व्यसन मुक्ति वर निबंध मराठी | Vyasan Mukti Essay In Marathi Wikipedia

व्यसन मुक्ति वर निबंध मराठी | Vyasan Mukti Essay In Marathi Wikipedia

भारता हा आफट लोकसंख्या असलेला देश आहे. जगामध्ये भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो. भारतात तरुणांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळते आणि हे सगळी तरुण पिढी भारताचे भविष्य आहे. आजची तरुण पिढी ही खूप व्यावहारिक हुशार आणि करियर बाबतीत वास्तव्य वादी आहे. त्यामुळे भारताचा दिवसेंदिवस विकास होत आहे ,आणि ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे.

परंतु या तरुण पिढीतील काही तरुण हे व्यसनाला आहारी गेलेले आहेत. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या मागे प्रत्येकाचे वैयक्तिक आणि सामाजिक कारण दडलेले आहे. परंतु व्सयन हे आपल्या देशाला लागलेली खूप मोठी कीड आहे. आपल्याचा‌‌देशाचा आणखी विकास करायचा असेल, आणि ‌देशातील तरुणांना योग्य मार्गावर लावायचे असेल तर सुरुवात या व्यसनमुक्ती पासून करायला हवी.

व्यसन मुक्ति वर निबंध मराठी | Vyasan Mukti Essay In Marathi Wikipedia

व्यसन हे दोन प्रकारचे असते. जर चांगल्या गोष्टी चे व्यसन असेल तर काही हरकत नाही, परंतु हेच व्यसन जर वाईट मार्गाचे असेल तर व्यक्तीचा नक्कीच नाश होतो. त्यामुळे या वाईट व्यसनाचा नाश करणे अत्यंत गरजेचे आहे.

व्यसन म्हणजे काय ?

” व्यसन म्हणजे एखाद्या व्यक्तीला लागलेली अशी सवय त्यामुळे त्या व्यक्तीचा शारिरीक, मानसिक आणि सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. व त्या सवयी त्या व्यक्तीला बदल करणे शक्य होत नाही. अशाच या काही सवयी असतात त्यांना व्यसन असे म्हणतात. ”

व्यसन हे माणसाला लागलेल्या वाईट सवयी पैकी एक सवय आहे. व्यसन म्हणजे त्यामध्ये दारूचे व्यसन ,गुटक्याचे व्यसन ,सिगारेट चे व्यसन, तंबाखूचे व्यसन किंवा अन्य कुठल्याही वाईट कृतीचे व्यसन असते.

व्यक्ती व्यासाना चा अहरी कसा जातो ?

तरुण पिढीला नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची आवड असते. या वयात मुलांना सोशल मीडिया वापराचे वेड लागते. व्हॉटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम अश्या ऍप वर चॅटिंग ची सवय लागते आणि याच परिणाम तरुणाच्या नातेसंबंधावर ,अभ्यासावर ,आणि तब्येतीवर होतो. याबाबतीत तरुणांच्या आईवडिलांनी त्यांना अडवले तर मुले त्यांच्या अशीच वाद घालतात आई-वडिलांना चुलत बोलतात हट्ट करतात.

तसेच कॉलेजमधील एखाद्या ग्रुप मध्ये सामील व्हायचे असेल तर मुले इतर मुलांसारखे राहण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे मुले दारू गुटखा तंबाखू सिगारेट व्यसनांना आहारी जातात. असे वागणे म्हणजे मुलांना एक प्रकारची स्टाईल वाटते.

व्यसनांना मुले इतक्या आहारी जातात या याची हळूहळू त्यांना सवय होऊ लागते परिणामी मुले व्यसनाला आपली सवय बनवतात. आपला आपल्यावर कंट्रोल राहत नाही. अभ्यासाचं टेन्शन असो या कशाचे मुले दारू गुटखा तंबाखू यांना यांचा सारा घेतात.

व्यसन साठी लागणारे पैसे सती मुले खोटे बोलले एकादशी फसवणूक करणे गैरकृत्य करणे अशा वाईट कृत्य करतानाही मागत मागे पुढचा विचार करत नाहीत.

कमी टक्केवारी करिअरचे टेन्शन या कारणामुळे ही काही तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते.

याव्यतिरिक्त काही लोकांना कौटुंबिक तणाव यामुळे सुध्दा व्यसनाची कुणाची सवय लागते.कमी वयात पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, वादविवाद, भांडण तंटे, पैशाचा अपुरेपणा, गरीबी, कर्ज, मुलांचे शिक्षण अशा अनेक कारणामुळे सुद्धा अलीकडील पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे.

व्यसनाचे एकदा सवय झाली ती व्यक्ती कुठलीही हद्दपार करण्यासाठी विचार करत नाही, त्यातून चोरी दरोडा मारहाण खोटे बोलणे अशा गुणांना वाव मिळतो.

व्यसनाचे असे अनेक दुष्परिणाम आहेत त्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक नागरिक व्यसनमुक्त कसा होईल याचा विचार करायला हवा.

व्यसनाचे दुष्परिणाम :

व्यसन हे आपल्या अंगी असणारा सर्वात वाईट गुण आहेच, सोबत त्याचे बरेच दुष्परिणाम सुद्धा आहेत. अपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण व्यसनांना आहारी गेलेल्या लोकांची कितीतरी उदाहरणे पाहतो, त्यातील बहुतांश लोक हे व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्युमुखी सुद्धा पडली.

