोडासा कडूपणा आढळतो. या राशीच्या व्यक्तीच्या स्वभावात उग्रता असल्याने त्यांची नेतृत्व शक्ती देखील चांगले असते.

10. धनु राशीचे भविष्य :

धनु राशि असणारे व्यक्ती एखाद्या कार्याला आपले देह मानून ते कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. धनु राशीच्या व्यक्तींना आपला वेळ वाया घालवणे अजिबात आवडत नाही. धनु राशीची व्यक्ती अतिशय श्रेष्ठ आणि धनी मांनले जातात. परंतु कधी कधी धनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव यामध्ये अहंकार पाहायला मिळतो.

11. मकर राशीचे भविष्य :

मकर राशीच्या चिन्हा मध्ये आपल्याला मगरीची प्रतिमा पाहायला मिळते. मकर राशीचे व्यक्ती खूप मेहनती आणि कष्टाळू असतात. इतर व्यक्ती कडे लक्ष देण्यापेक्षा हे व्यक्ती स्वतःच्या हितासाठी प्रयत्न करीत असतात. जीवनात येणाऱ्या संकटांना पाहून न घाबरता हे व्यक्ती लढण्यासाठी सक्षम असतात.

12. मीन राशीचे भविष्य :

मीन राशीच्या चीन्हा मध्ये दोन माशाचे जोडी आहेत. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव देखील माशाप्रमाणे चंचल असतो. हे लोक नेहमी स्वतंत्र राहण्यासाठी प्रयत्न करीत असतात. या व्यक्तींच्या बोलण्यात गोडी आणि स्वभावामध्ये गंभीरता पाहायला मिळते.

तर मित्रांनो ! ” Rashi bhavishya in Marathi | राशिभविष्य मराठी मध्ये “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment