संत सखुबाई यांची संपूर्ण माहिती । Sant Sakhubai Information in Marathi

Sant Sakhubai Information in Marathi महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रामध्ये आणि परम संत होऊन गेले. संत सखुबाई महाराष्ट्रातील प्रचलित संसतां पैकी एक होत्या. त्यांच्या तोंडामध्ये सतत श्री विठ्ठलाचे नाव होते.

संत सखुबाई यांची संपूर्ण माहिती । Sant Sakhubai Information in Marathi

विठ्ठलाचे नाव घेते त्यांच्या शारीरिक सामर्थ्य पेक्षा अधिक काम करत. वैवाहिक जीवनामध्ये अतिशय परिश्रम करून आणि त्यांच्यावर झालेल्या सर्व अत्याचारांचा सामना करत संत सखुबाई विठ्ठलाच्या परमभक्त झाल्या. त्यांची भक्ती पाहून प्रत्यक्षात विठ्ठल देखील त्यांच्या पर्यंत धावत आले.

संत सखुबाई यांचा जन्म :

संत सखुबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. संत सखुबाई यांचे वडील आणि आई दोघेही धार्मिक स्वभावाचे होते आणि त्यांचा हाच सहभाग सखुबाई यांच्यामध्ये दिसत होता. संत सखुबाई या लहानपणापासूनच विठ्ठलाच्या परम भक्त होत्या. लहानपणापासूनच संत सखुबाई यांना विठ्ठलाची परम भक्ती प्राप्त झाली होती. त्यांचे संपूर्ण बालपण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये गेले.

विवाहाच्या योग्य झाल्यानंतर संत सखुबाई यांचा विवाह कृष्णा नदीच्या काठावरील कऱ्हाड नावाच्या गावांमधील एका ब्राह्मण कुटुंबातील मुलाशी झाला. विवाह झाल्यानंतरही संत सखुबाई यांनी त्यांचा संपूर्ण वेळ श्री विठ्ठल भक्तीमध्ये घालवला ते कोणतेही काम करीत असताना सुद्धा त्यांच्या मुखामध्ये श्री विठ्ठलाचे नाव असायचे.

संत सखुबाई यांचे वैवाहिक जीवन :

संत सखुबाई या दिवसभर काम करीत होत्या. त्यांच्या शारीरिक सामर्थ्य पेक्षा देखील अधिक काम करत. ते दिवसभराचे कित्येक काम करत असताना त्यांच्या मुखामध्ये सतत श्री विठ्ठलाचे नाव होते. त्यांच्या कामातून देखील विठ्ठल भक्ती दाखवत होत्या. परंतु विवाह एका जीवनामध्ये त्यांना त्यांच्या सासरच्या माणसाकडून त्यांच्यावर अत्याचार झाला.

दिवसभर काम करून सुद्धा संत सखुबाई यांना त्यांच्या सासूचा अत्याचाराची लाथ खावी लागत असे. संत सखुबाई यांना त्यांचे दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांच्याजवळ कोणीही नव्हते. त्यांच्या सासूकडून त्यांच्या वर झालेला अत्याचारांना त्यांनी कधीही प्रत्युत्तर दिले नाही. संत सखुबाई यांचा स्वभाव निर्मळ असल्याने त्या एका क्षणामध्ये सर्व अत्याचार विसरून जात आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या दुःखाला त्यांनी देवाचा आशीर्वाद म्हणून स्वीकार केले.

Sant Sakhubai Information in Marathi

संत सखुबाई देवाला कृतज्ञता व्यक्त करत की, त्यांना असे कुटुंब दिले ज्या मुळे त्यांना सतत देवाची आठवण आणि देवाची भक्ती करायला मिळाली. अन्यथा मी सुखात राहून देवाला विसरले असते संसाराच्या ब्रह्मामध्ये पडले असते. परंतु देवाला माझ्यावर विशेष कृपा आहे ज्यामुळे देवाने मला अशा प्रकारचे कुटुंब दिले मध्ये दुःखामध्ये असले तरी माझ्या ओठांवर फक्त विठ्ठलाची नाव असते.

एक दिवशी संत सखुबाई यांच्या शेजारीने सखू वर होणारे अत्याचार आणि त्यांची प्रकृती पाहून विचारले ” तुझ्या डोळ्यात असे कोणी नाही का? जो तुझ्या सुखाचा समाचार घेईल” त्यावर संत सखुबाई म्हणाल्या “माझे माहेर पंढरपुर आणि विठ्ठल व रुक्मिणी माझे आई-वडील, एक दिवस त्यांनी मला त्यांच्याजवळ बोलशील व माझ्या सुखाचा सामाचार सुद्धा घेतील.”

विठ्ठलाचे दर्शन :

एक दिवशी संत सखुबाई वैवाहिक जीवनाला कंटाळून आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून श्री विठ्ठल देवाच्या मूर्तीजवळ रडत बसल्या. आणि विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणाल्या, तुम्हाला ठाऊक आहे ना, जो कोणी खरा मनाने आणि निस्वार्थीपणा ने देवाला हाक मारतो देव त्याचे हा ऐकतो. आणि संत सखुबाई यांच्यासोबत तेकी तसेच घडले.

