Sudarshan Kriya in Marathi | सुदर्शन क्रिया म्हणजे काय? सूदर्शन बद्दल संपूर्ण माहिती

प्रत्येक व्यक्ती जन्माला येतात सर्वप्रथम श्वास घ्यायला शिकतो. श्वास ही अशी प्रक्रिया आहे ज्याला कोणालाही शिकवायला लागत नाही ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रकृतीने आपोआप प्रत्येका मध्ये दिलेली ही एक क्रिया आहे.

Sudarshan Kriya in Marathi | सुदर्शन क्रिया म्हणजे काय? सूदर्शन बद्दल संपूर्ण माहिती

म्हणूनच श्वास घेण्याच्या कृतीने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला सुरुवात होते. आपल्याला माहीत नसलेली अनेक गुपिते श्वासामध्ये दडलेली आहेत. सुदर्शन क्रिया हे दुसरे काय नसून श्वासोच्छाद करण्याचे एक तंत्र आहे.

आजच्या लेखामध्ये आहे सुदर्शन क्रिया म्हणजे काय? What is Sudarshan kriya हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की हा लेख वाचून आपल्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

चला तर मग पाहूया, Sudarshan kriya in Marathi | सुदर्शन क्रिया म्हणजे काय? सुदर्शन क्रिया मराठी माहिती

सुदर्शन क्रिया म्हणजे काय? What is Sudarshan kriya in Marathi

सुदर्शन क्रिया हे एक श्वास उच्छाद करण्याचे तंत्र आहे.सुदर्शन क्रिया करून शरीर, मन आणि भावभावना यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो.

सुदर्शन क्रिया मुळे आपला मानसिक ताण-तणाव कमी होतो त्यासोबत राग वैराग्य वैफल्य, नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावना नष्ट होण्यात देखील मदत होते. पण जर नियमित अशा जीवनामध्ये सुदर्शन क्रिया केल्या तर आपले मन शांत आणि एकाग्र होते. शरीरात चैतन्य निर्माण होते आणि शारीरिक स्तरावर विश्रांती मिळते.

सुदर्शन क्रिया मुळे जीवनातील काही गुपित रहस्य उलगडले गेल्यामुळे आयुष्याला सखोलता येते.

सुदर्शन क्रियांमुळे आरोग्य आनंद, शांती आणि अंतर्ज्ञान यांची गूढता अनुभवयाला मिळते.

Sudarshan Kriya in Marathi

श्वासाद्वारे आपल्याला उत्तम आरोग्य मिळू शकते आणि त्यासाठी सुदर्शन केली आहे खूप फायद्याची ठरते. जीवनाला अत्यंत उपयुक्त असलेली प्राण शक्ती मिळवण्याचा श्वसन हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला प्राणशक्तीची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. शरीरात प्राणशक्ती ची पातळी भरपूर प्रमाणात असेल तर तुमचे आरोग्य उत्साही आणि स्वास्थ्यपूर्ण असते.

सुदर्शनक्रिया मुळे आपल्या शरीरामधील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात. त्या मुळे आपल्या शरीरातील प्राणशक्तीची पातळी वाढते. तसेच नियमितपणे सुदर्शन क्रिया केल्यास आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. प्रकरणाची शिक्षक तिवारी शरीरातील ऊर्जा दिवसभर संचारते. सुदर्शन क्रियांमुळे दीर्घायुष्य लाभते, आनंदी आणि स्वास्थ आरोग्य देखील मिळते.

सुदर्शन क्रिया मानवी आनंदासाठी खूप उपयोगाची पडते. संताप चिडचिड नैराश्‍य उदासीनता यांसारख्या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सुदर्शनक्रिया महत्त्वाची भूमिका बजावते. नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुदर्शन क्रिया उपयोगाची ठरते.

सुदर्शन क्रिया ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे त्याला जीवन शास्त्रीय लयबद्धता देखील म्हटले जाते. सुदर्शन क्रिया यामुळे शारीरिक आणि मानसिक समन्वय साधला जातो. आपण नैसर्गिक लयीशी एकरूप होतो. सुदर्शन क्रिया ला आर्ट ऑफ लिव्हिंग चा भाग समजला जातो. दर्शनी क्रियांमुळे आपले शारीरिक, भावनिक, सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते.

