विरामचिन्हे मराठी | विरामचिन्हे व त्यांची नावे आणि प्रकार | Viram Chinh In Marathi ( )

विरामचिन्हे मराठी | विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi ( )

Viram Chinh In Marathi विरामचिन्हे मराठी  मराठी भाषेला पूर्ण करण्यासाठी विरामचिन्हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विरामचिन्ह शिवाय मराठी भाषेतील एखादे वाक्य पूर्ण होत नाही. जर विराम चिन्हाचा योग्य वापर न करता एखादे वाक्य वाचले असल्यास त्या वाक्याचा वेगळा अर्थ देखणे होऊ शकतो.

त्यामुळे विराम चिन्ह याबद्दल सर्वांनाच माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विरामचिन्हे खूप महत्वाचे ठरतात.

भाषेतील एखादा उतारा वाचत असताना विराम चिन्हांचे महत्व लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. एखादे वाक्य वाचत असताना आपण मध्येच थांबतो म्हणजे त्या ठिकाणी आपण विराम घेतो.

विरामचिन्हे मराठी | विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi ( )

त्यामुळे लेखनामध्ये विरामचिन्हे नसतील तर एखादे वाक्याची सुरुवात आपण कोठे केली व ते वाक्य कोठे संपले कळणार नाही. त्यामुळेम् विराम चिन्ह यांचा योग्य वापर कोठे व कधी करायचा याबद्दल माहिती सर्वांनाच असायला हवी.

म्हणून आजच्या लेखांमधून आणि विरामचिन्हे व त्यांचे प्रकार व त्यांचे मराठी माहिती घेऊन आलोत. चला तर मग पाहूया, viram chinh in marathi | विरामचिन्हे व त्यांचे प्रकार.

विरामचिन्हे म्हणजे काय ? What Is Viram Chinh In Marathi

विराम चिन्ह हा शब्द ” विराम + चिन्ह = विराम चिन्ह “ असा तयार झाला आहे.

या शब्दातील वीराम या शब्दाचा अर्थ “थांबणे” असा होतो तर चिन्ह या शब्दाचा अर्थ “खुणा” असा होतो.

म्हणजेच वाक्यातील किंवा परिच्छेदातील खुणा पाहून त्याठिकाणी थांबणे होय. आपण बोलत असताना एक सारखे बोलत नाही, बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो तर काही ठिकाणी पूर्णपणे थांबतो. थांबणे यालाच आपण विसावा किंवा विराम असे म्हणतो.

विरामचिन्हे व त्यांचे प्रकार :

1. पूर्ण विराम [ . ]

2. अर्ध विराम [ ; ]

3. स्वल्पविराम [ , ]

4. अपूर्ण विराम [ ; ]

5. प्रश्नचिन्ह [ ? ]

6. उद्गार चिन्ह [ ! ]

7. अवतरण चिन्हे [ ‘ ‘ ] [ ” ” ]

8. संयोग चिन्ह [ – ]

9. अपसारण चिन्ह [ _ ]

10. लोप चिन्ह [ ….]

11. दंड [ | ]

वरील सर्व विरामचिन्हे आहेत. आता आपण प्रत्येक विराम चिन्ह बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

1. पूर्णविराम [ . ]

एखादा परिच्छेद किंवा एखादे वाक्य पूर्ण झाल्यानंतर ते वाक्य किंवा परिच्छेद पूर्ण झाला आहे असे दर्शवण्यासाठी पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो. पूर्णविराम [ . ] या चिन्हाने दर्शवितात. तसेच वाक्यामध्ये पूर्णविराम हे चिन्ह दिसतात आपण थोडा वेळ त्या ठिकाणी थांबतो. यावरून समोरच्या व्यक्तीला कळते की येथे पूर्णविराम ला आलेला आहे.

या प्रमाणेच पूर्णविराम चा उपयोग एखाद्या नावांमधील अद्य अक्षरे किंवा संक्षिप्त रूपाच्या शेवटी देखील पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ,

1. साई शाळेला चालला आहे.

