TB म्हणजे काय? क्षयरोगाचे चे कारणे, लक्षणे आणि उपचार । TB information in Marathi

TB information in Marathi आपल्या आजूबाजूला अनेक संसर्गजन्य रोगाने ग्रासलेले रुग्ण आपण पाहत असतो. संसर्गजन्य रोग म्हणजेच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा रोग होय. टीबी म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये क्षयरोग असे म्हणतो. TB हा देखील एक संसर्गजन्य रोग आहे.

पूर्वीच्या काळामध्ये क्षयरोग ला महारोग समजले जात होते. परंतु अलीकडेच वाढती वैद्यकीय सेवा आरोग्याबाबत अनेक रोगांवर निदान करण्याच्या अनेक प्रक्रिया उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ज्या लोकांना क्षयरोग किंवा टीबी असेल अशा लोकांनी न घाबरता यावर योग्य उपचार केल्यास हा आजार फार लवकरच बरा होतो.

आजच्या लेखामध्ये TB म्हणजे काय? आणि TB information in Marathi बघणार आहोत. आम्ही TB हा रोग कसा होतो या रोगाची कारणे, लक्षणे तसेच आरोग्यावर उपचार कसा घ्यावा या बद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आम्हाला आशा आहे की, TB information in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोगाचे चे कारणे, लक्षणे आणि उपचार । TB information in Marathi

आपण जेव्हा घराच्या बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्या आसपास कित्येक व्यक्ती खोकत असतात परंतु ते व्यक्ती खोकय असताना त्यांचा खोकला हा सामान्य आहे किंवा टीबीचा आहे याचा आपण विचार देखील करत नाही. दरवर्षी भारतातून चार लाख लोकांचा मृत्यू केवळ टीबी या आजारामुळे होतो.

क्षयरोग म्हणजे टीबी हा आजार मायकोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस नावाच्या जंतूमुळे होतो हा एक संसर्गजन्य आजार आहे जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कडे संसर्ग होत असतो. क्षयरोगाचे जंतू मुख्यता फुफ्फुसावर घातक ठरतात.

क्षयरोगाचा प्रसार :

क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे म्हणजे या रोगाचा प्रसार खूप झपाट्याने होतो. जेव्हा क्षयरोगाचा रुग्णांना शकतो किंवा खोकतो तेव्हा त्याच्या शरीरातील क्षयरोगाचे जंतू वातावरणात पसरतात. क्षयरोगाचा प्रसार मुख्यतः हवेच्या मार्फत होत असतो. श्वासावाटे क्षयरोगाचे जंतू निरोगी माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात परंतु प्रवेश केलेल्या प्रत्येक माणसांनाच शयरोग होईल असे नव्हे ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे जेवण अशाच व्यक्तींना क्षयरोग होण्याची शक्यता असते.

क्षयरोग असणाऱ्या एक व्यक्ती सुमारे दहा ते पंधरा व्यक्तींना क्षयरोगाचा रोग पसरू शकतो. टीबी हा आजार झपाट्याने वाढण्याचे अनेक कारणे आहेत जसे की गर्दीची ठिकाणे, कमी रोगप्रतिकारशक्‍ती, इतर काही मोठे आजार असणाऱ्या व्यक्तीला क्षयरोग कहा जात लवकर होण्याची शक्यता असते त्यामुळे घराच्या बाहेर निघाल्यास आपण मास्कचा वापर करणे आपल्याला क्षयरोगाचा पासून वाचवण्यासाठी फायद्याचे ठरेल.

तसेच ज्या व्यक्तीला क्षयरोगाचा आजार आहे अशा व्यक्तीने लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. असे केल्यास क्षयरोगाचा प्रसार कमी होईल.

क्षयरोगाचे जीवाणू :

TB रोग हा आजार मुख्यता मायकोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस या जिवाणूंमुळे होतो.

क्षयरोगाचे जीवाणू हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात एक प्रकारचे जिवाणू हे माणसांना क्षयरोग होण्यासाठी कारणीभूत ठरतात दुसरे हे जनावरांमध्ये क्षयरोगाचा संसर्ग करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

माणसांमध्ये TB रोगाचा प्रसार करणाऱ्या जिवाणू हे चार प्रकाराचे आहेत ते पुढीलप्रमाणे-

 • फोटोक्रोमोजेन
 • स्‍कोटोक्रोमोजेन
 • नॅानफोटोक्रोमोजेन
 • रॅपिड ग्रोवर्स

ज्या व्यक्तीला क्षयरोग आहे परंतु त्याने योग्य वैद्यकीय सल्ला न घेतल्याने असा व्यक्ती क्षयरोग जिवाणूंचा स्त्रोत मानला जाते. रोगाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या थुंकीतून, खोकल्यातून हा आजार पसरत असतो. तसेच ज्या जनावरांना या रोगाची लागण आहे अशा जनावरांचे दूध न उकळता पिल्यास हा आजार होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्तीला किंवा जनावरांना क्षयरोगाचा योग्य उपचार मिळत नाही तोपर्यंत तो व्यक्ती किंवा जनावर क्षयरोगाने संक्रमित समजला जातो.