सुदर्शन क्रिया कशी केली जाते? Sudarshan Kriya Steps in Marathi

सुदर्शन क्रिया मुख्यता चार प्रकारांच्या अंतर्गत केली जाते ते पुढील प्रमाणे;

उज्जयी प्राणायाम :

सुदर्शनी क्रिया करण्यापूर्वी वज्रासन स्थितीमध्ये बसावे. सुरुवातीला श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याचा वेळ समान ठेवावा. नाका मार्फत श्वास घेऊन आपले संपूर्ण लक्ष हे श्वासाकडे केंद्रित करावे. श्वास सोडत असताना देखील आपले लक्ष श्वासाकडे असावे हे एका मिनिटांमध्ये कमीत कमी तीन ते चार वेळा श्वास घ्यावा आणि सोडावा.

भस्त्रिका प्राणायाम :

सुदर्शन क्रिया च्या या प्रकारांमध्ये श्वास घेण्याचे आणि सोडण्याची प्रक्रिया खूप वेगात केली जाते‌. एक मिनिटांमध्ये तीस वेळा श्वास घ्यावा आणि सोडावा. जे व्यक्ती भास्त्रिका प्राणायाम नियमितपणे करतात त्यांचे मन शांत शांत होते. तसेच त्या व्यक्तीच्या मनातील चिंता ताणतणाव नकारात्मक विचार आणि डिप्रेशन देखील कमी होते.

ओम जप :

ओम चा जप करणे हे खूपच पवित्र मानले जाते. सकाळच्या वेळी ओम चा जप केल्यास शरीरात नकारात्मक शक्ती कमी होऊन सकारात्मक विचार वाढतात. सकाळच्या वेळेस ओम जप करणे खूप फायद्याचे ठरते.

क्रिया योग :

क्रियायोग हा सुदर्शन क्रिया चा शेवटचा भाग आहे. या क्रिया मध्ये सुरवातीला हळूहळू श्वास घेत सोडावा, त्यानंतर वेगात श्वास घेऊन सोडावा. हाळूहाळू श्वास घ्यायचा आणि जोरात सासू सोडायचा याचे पूर्ण चक्र असते. परंतु यामध्ये श्वास मध्ये घ्यायची वेळी श्वास बाहेर सोडण्याच्या वेळे पेक्षा दुप्पट असायला हवी.

अशाप्रकारे वरील चार प्रकारांमध्ये सुदर्शन क्रिया पूर्ण केली जाते. सुदर्शन क्रिया चे फायदे Benefits of Sudarshan Kriya in Marathi सुदर्शन क्रिया मुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे लाभ होतात.

सुदर्शन क्रिया चे फायदे Sudarshan Kriya Benefits in Marathi :

१. सुदर्शन क्रिया चे शारीरिक लाभ :

 1. जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी सुदर्शनक्रिया महत्त्वाची ठरते.
 2. आरोग्य सुधारून चांगले जीवन प्राप्त होते.
 3. उर्जेचा स्तर वाढतो.
 4. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
 5. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.

२. सुदर्शन क्रिया चे मानसिक फायदे :

 1. मनाची स्पष्टता वाढते.
 2. बौद्धिक कार्य सुधारतात.
 3. सृजनशीलता वाढते.
 4. गाढ निद्रा प्राप्त होण्यास मदत होते.
 5. वाह आत्मक परिस्थिती ना हाताळण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

३. सुदर्शन क्रिया चे सामाजिक फायदे :

 1. वैयक्तिक तसेच सामाजिक किंवा कामाच्या ठिकाणी आनंद आणि एकोपा प्राप्त होण्यास मदत होते.
 2. सामाजिक जाणीव अप्राप्त होते.
 3. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवण्यास मदत होते.
 4. व्यक्तिगत तसेच सामाजिक सजगता वाढते.

४. सुदर्शन क्रिया चे अध्यात्मिक फायदे :

 1. योगभ्यास आणि ध्यान धारणा मध्ये आवड निर्माण होण्यास मदत होते.
 2. आंतरिक शांतीचा अनुभव प्राप्त होतो.

तर मित्रांनो ! ” Sudarshan kriya in Marathi | सुदर्शन क्रिया म्हणजे काय? What is Sudarshan kriya in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!!

1 thought on “Sudarshan Kriya in Marathi | सुदर्शन क्रिया म्हणजे काय? सूदर्शन बद्दल संपूर्ण माहिती”

Leave a Comment