2. पोप टमिठू मिठू बोलतो.

3. आईने घरी लाडू केले आहेत.

4. वि. स. खांडेकर ( विष्णू सखाराम खांडेकर)

2. अर्थ विराम [ ; ]

विरामचिन्हे व त्यांचे प्रकार याचा अभ्यास करत असताना ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ थांबले जाते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही. तेव्हा त्या ठिकाणी अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो.

अर्धविराम [ ; ] या चिन्हाने दर्शवतात. दोन छोट्या वाक्यांना जोडण्यासाठी मुख्यता उभयान्वी अव्ययाने जोडताना अर्धविराम चा वापर केला जातो.

उदाहरणार्थ,

1. ढग खूप गर्जत होते; मात्र मुसळधार पाऊस आला नाही.

2. सर्वच काम खूप अवघड असतात; परंतु केल्याने सर्व सोपे वाटते.

3. त्याने खूप प्रयत्न केला; परंतु तो शर्यत हरला.

3. स्वल्पविराम [ , ]

वाक्यात ज्या ठिकाणी थोडेशे थांबावे लागते, तेथे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो. विशेषणे, नामे, सर्वनामे, क्रियापदे आणि इतर जातीचे पुणेकर शब्द एकत्र येतात तेव्हा प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम वापरला जातो.

स्वल्पविराम [ , ] या चिन्हाने दर्शवतात.

त्याप्रमाणे एकाच जातीचे शब्द किंवा छोटी वाक्य एकापाठोपाठ एक येत असतील तर तेव्हा प्रत्येक शब्दानंतर व वाक्यानंतर स्वल्पविराम दर्शवतात. त्याप्रमाणेच दोन वाक्यांना जोडण्यासाठी देखील स्वल्पविराम चा वापर केला जातो.

उदाहरणार्थ,

1. सीताला इतिहास, भूगोल, समाजशास्त्र हे विषय खूप आवडतात.

2. राजूने बाजारातून संत्री, मोसंबी, सफरचंद, केळी ही फळे विकत आणली.

3. आनिलला शाळेत जायला उशीर झाला, कारण त्याच्या घरी पाहुणे आले होते.

4. अपूर्ण विराम [ : ]

जेव्हा वाक्य लिहीत असताना वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असतो तेव्हा पूर्णविराम या चिन्हाचा वापर केला जातो.

पूर्णविराम [ : ] या चिन्हाने दर्शवतात.

तपशील किंवा एखाद्या गोष्टीची यादी द्यायचे असेल तर अपूर्णविराम वापरतात.

उदाहरणार्थ,

1. एका आठवड्यात सात वार असतात ते पुढील प्रमाणे: सोमवार , मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.

2. मुख्य ऋतू 3 आहेतः उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.

3. पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा: 4, 7, 10,5.

4. पुढील संख्यांचा वर्ग सांगा: 2, 3, 4, 5, 6.

5. प्रश्नचिन्ह [ ? ]

वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह [ ? ] वापरतात. प्रश्नचिन्ह [ ? ] या चिन्हाने दर्शवतात.

उदाहरणार्थ,

1. आज कोणता वार आहे?

2. तुझे नाव काय आहे?

3. तुम्ही जेवण केलात का?

4. माझ्यासोबत कोण येणार?

6. उद्गारवाचक चिन्ह [ ! ]

जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील आश्चर्य, दुःख, आनंद इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी त्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हांचा वापर करतात. म्हणजे आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह [ ! ] वापरले जाते.

त्याप्रमाणेच केवलप्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दर्शवण्यासाठी वाक्यात वापरले जातात. म्हणूनच केवलप्रयोगी शब्दां पुढे किंवा त्या वाक्यां पुढे उद्गारवाचक चिन्हांचा वापर केला जातो. उद्गारवाचक चिन्ह [ ! ] असे दर्शवतात.