क्षयरोगाचे लक्षणे Symptoms of Tuberculosis in Marathi

जगभरामध्ये बहुतांश लोकांमध्ये मायकोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस चे जिवाणू आढळत असतात. परंतु काही लोकांचे रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने अशा लोकांमध्ये या जिवाणूंचा कसल्याही प्रकारची धोका आढळून येत नाही. Tuberculosis रोग हा एक गुप्त रोग आहे त्यामुळे या रोगाची लक्षणे सहसा दिसून येत नाहीत. हा रोग मुख्यत फुफ्फुसासाठी घातक ठरतो.

केवळ ट्यूबर्क्युलीन त्वचा चाचणी याद्वारे हा रोग सकारात्मक आहे हे कळले जाते.

तरी देखील टीबी मध्ये काही सामान्य लक्षणे आढळतात ते पुढीलप्रमाणे-

 1. तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला असल्यास अशा व्यक्तीने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण हे एक क्षयरोगाचे लक्षण आहे.
 2. कमी-अधिक प्रमाणात सतत येणारी ताप
 3. श्वास घेताना अडचण
 4. अचानक वजन कमी होणे
 5. भूक न लागणे
 6. रात्रीच्या वेळेला घाम येणे
 7. हेमोपॉटीसिस

ग्रंथींचा, हाडांचा, सांध्यांचा, जनन व विसर्जन संस्थेचा, मज्जासंस्थेचा व आतड्यांचा, मूत्रपिंडाचे याचा टीबी होऊ शकतो. या प्रकारचा टीबी होणाऱ्या पेशंटची संख्या तुलनेने कमी आढळते.

या रोगाचा अधिशयन काळ काही आठवडे काही महिने किंवा काही वर्षांचा देखील असू शकतो.

क्षयरोगाचा निदान :

दोन किंवा तीन आठवड्यापेक्षा चिरकाळ असणारा खोकला असणाऱ्या व्यक्तीने थु़की सूक्ष्मदर्शक यंत्रणा खालील तपासून या रोगाचे निदान करावे.

काही रुग्णांमध्ये क्ष-किरण तपासणी, प्रयोगशाळेतील कल्चर तपासणी व इतर तपासणी करून या रोगाचे निदान करता येते.

परंतु इतर सर्व तपासणी पहिली थुंकी तपासणी ही सरळ,सोपी आणि स्वस्त, सर्वत्र उपलब्ध असणारी तपासणी आहे व या तपासणीतून सकारात्मक निकाल देखील मिळतो.

क्षय रोगाचा उपचार Treatment of Tuberculosis in Marathi

क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असला तरीदेखील या रोगावर उपचार करण्यासाठी विविध विविध औषधे बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. तसेच योग्य वैद्यकीय सल्ला घेतल्यास हा आजार लवकर बरा होतो.

क्षयरोगाच्या औषधांना जिवाणू नाशक आणि बॅक्टेरियोस्टेटिक औषधे म्हणून वर्गीकृत केले जाते. तसेच योग्य औषध उपचार, डोस, आणि उपचारांचा कालावधी निवडल्यास हा आजार लवकर बरा होतो.

 1. लेटेन्स्ट इन्फेक्शन :

हे एक औषध आहे, जे सहा महिने घेतात.

 1. सक्रिय पल्मनरी संक्रमण :

सामान्यत:, पॅल्मोनरी टीबीचा उपचार करण्यासाठी एक संयोजन थेरपीचा वापर केला जातो आणि उपचार सहा ते नऊ महिन्यांपर्यंत चालते.

 1. एस्क्ट्रा-पल्मनरी संक्रमण :

हा रोगास तुलनेने तीव्र स्वरुपाचा मानला जातो आणि येथे, 6-9 महिन्यांपर्यंत एकाधिक संयोजनांचा वापर केला जातो, त्यानंतर पुढील तीन महिन्यांत एकाच औषधाचा लहान क्रम केला जातो.

 1. औषध-प्रतिरोधक संक्रमण : 

 क्षयरोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्र्या औषधांमध्ये खालील औषधे समाविष्ट आहेत:

 • रिफाम्पिन
 • आइसोनियाझिड
 • इथाम्बुटोल
 • पायराझिनमाइड

क्षय रोगावर प्रतिबंधक उपाय योजना :

क्षयरोगाचे निदान करण्यासाठी काही प्रतिबंधक उपाय योजना आहेत त्या पुढीलप्रमाणे-

 1. बीसीजी लसीकरण
 2. संशयित क्षयरोग रुग्णाचे लवकरात लवकर निदान करणे
 3. रुग्णांना लवकर वैद्यकीय सल्ला देऊन त्यांचा पूर्ण उपचार करणे
 4. आरोग्य विषयी योग्य शिक्षण देणे. क्षयरोग झालेल्या व्यक्तींसाठी योग्य आहार

क्षयरोग झालेल्या व्यक्तींच्या आहारामध्ये प्रोटिनयुक्त पदार्थं समाविष्ट असणे खूप गरजेचे आहे कारण क्षय रोगामुळे मांस पेशीची भरपूर झिज झालेली असते. त्यामुळे क्षय रोगाने ग्रासलेल्या रुग्णाला अशक्त आणि कमजोरपणा वाटत असतो. त्यामुळे क्षय रोगाच्या रुग्णाच्या आहारामध्ये प्रोटिनयुक्त पदार्थ असणे गरजेचे आहे यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी, डाळी, यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरते.

तर मित्रांनो ! ” TB म्हणजे काय? क्षयरोगाचे चे कारणे, लक्षणे आणि उपचार । TB information in Marathi हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!!

Leave a Comment