व्यसनाचे मानसिक शारीरिक आणि सामाजिक असे तीन प्रकारचे दुष्परिणाम होतात.

शारीरिक दुष्परिणाम :

दारू पिणे ,सिगरेट ओढणे, गुटखा खाणे ,तंबाखू खाणे आणि मादक पदार्थांचे सेवन करणे याचा अपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. अशा मादक पदार्थाचे सेवन केल्याने कर्करोग ,कॅन्सर ,फुफ्फुसाचे रोग, घसा विकार, मूत्रपिंड विकार , श्वसनाचे विकार अश्या अनेक विकारांची लागण आपल्या शरीराला होतो. जर व्यसन अति टोकाचे असे तर मृत्यू सुद्धा होतो. मध्यपान केल्याने यकृत कायमस्वरूपी निकामी होतात.

मानसिक दुष्परिणाम :

व्यसनामुळे शारीरिक दुष्परिणाम होतातच सोबत मानसिक त्रास सुद्धा होतो. कारण एखाद्या वेळी मादक पदार्थ मिळाले नाही तर व्यक्ती चिडचिडा होतो. तला जगणे नकोसे वाटते. बुद्धी अकार्यक्षम होते. सतत चिडचिड पणा आलेला दिसतो.

असे मादक पदार्थ हवेत यासाठी व्यक्ती काहीही करण्यासाठी तयार होतो. व्यसनामुळे मनुष्यातील तमोगुण वाढतो ,त्यामुळे अशा व्यक्तीच्या मनात वाईट शक्ती लवकर निर्माण होते व ही व्यक्ती इतरांना सतत त्रास देतात.

सामाजिक दुष्परिणाम :

व्यसन करणारा व्यक्ती हा स्वतःसोबत समाजालाही त्रास देतो.  मादक पदार्थांश्ना्ा सााठी  पैशाची चोरी ,दरोडा ,मारहाण अशा अनेक कृत्याला  व्यसनाधीन व्यक्ती जबबदार ठरतो. त्यामुळे अशा व्यक्तींचा समाजावर परिणाम होतो. मिि व्याासान ही समाजाला लागलेली एक प्रकारची कीड आहे. त्यामुळे काही लोक एकमेकांची नक्कल करतात. या नकली तुन सूद्धा बहुतांश लोक व्यसनाला बळी पडले आहेत.

व्यसनमुक्ती :

व्यसन मुक्ती ही आजच्या काळाची गरज आहे. कारण,

आज आपल्या समाजातील बहुतांशी पिढी ही व्यसनाला आहारी आहे. त्यामुळे व्यसनाधीन असलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याने किंवा राग केल्याने त्यांच्यातील ही व्यसनाची सवय नष्ट होणार नाही. अशा व्यक्तींमध्ये तमोगुण निर्माण झालेला असतो. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला प्रेमाने व आपलेपणाने बोलून समजावून सांगितले पाहिजे.

व्यसनाधीन व्यक्तीचे मनस्थिती समजून घेतली पाहिजे. व्यसनामुळे आपल्या देशाचा नाश होत चालला आहे ,त्यामुळे व्यसनमुक्ती कडे प्रत्येकाने एक पाऊल उचलले पाहिजे. एक आदर्श समाज घडवायचा असेल तर व्यसनाला मुळापासून नष्ट करायला हवे.

आपल्या पिढीला आणि देशाला व्यसनमुक्त काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अनेक व्यसनमुक्तीसाठी योजना राबविल्या आहेत. आपल्या देशाला व्यसनमुक्त करायचे असेल तर तरुण पिढीची मानसिकता बदलायला हवी.कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देन्या अगोदर त्यांची मनस्थिती बनवायला हवी.

टेन्शन, डिप्रेशन किंवा प्रेशर या साठी व्यसन हा पर्याय नसून त्या परिस्थितीला तोंड देऊन आपण बाहेर कसे पडणार ,हा त्या परिस्थितीवर असलेला उपाय आहे. त्यामुळे व्यसनाला आहारी न जाता आपण एखाद्या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड देतो, हे आपल्याला जीवन जगायला शिकवते.

आयुष्य नातेसंबंधातील ताण तणाव दूर करण्यासाठी व्यसनाची गरज नाही, हे आजच्या पिढीला समजून देण्याची गरज आहे. व्यसन मुक्तता हे एका दिवसाचे काम नाही, परंतु योग्य मार्ग आणि मार्गदर्शन हे आजच्या पिढीला व्यसनाच्या आहारी जण्यापासून वाचवू शकते.

व्यसन मुक्ती साठी सर्व समाजाने एकत्र येऊन लढा उभारीला पाहिजे. व्यसनमुक्तीसाठी विविध केंद्र उभारले पाहिजे. त्याची सुरुवात आपण कॉलेज ,महाविद्यालया पासून करायला हवी. कारण व्यसनाला आहारी जाणारी बहुतांशी पिढी ही आजची तरुण पिढी आहे, त्यामुळे व्यसनमुक्तीची सुरुवात हे या तरुणांन पासूनच करायला हवी.

आपण उचललेले प्रत्येक पाऊल, नक्कीच आपल्या देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

व्यसनमुक्ती विरोधात आपण सर्वांनी मिळून लढा दिला तर ,नक्कीच एक दिवस आपला देश व्यसनमुक्त होईल.

तर मित्रांनो ! ” व्यसन मुक्ति वर निबंध मराठी | Vyasan Mukti Essay In Marathi Wikipedia “ वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


 

हे लेख देखील अवश्य वाचा :

Leave a Comment