Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये

मित्रांनो आपण सर्वाना तर माहितीच आहे कि हिंदू धर्मामध्ये देव-देवतांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्यापूर्वी हिंदू संस्कृतीमध्ये सर्व प्रथम देव-देवतांच्या स्मरण केले जाते. हिंदू संस्कृती मध्ये वेगवेगळे देव पाहायला मिळतात व त्यांची वैशिष्ट्ये आणि ते देवांचे विशिष्ट महत्व देखील पाहायला मिळते.

त्यामुळे आपण सर्वांना शनिदेव माहितीच आहे. शनिदेवाची पूजा आणि स्मरण हे शनिवारी करणे शुभ मानले जाते त्यामुळे दर शनिवारी सर्वजण शनी देवता ची भक्ती आणि स्मरण करतात.

Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये

शनि देवाला न्यायाचे आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते.आपण ज्या प्रमाणे कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला न्याय देण्याचे काम हे शनिदेव करत असतात. म्हणून शनिदेवांना नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते.

आजच्या लेखामध्ये Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये घेऊन आलो या मंत्राचा ज्यात तुम्ही नित्यनेमाने केल्यास तुमच्यावर देखील शनि देवाची कृपा होईल.

शनि देवाचे महत्त्व :

भगवान शनिदेव यांना न्यायाचे आणि कर्माचे देवता म्हणून ओळखले जाते आणि देवता बद्दल ग्रंथांमध्ये अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

असे म्हणतात की शनीदेवाची कृपादृष्टी ही भूलोकातील सर्व‌ प्राणीमात्रांवर तसेच देवी देवतांवर देखील असते. आपल्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट घटना घडत असतात त्यांच्या मागे शनि देवाची कृपा दृष्टी असते असे मानले जाते.

म्हणून दर शनिवारी शनी भक्त किंवा भावीक शनि मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला रुईची फुले, रुईचे तेल केव्हा उडीद अर्पण करत असतात व शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

तसेच आपण आपल्या जीवनामध्ये काही वाईट कर्म केले असतील व आपल्याला प्रायश्चित्त करायचा असेल तरीदेखील आपण शनिदेवाची महिमा किंवा शनिदेवाला प्रसन्न करून आपण क्षमा मागू शकतो.

या व्यतिरिक्त आपल्यावर असणारे ग्रहांचे वाईट दशा टाळण्यासाठी आपण शनिवारी गरिब लोकांना अन्नदान केले जाते. विशेषता शनि महिम्या मध्ये आणि शनिदेवांना दानधर्म फार आवडते असे मानले जाते व दानधर्म केल्याने शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात असे मानले जाते.

तसेच शनि देवतांना प्रसन्न करण्यासाठी एक शनि मंत्र आहे याचे जप आपण रोजच्या जीवनामध्ये केले आपल्या वर शनि देवाची कृपा दृष्टी पडते. आजच्या लेखामध्ये आम्ही “Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये” घेऊन आलोत.

Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये

– “ॐ शं शनैश्चराय नमः”

– “ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः”

– “ॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये। सय्योंरभीस्रवन्तुनः।।

हा शनि देवत्तांचा मंत्र आहे दर शनिवारी या मंत्राचा जप केला किंवा आराधना केल्यास शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर पडते. आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात.

शनि देवतांची कथा :

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांच्या जन्माची एक कथा प्रचलित आहे त्याप्रमाणे शनिदेव त्यांची देखील कथा प्रचलित आहे ते पुढील प्रमाणे;

शनिदेव यांच्या कृष्णवर्णीय रंगाबद्दल एक कथा प्रचलित आहे. जेव्हा शनिदेव त्यांची आई छाया यांच्या गर्भा मध्ये होत्या तेव्हा त्यांच्या आई छाया यां भगवान शिव शंकराच्या भक्तीमध्ये इतक्या विलीन झाल्या की त्यांना अन्न पाण्याचे देखील भान राहिले नाही.

याचा परिणाम त्यांच्या गर्भात असलेल्या बाळावर म्हणजेच शनी देवा वर झाला. आणि हेच कारण आहे की शनिदेव यांचा रंग कृष्ण वर्णिय आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की सूर्य देव त्यांचे पुत्र शनिदेव आहेत. शनिदेवाचे बाल रूप आणि कृष्णा वर्गीय रूप पाहून सूर्यदेवाने शनिदेवांना आपली मानण्या पासून नाकार दिला. यामुळेच शनिदेव हे आपले पिता सूर्य देवांचा तिरस्कार करतात.

सूर्यदेवाने आपली आई छाया यांचा केलेला अपमान शनिदेवांना सहन झाला नाही. तेव्हा शनिदेवांनी भगवान शिव शंकराचे कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या तपश्चर्या ला फळ आले भगवान शिवशंकर शनिदेवांनवर प्रसन्न झाले.

तेव्हा भगवान शिवशंकरांनी शनिदेवाला वर मागायला सांगितले ,त्यावर शनी देव म्हणाले की, “माझी आईला सतत अपमानित सहन करावा लागला तसेच माझ्या पिता कडून देखील माझ्या आईचा अपमान झाला.”

त्यामुळे एक पुत्र म्हणून माझी आई छाया यांची इच्छा आहे की, मी सूर्य देवापेक्षा बलवान होऊन यांच्या अपमानाचा बदला घेवू शकतो. त्यावर भगवान शिवशंकरांनी शनिदेवांना आशीर्वाद दिला.

सर्व नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ मानून शनिदेवाची पूजा केली जाईल. याशिवाय भूलोका तील सर्व प्राणीमात्रांवर आणि देवी देवता देखील शनी देव त्यांच्या अधीन राहतील.

म्हणूनच शनिदेव कृपा दृष्टी ही भूमिका महत्वाची ठरली जाते. भूलोकातील सर्वजण आणि देवी देवता देखील शनी देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. शनिदेवाचे कृपादृष्टी आपल्यावर लाभल्यास आपल्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात आणि शनिदेवाची कुदृष्टी आपल्या जीवनात लागल्यास आपल्या जीवनाचा नाश होतो.

त्यामुळे शनी देवतांना प्रसन्न करण्यासाठी Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये‌ शनि मंत्राचा जप करावा.

तर मित्रांनो, ” Shani Mantra in Marathi | शनि मंत्र मराठी मध्ये “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment