Water Slogan in Marathi । पाणी वाचवा घोषवाक्य मराठी

Water Slogan in Marathi मित्रांनो आणि हे सर्व माणसांचे जीवन पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही तसेच पृथ्वीतलावर असणारे झाडे व, पशुपक्षी किंवा अन्य जीवनासाठी पाणी खूप गरजेचं आहे. त्यामुळे पाणी वाचवणे हे प्रत्येक सजीवाचे कर्तव्य आहे.

अलीकडे वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले व त्यासोबत पाणीदेखील, पिण्यासाठी पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाणी वाचवणे गरजेचे आहे व येणाऱ्या पिढीला देखील पाण्याचे महत्त्व सांगणे खूप गरजेचे आहे.

याकरिता आम्ही या लेखामध्ये पाण्यावर काही घोषवाक्य घेऊन आलो. या घोषवाक्यांचा वापर करून आपल्याला पाण्याचे महत्व तर कळेलच त्यासोबत विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मदत देखील होईल.

Water Slogan in Marathi । पाणी वाचवा घोषवाक्य मराठी

चला तर मग पाहूया, Water Slogan in Marathi

Water Slogan in Marathi

1. पाणी आपले जीवन आहे, पाण्याचा काटकसरीने वापर करा.

2. पाणी आडवा, पाणी जिरवा पाण्याच्या संवर्धन करा.

3. पाण्याचे करा संवर्धन, सुरक्षित करा आपल्या मुलांचे भविष्य…

4. पाणी आपले जीवन आहे.

5. पाणी नाही ते आहे द्रव्य सर्व सजीवांचे अमृततुल्य…

6. पाण्याचे करा संरक्षण, वसुंधरेचे होईल रक्षण.

7. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न…

8. थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी जीवनाचा….

9. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर मग सांभाळा आपली जलसंपत्ती.

10. पाण्याच्या स्वच्छते विषयी घेऊन दक्षता, मग होईल आपल्या जीवनाची सुरक्षितता.

11. पाणी म्हणजे पृथ्वीचा स्पंदन, पाणीच आहे सजीवसृष्टीचा जीवन….

12. स्वच्छ पाणी घरोघरी. आरोग्याची होईल हाही…

13. वापरा पिण्यासाठी शुद्ध पाणी, त्यामुळे होणार नाही आरोग्याची हानी…

14. पाणी वाचवा, जीवन वाचवा, वसुंधरा वाचवा…

15. पाणी म्हणजे जीवनाचा सार, याचा तुम्ही करा विचार..

16. करा पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलेल तुमचे जीवन..

17. तुम्ही पाण्याला वाचवा, पाणी तुम्हाला वाचवेल….

18. नका वाया घालवू पाण्यासारखे शुद्ध जल, पाणीच आहे देशाचे खरे धन…

19. पाण्याचे महत्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा.

20. पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू…

21. पाण्याविना मानवाचा जन्म आहे व्यर्थ, म्हणून जाणून घ्या पाण्याचे महत्त्व….

22. थेंबे थेंबे पाणी वाचवा, भविष्याचे जीवना सुखी करा…

23. पाणी व्यवस्थापनाची धरून कास , शेतकऱ्यांनी साधला आपला विकास….

24. प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याच्या काटकसर करा.

25. आता राबवू जलनीती, नको दुष्काळाची भीती..

26. नव्या पिढीचा एकच मंत्र, कमी पाण्यात ज्यादा सिंचन क्षेत्र…

27. स्वच्छता आणि शुद्ध पाणी हाच आहे खरा मंत्र….

28. सांडपाण्याचे करा योग्य विल्हेवाट, मग येईल घरोघरी आरोग्यदायी पहाट.

29. पिण्यासाठी वापरा स्वच्छ पाण, हाच मंत्र सर्वांनी ठेवावा ध्यानी.

30. ठिबक सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात उत्पन्न भारी…

31. पाण्याविना राहणार नाही कोणत्याही सजीवात प्राण, त्यामुळे पाण्याचे महत्व जाण…

32. पाण्याची राखा शुद्धता, त्यामुळे जीवनाला मिळेल खरी आरोग्य संपदा…!!!

33. वाचवू मिळून सारे एक एक थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग आहे सुखी जीवन जगण्याचा.

34. पाण्याचे पुनर्भरण, मग होईल जीवनाची संवर्धन.

35. थेंब न् थेंब वाचवू पाणी, आनंद येईल आपल्या जीवनी.

36. पाण्याचा योग्य आणि गरजेपुरता वापर करा, पाण्याचा गैर वापर करू नका.

37. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ, रोगराईला मानवी जीवनापासून पळवू…

38. जीवनाला खरा अर्थ, वेळीच टाळा प्रदूषण व्यर्थ.

40. पाणी देते प्रत्येक सजीवास नवीन जीवनदान, मिळून करूया पाणी जतन करण्याचे सर्व श्रेष्ठ दान…

41. पाण्याचे जतन आज करू, नवीन पिढीला जीवनदान देऊ.

42. पाणी वाचवा आणि आपल्या भविष्याच्या पिढीचे जीवन वाचवा.

43. पाण्याचे करु संरक्षण, मग होईल धरतीचे रक्षण.

44. सुरक्षित साधन जीवनाचे, महत्व पटवा पाण्याचे….

45. पाण्याचे पाणी घ्या ओगराळ्याने, पाणी दूषित करू नका तुमच्या हाताने…

46. स्वच्छ पाणी सुंदर परिसर, निरोगी होईल जीवन निरंतर…

47. सहकार्य थोडे नियोजन, पाणी वाचलेले सर्वांचे जीवन.

48. पाणी विना जीवन बेजार, सजीवसृष्टीला फक्त पाण्याचा आधार….

49. करा सांडपाण्याचा पुनर्वापर, जीवनाला द्या नवा आकार…

50. पाण्याची शुद्धता राखा, रोगराईतुन मिळेल मुक्तता…

51. पाणी वाचवा, पाणी तुम्हाला वाचवेल.

52. प्रदूषण रोखा, पाणी वाचवा…

53. भविष्यासाठी तरतूद केवळ पैशाचीच नको, तर पाण्याची देखील करा…

54. पाण्याच आहे जीवनाचे अनमोल धन, कारण पाणी देते सजीवसृष्टीला जीवन…

55. पाणी आहे काळाची गरज, म्हणून करा पाण्याचा काटकसरीने वापर….

56. आपल्या सर्वांचे आता एकच स्वप्न, करा पाण्याच्या एक एक थेंबा चे रक्षण….

57. कधीही होऊ देऊ नका विस्मरण, पाणीच आहे सजीवांचे जीवान….

58. पाण्याचे मूल्य सोन्या समान, करू नका पाण्याचा अवमान….

59. आपल्या उद्याच्या जीवनाला सुरक्षित करूया, पाणी जपूया पाणी वाचवूया….

मित्रांनो खरोखरंच पाणी हे आपले संपूर्ण सजीव सृष्टी चे जीवन आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. 22 मार्चला संपूर्ण जगभरामध्ये जागतिक जल दिवस साजरा केला जातो.

आपल्या पृथ्वीवर पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत जसे की, नदी, नाले, समुद्र अशा विविध स्रोतांमधून आपल्याला पाणी मिळत असते. परंतु पाण्याचा मुख्य स्त्रोत हा पावसाला मांशले जाते. अलीकडे काडे झालेल्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण देखील आपोआपच कमी झाले.

त्यामुळे सर्वप्रथम पाणी वाचवायचे असेल तर आपल्याला प्रदूषण मुक्त करायला हवे. त्यासाठी आपल्याला जनजागृती करायला हवी. आजच्या लेखामध्ये water Slogan in Marathi आम्ही काही पाणी घोषवाक्य घेऊन आलोत त्याच्या मदतीने तुम्ही जनजागृती करू शकता.

तर मित्रांनो, Water Slogan in Marathi ( पाणी घोषवाक्य ) “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आणि शेअर करा.

Read Also :

धन्यवाद!!!

Leave a Comment