संत सखुबाई यांच्या सासूने त्यांच्या घरातील सर्व विठ्ठलाच्या मुर्त्या घराबाहेर नेऊन फेकल्या. परंतु विठ्ठलाच्या कृपेने या मुर्त्या पुन्हा घरामध्ये त्याच जागी स्थापन झाल्या.

संत सखुबाई यांची पंढरपूरला भेट देण्याची इच्छा :

एक दिवशी संत सखुबाई त्यांनी नियमित पणे घरातील सर्व कामे आटोपली आणि पाणी आणण्याकरिता त्या कृष्णा नदीच्या तीरावर पोहोचल्या. तेव्हा तिथे त्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे नामस्मरण करीत असलेल्या भक्तांचा गट दिसला. तो गट पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी निघाला होता त्या सर्व भक्तांना पाहून संत सखुबाई त्यांच्या मनात ही पंढरपूरला आणि श्री विठ्ठला भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तिच्या घरातून पंढरपूरला जाण्यासाठी तिला परवानगी मिळणे अशक्य होते हे तिला माहीत होते त्यामुळे तिने घरच्यांना कोणालाही निरोप न देता त्या गटासोबत पंढरपूरला जाण्यासाठी निघाली.

तेव्हा शेजारच्या एका बाईने संत सखुबाई पंढरपूरला जात आहे ही बातमी तिच्या सासूला सांगितली. तेव्हा सखूबाईच्या नवऱ्याने तिला घरी आणले व दोरीने बांधले. जोपर्यंत पंढरपूरची यात्रा संपत नाही म्हणजेच पुढचे पंधरा दिवस सखूबाईला बांधून ठेवण्याचा आदेश तिच्या सासूने दिला.

परंतु संत सखुबाई हिचे मन परमेश्वराच्या चरणाशी होते. ती रात्रंदिवस विठ्ठलाला प्रार्थना करीत की, “अरे, नाथा मला डोळे भरून तुला पाहण्याची इच्छा आहे, तुझे चरण स्पर्श करण्याची इच्छा आहे, तुला एकदा डोळे भरून पाहिले तर माझे जीवन सफल होईल.”

सखुबाईची ही हाक परमेश्वराने वैकुंठा मध्ये ऐकली. व साक्षात परमेश्वर आणि एका स्त्रीचे रूप धारण करून तिच्याजवळ आली आणि व म्हणाली, “बाई, मी पंढरपूरला जात आहे. तुम्ही पण माझ्यासोबत येणार का?” यावर सखुबाई म्हणाली, ” बाई, मला पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा आहे परंतु मला येथे बांधलेले आहे मी कशी जाऊ?” हे ऐकून ती स्त्री म्हणाली, ” बाई , मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुम्ही दुःखी होऊ नका.” हे भोजन साक्षात परमेश्वराने स्त्री रूप धारण केलेले त्या स्त्रीने संत सखुबाई हिला बांधलेला दोरा सोडला. आणि सखुबाई पंढरपूरला जाण्यासाठी निघाल्या.

  सखूबाईच्या बांधलेल्या जागी साक्षात विठ्ठल आणि सखुबाईचे रूप घेतले आणि तिथे बांधून घेतले. परंतु सखूबाईच्या सासू आणि सासरे यांना याबद्दल काही कल्पना नव्हती. त्यांनी साक्षात पांडुरंगाला बांधून ठेवले होते आणि पांडुरंगाच्या हातून घरातील कामे सुद्धा करून घेतली. सखू च्या रूपाने  देवाने सखूच्या सासूसासऱ्याचे हृदय परिवर्तन केले.

Sant Sakhubai Information in Marathi

 देव विठ्ठल सखूचा रूपाने तिचा घरामध्ये काम करत होता आणि संत सखुबाई या पंढरपूर मध्ये पोहोचल्या त्यांनी देवांचे दर्शन घेतले आणि विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या चरणापाशी आपले प्राण त्यागले.

 रुक्मिणीने पाहिले की, आपले पती विठ्ठल हे  सखूच्या  रूपामध्ये  काम करतात आणि  सखु ने पंढरपूर मध्ये आपल्या चरणापाशी स्वतःचे प्राण त्यागले आहे. पंढरपूर मधल्या काह संतांनी  सखूला ओळखून तिचा अंतिम संस्कार सुद्धा केला. परंतु देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद सतत संत सखुबाई यांच्या पाठीशी असल्याने सखुबाई पुन्हा जिवंत झाल्या. आणि दोन दिवसांनी संत सखु आपल्या घरी परत आले. घरी आल्यानंतर संत सखुबाई यांना साक्षात विठ्ठलाचे आणि रुक्मिणी चे दर्शन झाले. तिच्या घरात मध्ये तिच्या रूपामध्ये साक्षात पांडुरंग राहिले होते व तिच्या घरातील सर्व सदस्यांचे  हृदय परिवर्तन झाले होते हे पाहून संत सखुबाई आश्चर्यचकित झाल्या.

त्यानंतर संत सखुबाई यांच्या सोबत त्यांच्या घरातील सर्व सदस्य सुद्धा विठ्ठल भक्तीचा रंगा मध्ये मग्न झाले.

 तर मित्रांनो ! ” संत सखुबाई यांची संपूर्ण माहिती । Sant Sakhubai Information in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Comment