उदाहरणे,

1. अरे बापरे ! एवढा मोठा डोंगर हा!

2. छी ! किती घाण दुर्गंध आहे ही !

3. अरेरे व्वा ! किती सुंदर मोर आहे.

4. अरेरेच्या ! मी तर पैसे घरीच विसरलो.

7. अवतरण चिन्ह ( ‘ ‘ ) ( ” ” )

महत्वाचे शब्द किंवा शब्दसमूह किंवा दुसऱ्यांच्या तोंडाचे वाक्य दर्शविण्यासाठी अवतारण चिन्हांचा वापर केला जातो. अवतरण चिन्हे ( ‘ ‘ ) ( ” ” ) अशी दर्शवतात.

अवतरण चिन्ह चे दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे.

1. एकेरी अवतरण चिन्ह [ ‘ ‘ ]

जेव्हा एखादा शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह याचा वापर करतात. एकेरी अवतरण चिन्ह [ ‘ ‘ ] असे दर्शवतात.

उदा.

1. उद्या शाळेमध्ये ‘स्वतंत्र दिन’ साजरा करायचा आहे.

2. 19 फेब्रुवारीला ‘शिवाजी महाराज जयंती’ साजरी केली जाते.

3. ‘ययाती’ हे पुस्तक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेले आहे.

2. दुहेरी अवतरण चिन्ह [ ” ” ]

व्याकरणा मध्ये एखाद्या व्यक्तीने बोललेले शब्द किंवा वाक्य दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह[ ” ” ] याचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला बोलणार्याचे वाक्य सहजरीत्या अधोरेखित करता येते.

उदा.

1. सर म्हणाले, “उद्या शाळेला सुट्टी आहे.”

2. बिरबल म्हणाला, ” तुम्ही कोठून आलात?”

8. संयोग चिन्ह [ – ]

मराठी व्याकरणा मध्ये प्रत्येक सामाजिक शब्दांच्या दोन पदांमध्ये या चिन्हांचा [ – ] वापर केला जातो. यालाच संयोग चिन्ह असे म्हणतात. शब्दांमधील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी मुख्यता संयोग चिन्हाचा वापर केला जातो. तसेच एखादे वाक्य किंवा ओळ लिहित असताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा पडल्यास संयोग चिन्ह वापरतात.

उदाहरणार्थ,

1. राधा-कृष्ण

2. ऊन – पाऊस

3. गंगा- यमुना

4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक राय- गड किल्ल्यावर झाला.

9. अपसारण चिन्ह [ — ]

अपसारण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह असेसुद्धा म्हणतात. मराठी व्याकरणा मध्ये यामध्ये एखाद्या गोष्टीचा केव्हा बाबींचा खुलासा करायचा असेल किंवा स्पष्टीकरण द्यायचे असेल तेव्हा अपसारण चिन्हाचा वापर करतात.

अपसारण चिन्ह [ — ] असे दर्शवतात.

उदा.

1. राजू आज महाबळेश्वरला जाणार होता.पण–?

10. लोप चिन्ह [ … ]

जेव्हा एखादे वाक्य बोलता-बोलता मध्येच शब्द खंडित होतात किंवा बोलताना थोडे थांबतो तेव्हा लोप चिन्ह वापरले जाते. लोप चिन्ह [ … ] असे दर्शवतात.

उदा.

1. मला फिरायला जायचं होतं पण…..

2. आई आज लाडू बनवणार होती पण…..

11. दंड [ | ]

मराठी व्याकरणा मध्ये अभंग, ओवी, श्लोक यांचा शेवट दर्शवण्यासाठी दंडाचा वापर केला जात. दंड हे दोन प्रकारचे असतात एकेरी दंड [ | ] आणि दुहेरी दंड [ || ].

उदा.

1. जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||

तर मित्रांनो ! ” विरामचिन्हे मराठी | विरामचिन्हे व त्यांची नावे | Viram Chinh In Marathi ( ) ” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment